उज्जैन सिंहस्थाच्या पहिल्या पेशवाईचे स्वागत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान करणार

madhya_pradesh_chief_minister_shivraj_singh_chauhan

     उज्जैन – येथील सिंहस्थच्या पहिल्या पेशवाईचे स्वागत राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान करणार आहेत. याच दिवशी अखाडा परिषदही मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणार आहे. जुना अखाड्याकडून २७ मार्चला नीलगंगा येथून पेशवाई काढण्यात येईल.

उज्जैन सिंहस्थामध्ये आखाड्यातील
साधू-संतांना गोपनीय संकेतांक !

     उज्जैन – सिंहस्थात येणार्‍या साधूंमधून खरे आणि खोटे साधू ओळखण्यासाठी त्यांना गोपनीय संकेतांक देण्यात येणार आहे. आखाड्यांकडून यासाठी संकेतांक बनवण्यात येणार आहेत. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आखाड्यांकडूनच ही व्यवस्था करण्यात आली आहे. सिंहस्थासाठी १३ आखाड्यांनी येथे त्यांचे शिबीर स्थापन केले आहे. यात सहस्रो साधू येतात. म्हणून त्यांच्यासाठी संकेतांक देण्यात येणार आहे. ३६५ प्रकारचे सांकेतांक बनवण्यात आले आहेत. हे संकेतांक गुरूंकडून त्यांच्या शिष्यांना सांगितले जातात. आखाड्यात पहिल्यांदा साधू-संत येतात तेव्हा येथील साधू-संत त्यांच्याशी सांकेतिक भाषेतच बोलतात. त्यांना दोन-तीन प्रश्‍न विचारले जातात. त्याची उत्तरे संकेतांकामध्ये दिल्यावरच त्यांना प्रवेश दिला जातो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात