राजिम कुंभभेळ्यामध्ये राष्ट्र-धर्म प्रदर्शनाला संत-महंतांची भेट

राजिम (छत्तीसगड) कुंभभेळ्यामध्ये उभारण्यात आलेल्या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र-धर्म प्रदर्शनाला संत-महंतांची भेट

Rajim
डावीकडून आर्य समाजाचे छत्तीसगड प्रांतीय आर्य प्रतिनिधी सभेचे धर्ममुनी वानप्रस्थी, मुजफ्फरनगर येथील पं. सुमन राही यांचा सत्कार करतांना सनातन संस्थेचे श्री. हेमंत कानस्कर

   राजिम (छत्तीसगड) – येथे राजिम कुंभभेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे राष्ट्र आणि धर्म प्रदर्शन उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आर्य समाजचे रायपूर येथील श्री. जगबंधु शास्त्री आणि मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील पं. सुमन राही यांनी नुकतीच भेट दिली.

    प्रदर्शन पाहून ते अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी या प्रदर्शनाचे कौतुक केले. प्रदर्शनात राष्ट्र आणि धर्म विषयी फ्लेक्स फलक उभारण्यात आले असून सनातनचे ग्रंथही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
माजी आमदार श्री. सोनप्रकाशगिरी यांची प्रदर्शनाला भेट

     राजिम कुंभभेळ्यामधे लावण्यात आलेल्या या प्रदर्शनाला धमतरी (छत्तीसगड)चे माजी आमदार श्री. सोनप्रकाश गिरी यांनी ४ मार्च या दिवशी भेट देऊन अवलोकन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात