अभनपूर येथील काँग्रेसचे माजी आमदार धनेन्द्र साहू यांची प्रदर्शनाला भेट

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त
विद्यमाने राजिम कुंभमेळा २०१६ मध्ये भव्य प्रदर्शनाचे आयोजन

Rajim_kumbh_mela
डावीकडून माजी आमदार धनेन्द्र साहू सनातनचे पू. चत्तरसिंग इंगळे यांच्याशी संवाद साधतांना

राजिम कुंभमेळा (छत्तीसगड) – छत्तीसगड राज्यात राजिम कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संयुक्तपणे राष्ट्र आणि धर्म या विषयांवर भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाला अभनपूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे माजी आमदार धनेन्द्र साहू यांनी भेट दिली. प्रदर्शनी पाहून ते अतिशय प्रभावित झाले. गोरक्षण विषयावरील प्रदर्शन पाहून ते म्हणाले, हा विषय अतिशय गंभीर आहे. याकडे केंद्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. यावेळी दुर्ग येथील सनातनचे पू. चत्तरसिंग बाबूलालसिंग इंगळेकाका उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात