गायत्री परिवारचे श्री. दिलीप पाणिग्रही यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या धर्मजागृती प्रदर्शनाला भेट

Rajim_Kumbha

गायत्री परिवारचे श्री. दिलीप पाणिग्रही (मध्यभागी) यांना
माहिती सांगतांना सनातन संस्थेच्या डॉ. सौ. रेणु शर्मा

दुर्ग (छत्तीसगड) – गायत्री परिवार, छत्तीसगडचे विभाग समन्वयक श्री. दिलीप पाणिग्रही यांनी राजिम कुंभमेळ्यामध्ये लावण्यात आलेल्या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या धर्मजागृती प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत गायत्री परिवारचे श्री. टीकमराम साहू उपस्थित होते. गेल्या मासात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांच्या कार्यक्रमाचे रायपूर येथील गायत्री शक्तीपिठमध्ये आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून प्रभावित होऊन श्री. पाणिग्रही यांनी छत्तीसगड येथील विविध धार्मिक आणि हिंदुत्ववादी संघटना यांची १२ मार्चला एकत्रित बैठक आयोजित केली. या बैठकीचे निमंत्रण हिंदु जनजागृती समितीला देण्यासाठी त्यांनी राजिम कुंभमेळ्यातील धर्मजागृती प्रदर्शनीला भेट दिली.या वेळी श्री. पाणिग्रही म्हणाले, देव संस्कृतीला वाचवणे आवश्यक असून या प्रदर्शनाच्या मध्यमातून समितीचे कार्यकर्ते हे कार्य परिणामकारकरित्या करत आहेत.