सनातन दंतमंजनामुळे होणारे लाभ लक्षात घ्या आणि दातांचे आरोग्य राखण्यासाठी ते वापरण्यास आजपासूनच आरंभ करा !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

विविध औषधी गुणधर्मांनी युक्त अशा सनातन
दंतमंजनामुळे होणारे लाभ लक्षात घ्या आणि दातांचे
आरोग्य राखण्यासाठी ते वापरण्यास आजपासूनच आरंभ करा !

आतापर्यंत सनातन संस्थेने विविध नित्योपयोगी उत्पादनांची निर्मिती केली आहे. त्यातीलच एक उत्पादन म्हणजे सनातन दंतमंजन !

1407681494_sanatan_dantmanjan

 

१. दंतमंजनाचे महत्त्व

हिरड्यांना सूज आणि रक्तस्राव यांपासून वाचवणारे, मुखाची दुर्गंधी रोखणारे, तसेच अरुची (तोंडाची चव जाणे) नष्ट करणारे सनातन दंतमंजन वापरल्याने आतापर्यंत अनेक वाचक, हितचिंतक, तसेच साधक यांना विविध लाभ झाले आहेत.

 

२. सनातन दंतमंजनाचे औषधी उपयोग

अ. दंतमंजनाच्या नियमित वापराने हिरड्या आणि दात बळकट होतात.

आ. हिरड्या सुजणे, तसेच त्यांतून पू आणि रक्त येणे बंद होते.

इ. दात किडण्याचे थांबून दातांचे आरोग्य सुधारते.

र्ई. दात किडणे आणि तोंडाला दुर्गंधी येणे थांबते.

उ. दात मुळापासून घट्ट होतात.

 

३. दंतमंजनाचे लाभ दर्शवणारी काही उदाहरणे

३ अ. सात्त्विक दंतमंजनाच्या वापराने
५ वर्षांपासून सतावणारी दातांची समस्या दूर होणे

एक साधक गेल्या ५ वर्षांपासून दातांच्या समस्येमुळे त्रस्त होता. या कालावधीत त्याला अनेकदा दंतवैद्यांकडे जावे लागले. २ दाढाही काढाव्या लागल्या. इतर दाढाही काढाव्या लागणार, अशी चिन्हे होती. नंतर सनातन-निर्मित दंतमंजन उपलब्ध झाल्यावर तो ते नियमितपणे वापरू लागला. त्यामुळे गेल्या ५ वर्षांपासून त्याच्या दातांतून रक्त येणे थांबले आहे, तसेच दाढाही पूर्वीच्या तुलनेत अधिक बळकट झाल्या आहेत.

३ आ. दंतमंजन वापरू लागल्यावर दातांच्या
संदर्भातील शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता न भासणे

सनातनच्या एका हितचिंतकाला दातदुखीचा तीव्र त्रास होता. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी त्याला शस्त्रकर्म करण्यास सांगितले. त्या हितचिंतकाने सनातनच्या विक्रीकेंद्रावर येऊन दातदुखीसाठी काही उपाय आहे का ? अशी विचारणा केली असता त्याला दंतमंजन उपलब्ध करून देण्यात आले. दंतमंजनाच्या वापराने काही दिवसांतच त्याच्या वेदना उणावू लागल्या. त्याने दातांची पुनर्पडताळणी करून घेतल्यावर आधुनिक वैद्यांनी त्याला शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले.

३ इ. दंतमंजन उपयोगात आणल्यानंतर दातांचे त्रास न्यून होणे

एक व्यक्ती नियमितपणे दंतमंजन वापरत होती. मध्यंतरीच्या काळात दंतमंजन उपलब्ध नसतांना ती धर्मरथावर येऊन दंतमंजन आले का ?, अशी विचारणा करत होती. बरेच दिवस दंतमंजन मिळाले नसल्याने एक दिवस ती म्हणाली, कसेही करून मला दंतमंजन उपलब्ध करून द्या. त्याने फार लाभ झाला असून माझे दातांचे सर्व त्रास न्यून झाले आहेत.

३ ई. एका वृद्धाचे हालणारे दात पक्के
होण्यास साहाय्यकारक ठरलेले दंतमंजन !

एका वयस्कर व्यक्तीने प्रदर्शनकक्षावरून दंतमंजन घेतले होते. त्याच्या वापरामुळे लाभ झाल्याने तिने दंतमंजन कुठे मिळते, याची पुष्कळ शोधाशोध केली. नंतर एका साधकाचे घर शोधत शोधत ती त्याच्याकडे आली आणि म्हणाली, मी दंतमंजन घेण्यासाठी आलो आहे. तुमच्या दंतमंजनामुळे माझे हालणारे दात एकदम पक्के झाले आहेत.

३ उ. दातांचा पिवळेपणा आणि तोंडाला येणारा दुर्गंध नाहीसा होणे

एका साधिकेचे दात फार वाकडे आणि पिवळे होते. त्यासाठी पुष्कळ वैद्यकीय उपचार घेऊनही दातांचा पिवळेपणा आणि तोंडाला दुर्गंध येणे यांवर काहीच परिणाम होत नव्हता. तिने दंतवैद्याकडून दात स्वच्छ करून घेतल्यावर एका आठवड्यातच तिचे दात पुन्हा पिवळे दिसू लागले. त्यानंतर ती दंतमंजन वापरू लागल्यानंतर तिच्या दातांचा पिवळेपणा नाहिसा झाला आणि तोंडाला दुर्गंध येणेही बंद झाले.

३ ऊ. दातांतून कळ येण्याचे प्रमाण घटणे

पूर्वी गार पाणी प्यायल्यानंतर एका साधकाच्या दातांतून कळ येत असे. सनातन दंतमंजनाचा ५ – ६ वेळा वापर केल्यानंतर दातांतून कळ येण्याचे प्रमाण उणावले.

प्रतिदिन टूथपेस्ट आणि ब्रश यांनी दात घासण्यापेक्षा दंतमंजनाने दात घासणे हितावह आहे. यामुळे दात अन् हिरड्या यांना मर्दन (मालीश) होऊन हिरड्या अधिक बळकट होतात.

जे वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी सनातन दंतमंजन वापरण्यास इच्छुक असतील, त्यांनी सनातनच्या नजिकच्या साधकांकडे किंवा ९३२२३१५३१७ या क्रमांकावर आपली मागणी नोंदवावी.