हिंदु संस्कृतीचे जतन करण्यासाठी स्त्रीशक्ती जागृत करणे आवश्यक ! – सौ. सुहासिनी जोशी

स्वधर्माविषयीचा अभिमान वाढवून हिंदु संस्कृतीचे जतन
करण्यासाठी स्त्रीशक्ती जागृत करणे आवश्यक ! – सौ. सुहासिनी जोशी

सनातन संस्थेच्या वतीने गोराई, बोरिवली येथे हळदीकुंकवाचा कार्यक्रम

बोरिवली, (मुंबई), ४ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु धर्म आणि मुली यांवर होणारे आघात थांबवण्यासाठी स्वधर्माविषयीचा अभिमान वाढवून हिंदु संस्कृतीचे जतन करणे महत्त्वाचे असून त्यासाठी स्त्रीशक्ती जागृत करायला हवी, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. सुहासिनी जोशी (वय ७१ वर्षे) यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने येथील गोराई भागात ३० जानेवारीला सायं. ६ ते ७.३० या वेळेत हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला ६५ महिला उपस्थित होत्या.

या वेळी त्यांनी मकरसंक्रात, हळदीकुंकू आणि धर्माचरण यांचे महत्त्व विशद करून सांगितले. भावी पिढीवर होणारा पाश्‍चात्त्य संस्कृतीचा प्रभाव अन् त्याचे होणारे दुष्परिणाम यांचे विवेचन केले. धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांना बळी पडणार्‍या मुलींना अनुभवाव्या लागणार्‍या गोष्टींविषयी सांगितले.

क्षणचित्रे

१. देव, देश आणि धर्मासाठी स्थापन केलेले साहेब प्रतिष्ठानचे श्री. अभय आंगचेकर आणि श्री. नितीन पाटील यांनी पुढाकार घेऊन सर्व स्त्रियांना एकत्रित केले, तसेच त्यांच्यासाठी तीळगूळ वाटपाची आणि वाहनाची व्यवस्था केली.

२. श्री. अभय आंगचेकर, श्री. नितीन पाटील यांनी बैठक व्यवस्था, ध्वनीक्षेपक यंत्रणा, विद्युत रोषणाई यांचीही व्यवस्थाही केली होती.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’