राऊरकेला (ओडिशा) पुस्तक मेळ्यामध्ये सनातन संस्थेचा सहभाग

Rourkela_Grnth_stall
प्रदर्शनाला भेट देतांना जिज्ञासू

राऊरकेला, १९ फेब्रुवारी – राऊरकेला येथील आदर्श पाठागार या संस्थेने आयोजित केलेल्या २३ व्या राऊरकेला पुस्तक मेळाव्यात सनातन संस्थेने सहभाग घेतला होता. संस्थेचे अध्यात्म, राष्ट्र तथा आरोग्य विषयक ग्रंथ आणि सात्त्विक वस्तूंचे केंद्र लावण्यात आले होते, तसेच धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स फलकही लावण्यात आले होते. प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणार्‍या आणि सलग दहा दिवस चालणार्‍या पुस्तक मेळाव्यात १२४ पुस्तक प्रकाशन संस्था, आध्यात्मिक संस्था आणि ग्रंथ विक्रेते इत्यादींनी सहभाग घेतला होता. सनातनच्या प्रदर्शन केंद्राला शेकडो जिज्ञासूंनी भेट दिली. तसेच अनेक धर्माभिमानी, हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी आदींनीही या प्रदर्शनाला भेट देऊन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या धर्मजागृतीच्या कार्याची माहिती जाणून घेतली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात