नवी देहलीत सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

नवी देहलीतील पुस्तक मेळाव्यामध्ये लावलेल्या
सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

 

प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू

प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू

नवी देहली – येथील प्रगती मैदानात १५ फेब्रुवारीला जागतिक पुस्तक मेळाव्याला प्रारंभ झाला आहे. या मेळाव्यामध्ये सनातनच्या वतीने ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन श्रीनिवासपुरी, देहली येथील भारत सेवा आश्रम संघाचे स्वामी आत्मजनानंद यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे उपस्थित होते. या प्रदर्शनाला पहिल्याच दिवसापासून जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा मेळावा २३ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.

या वेळी पू. स्वामीजींना पू. डॉ. पिंगळे यांनी सनातन-निर्मित ग्रंथांची माहिती दिली. ग्रंथ पाहून पू. स्वामीजींनी सनातनच्या कार्याचे कौतुक केले. पू. स्वामीजी म्हणाले, सनातनचे कार्य खूप चांगले आहे. तुम्हाला जेव्हा धर्मकार्यासाठी आमचे साहाय्य लागेल, तेव्हा आम्हाला सांगा. आम्ही ती तुम्हाला नक्की देऊ !

क्षणचित्र

सनातनची एक साधिका सभागृहाच्या बाहेर धर्मशिक्षणविषयक माहितीपत्रक वाटत असतांना एक गृहस्थ आले. त्यांनी पत्रक पाहिल्यावर ते म्हणाले, आम्हाला हे पत्रक पाहून बरे वाटले. कारण इथे कुणी बायबल विनामूल्य वाटत आहे, तर कुणी कुराणविषयी सांगत आहे. हिंदूंची संस्कृती वाचवण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करत आहे, हे पाहून बरे वाटले.

 संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’