कर्नाटक राज्यांत विविध ठिकाणी सनातन ग्रंथालयांचे उद्घाटन

विजापूर येथील कालिका मंदिरात ग्रंथालयाचे <br/> उद्घाटन करतांना सनातनचे साधक आणि हिंदु धर्माभिमानी

विजापूर येथील कालिका मंदिरात ग्रंथालयाचे
उद्घाटन करतांना सनातनचे साधक आणि हिंदु धर्माभिमानी

बेंगळुरू – कर्नाटक राज्यात धर्मप्रसारानिमित्त सनातन-निर्मित ग्रंथांच्या प्रदर्शनासाठी विविध जिल्ह्यांत आणि शहरांत सनातन ग्रंथालय लावण्यात येत आहेत. शिरसी, मंगळुरू, शिवमोग्गा, कुमटा, बागलकोट, विजापूर, धारवाड आणि गदग येथील मंदिरात १० ठिकाणी आणि २ शाळांमध्ये ग्रंथालय लावण्यात आले होते.

१. विजापूर येथे ग्रंथालयाचे उद्घाटन करतांना एकूण ६० जण उपस्थित होते. त्यातील एका भक्ताने स्वतःच ग्रंथांची माहिती उपस्थितांना सांगितली.

२. धारवाड येथे रिक्शातून ग्रंथाचे स्टॅण्ड काढतांना रिक्शाचालकाने पायांतील चप्पल काढून हात जोडून ते काढले. तसेच सनातन संस्था माझीच आहे, असे नम्रपणे सांगत प्रवासाचे भाडे घेण्यास नकार दिला.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’