फरिदाबाद (हरियाणा) मध्ये तणावमुक्त जीवन या विषयावर आयोजित कार्यक्रमात सनातनच्या साधिकेचे मार्गदर्शन !

Satkaar
सौ. संदीप कौर (डावीकडून तिसर्‍या) यांचा सत्कार करतांना ब्रह्मकुमारी

      फरिदाबाद (हरियाणा), ९ मार्च (वार्ता.) – येथील सेक्टर ११-सी मध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाच्या सेवाकेंद्रात ६ मार्च या दिवशी महाशिवरात्री पावन पर्व का आध्यात्मिक रहस्य एवं राजयोगद्वारा तनावमुक्त जीवन या विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बल्लभगढचे आमदार श्री. मूलचंद शर्मा, लायन्स क्लबचे श्री. बी.एम्. शर्मा, सी ग्रूपचे निर्देशक श्री. बी.आर्. भाटिया, राजयोगिनी बी.के. उषा, सनातन संस्थेच्या सौ. संदीप कौर मुंजाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा लाभ १२५ जिज्ञासूंनी घेतला.

१. या वेळी बोलतांना सौ. मुंजाल यांनी उपस्थितांना महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले.

२. स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन केल्याने स्वत:चे आणि समाजाचे परिवर्तन घडवून आणता येऊ शकते. तणावमुक्त जीवनासाठी ही प्रक्रीया अत्यंत आवश्यक आहे, असेही कौर यांनी सांगितले.

३. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. मुंजाल यांना स्मृतिचिन्ह आणि प्रसाद देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

४. कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या सौ. कुसुम कुलश्रेष्ठ, सौ. उषा रखेजा आणि सौ. सावित्री गर्ग या ही उपस्थित होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात