मिरज येथे कीर्तन महोत्सवात सनातन संस्थेकडून धर्मांतर – काळाची समस्या या विषयावर प्रवचन

     मिरज – येथील भानु तालमीसमोरच्या काशीविश्‍वेश्‍वराच्या मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री. माधव गाडगीळ आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवात ६ मार्चला सनातन संस्थेच्या वतीने धर्मांतर – काळाची समस्या या विषयावर कु. सुरेखा आचार्य यांनी प्रवचन केले. १२० स्त्रियांनी याचा लाभ घेतला. कु. सुरेखा यांना धर्मांतराचे प्रकार तसेच ते रोखण्यासाठी करावयाचे धर्माचरणाचे प्रयत्न यांविषयी मार्गदर्शन केले. मांडलेल्या विचारांचे उपस्थितांनी स्वागत केले आणि सर्वांनीच धर्माचरण करावे, असे मत मांडले. या काळात असे प्रबोधन होणे महत्त्वाचे आहे, असेही काहींनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात