सनातनचे प्रवक्ते श्री. आनंद जाखोटिया यांनी प्रवचनाद्वारे केला हिंदु धर्मजागृती सभेचा प्रचार

सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. आनंद जाखोटिया यांनी
प्रवचनाद्वारे केला कल्याण येथील हिंदु धर्मजागृती सभेचा प्रचार !

श्री कल्याण लोहाणा महाजन वयस्कर समितीची पाक्षिक बैठक
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. आनंद जाखोटिया

कल्याण, २ फेब्रुवारी (वार्ता.) – आपण आपली संस्कृती विसरून पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आहोत. सर्व वयस्कर मंडळींनी आपली मुले आणि नातवंडे यांच्यावर हिंदु संस्कृतीनुसार संस्कार करायचे ठरवले, तर ते सहज शक्य आहे, त्यासाठी आम्ही आपल्याला धर्मशिक्षणवर्गाद्वारे माहिती देऊ. त्याप्रमाणे कृती केल्यास आपल्या घरात पुन्हा सुख आणि शांती नांदेल. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कल्याण शहरात कै. वासुदेव बळवंत फडके मैदानात ६ फेब्रुवारीला भव्य धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्वांनीच सभेला उपस्थित रहावे, असे मार्गदर्शन आणि आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. आनंद जाखोटिया यांनी केले.

सभेच्या निमित्ताने श्री कल्याण लोहाणा महाजन वयस्कर समितीच्या घेतलेल्या पाक्षिक बैठकीत ते बोलत होते. समितीचे कार्याध्यक्ष श्री. भूपतभाई पंचमतिया यांनी ही बैठक यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले. समितीचे सल्लागार मा. मनसुखभाई सूचक म्हणाले, ‘धर्मसभेची निमंत्रण पत्रके आम्हाला छापून द्या. आम्ही ती वाटून हिंदूंना धर्मसभेचे निमंत्रण देतो’. या वेळी सर्व उपस्थितांनी धर्मसभेला येण्याचे आश्वांसन दिले. या प्रसंगी लोहाणा वयस्कर समितीचे ७५ सदस्य उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’