पुणे येथे महाशिवरात्रीनिमित्त लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला लोकप्रतिनिधींची भेट

aba_bagul
सनातनचे ग्रंथ घेतांना आबा बागुल
amdar_madhuri_misal
आमदार माधुरी मिसाळ भेट देतांना
rahul_jadhav
ग्रंथ पहातांना नगरसेवक राहुल जाधव
gauta_chakukswar_ujwikadun2
सनातनच्या ग्रंथांविषयी जाणून घेतांना आमदार गौतम चाबुकस्वार (मध्यभागी)

     पुणे, ९ मार्च (वार्ता.) – महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

     सहकारनगर भागातील अरण्येश्‍वर मंदिरात लावण्यात आलेल्या या प्रदर्शनाला आमदार माधुरी मिसाळ आणि पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी भेट दिली. कासारवाडी येथे लावण्यात आलेल्या प्रदर्शन कक्षाला शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी भेट दिली. चिखली येथेही मनसेचे नगरसेवक राहुल जाधव यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन सनातनचे ग्रंथ खरेदी केले. जिल्ह्यात लावण्यात आलेल्या सर्वच ग्रंथप्रदर्शनांना भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात