कुठे हिंदूंची कोटी कोटी वर्षांची परंपरा आणि कुठे पाश्चात्त्यांची केवळ अडीच सहस्त्र वर्षांची परंपरा !

कावेबाज मॅक्समूलर आणि मॅकॉले यांनी सिद्ध केलेल्या हिंदुद्रोही शिक्षणपद्धतीचे शिक्षण घेत वाढलेले बहुतांश हिंदू आज पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानतात. हिंदूंमध्ये असलेला धर्मशिक्षणाचा अभाव हेच हिंदूंच्या या केविलवाणी स्थितीचे मूळ कारण होय. यामुळेच सनातन हिंदु धर्मानुसार हिंदूंच्या नववर्षास गुढीपाडव्याला आरंभ होतो याकडे समाजातील बरेच हिंदू कानाडोळा करतात, किंबहुना किळसवाण्या नजरेने सांगणार्‍यांकडे पहातात. प्रस्तूत लेखातून आपण हिंदु धर्माचा कालमहिमा पहाणार आहोत. यांतून हिंदु धर्माच्या बुद्धीपलीकडील व्याप्तीचा काही अंशी अंदाज येण्याबरोबरच आपल्या महान धर्माच्या अद्वितीयत्त्वाचे दर्शनही घडेल. साधना करणार्‍यांना यांतून आपण अनंत काळाच्या तुलनेत कुठे आहोत, याची जाणीव होऊन त्यांचे अहंनिमूर्लन होण्यास साहाय्य होईल आणि साधनेतील प्रगतीसाठी चालनाही मिळेल.

 

१. काल अनंत आहे. तो कल्प,
मन्वंतर, महायुग, युग असा मोजला जातो.

अ. चार युगे

सत्ययुग = १७ लक्ष २८ सहस्त्र वर्षे
त्रेतायुग = १२ लक्ष ९६ सहस्त्र वर्षे
द्वापरयुग = ८ लक्ष ६४ सहस्त्र वर्षे
कलियुग = ४ लक्ष ३२ सहस्त्र वर्षे

आ. महायुग

महायुग (चतुर्युग) = चार युगांची एकूण वर्षे · ४३ लक्ष २० सहस्त्र वर्षे

इ. मन्वंतर

मन्वंतर = ७१ महायुगे

ई. कल्प

कल्प = १४ मन्वंतरे अथवा १ सहस्त्र महायुगे

१४ मन्वंतर/१ सहस्त्र चतुर्युगे = ४ अब्ज ३२ कोटी वर्षे
(४,३२,००,००,०००)

 

२. कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस किंवा एक रात्र

असे ३६० दिवस + ३६० रात्री = ब्रह्मदेवाचे एक वर्ष
ब्रह्मदेवाचा जीवन काळ = अशी १०० वर्षे
ब्रह्मदेवाच्या जीवनाची ५० वर्षे = विष्णूची एक घडी
विष्णूचा १२ लक्ष काळ = रुद्राचा अर्धा काळ
नंतर नव ब्रह्म, विष्णु, रुद्र यांचे निर्माण.

३. सध्या ब्रह्मदेवाच्या जीवनातली ५० वर्षे
पूर्ण झाली आहेत म्हणजेच १ परार्ध पूर्ण झाला आहे.

१५,५५,२०,००,००,००,००० एवढी वर्षे पूर्ण झाली.
अ. सध्या ५१ व्या वर्षाचा पहिला दिवस, म्हणजे श्वेतवाराह कल्प चालू आहे.

आ. या श्वेतवाराह कल्पाची ६ मन्वंतरे पूर्ण झाली आहेत, तर ७ वे मन्वंतर (वैवस्वत) चालू आहे.

इ. वैवस्वत मन्वंतर हे ७१ महायुगांचे आहे. त्यातली २७ महायुगे पूर्ण झाली आणि २८ वे महायुग चालू आहे. या २८ व्या महायुगात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग पूर्ण झाली आहेत आणि आता कलियुग चालू आहे.

ई. कलियुगामधला पहिला चरण चालू आहे व ५ सहस्त्र १२१ वर्षे पूर्ण झाली आहेत. ५ सहस्त्र १२२ वे वर्ष या गुढीपाडव्याच्या सूर्योदयाला चालू होणार आहे.

उ. या गुढीपाडव्याला चालू होणारे वर्ष हे १ ला परार्ध + (६ (मन्वंतरे) x ७१ x महायुगाचा काळ ) +

(२७ (महायुगे) x ४३,२०,०००) + ३ युगे (सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग ) + ५१२१

ऊ. म्हणजे १५,५५,२०,००,००,००,००० + १,८४,०३,२०,००० + ११,६६,४०,००० + ३८,८८,००० + ५१२१

ए. म्हणजे १५,५५,२१,९६,०८,५३,१२२ वे वर्ष या गुढीपाडव्याला चालू होणार आहे.

१५,५५,२१,९६,०८,५३,१२२ व्या गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा !

(२०२० पर्यंत)

– डॉ. गौतम गोळे

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment