संकटकाळी हरि ॐ जय मे जयम् । हा जप करा !

साधकांना सूचना

राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणार्‍या सनातन संस्थेवर धर्मद्रोही आणि प्रसारमाध्यमे सध्या अनेक बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्याशिवाय अन्वेषण यंत्रणांनीही निरपराध साधकांच्या मागे नाहक चौकशीचा ससेमिरा लावला आहे. तसेच काही घटनांमध्ये धर्मद्रोही, पोलीस आणि निधर्मी राजकारणी हेही साधकांना हेतूत: त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. असे कोणतेही संकट निर्माण झाल्यास साधकांनी हरि ॐ जय मे जयम् । हा जप सतत करावा. संकटाची तीव्रता न्यून झाल्यानंतर साधक नेहमीचा नामजप चालू करू शकतात.

– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, तेणी, तमिळनाडू. (१७.२.२०१६, सकाळी ८.१७)