राजिम कुंभमेळ्याचे मुख्य अधिकारी श्री. गिरीश बिस्सा प्रदर्शन पाहून प्रभावित

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त
विद्यमाने राजिम कुंभमेळा २०१६ मध्ये भव्य प्रदर्शनाचे आयोजन


राजिम कुंभमेळा (छत्तीसगड)
 – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी उभारलेल्या भव्य प्रदर्शनाला या कुंभमेळ्याचे मुख्य अधिकारी श्री. गिरीश बिस्सा आणि राजिम कुंभमेळा आयोजन समितीचे सदस्य श्री. राकेश तिवारी यांनी भेट दिली. प्रदर्शन पाहून ते अतिशय प्रभावित झाले. या वेळी श्री. बिस्सा म्हणाले, प्रतिवर्षी मला तुमचे प्रदर्शन पहाण्याचा विचार येतो. आज हे प्रदर्शन पाहून अतिशय चांगले वाटले; मात्र या प्रदर्शनाचे मुख्यद्वार लहान पडते. हे द्वार आणखी मोठे असायला हवे होते. पुढील वर्षी तुमच्या प्रदर्शनाकरता याहून मोठे द्वार सिद्ध करून देईन. त्यामुळे सर्व जिज्ञासूंना हे प्रदर्शन ठळकपणे दिसेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात