आपत्काळ ओढवण्यामागील कारणे आणि त्यांवरील उपाययोजना

आपत्काळ ओढवण्यामागील कारणमीमांसा जाणून साधना वाढवा आणि ईश्‍वरी राज्य स्थापा !

1403518128_Namjap_kartana_antim_merge_bk

अतिवृष्टिः अनावृष्टिः शलभा मूषकाः शुकाः ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतयः स्मृताः ॥
– कौशिकपद्धति

अर्थ : (राज्यकर्ता धर्मनिष्ठ नसला की, प्रजा धर्मपालन करत नाही. प्रजेने धर्माचे पालन न केल्यामुळे) अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात.

तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.

१. मुद्रा-उपाय, मंत्रजप आदी उपाय हे सूक्ष्म-स्तरावरील उपाय असल्याने या उपायांचा अपेक्षित परिणाम होण्यासाठी उपाय करणार्‍यामध्ये श्रद्धा, भाव यांसारखे ईश्‍वरी गुणही असावे लागतात. ते साधनेमुळेच निर्माण होऊ शकतात.

२. सध्याचा समाज धर्माचरणापासून दुरावला आहे. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांच्यावर अनेक संकटे ओढवली आहेत. एकेका संकटाचा प्रतिकार करण्यापेक्षा संपूर्ण समाजाला नीतीमान बनवणारे, म्हणजे सर्व संकटांचा समूळ नाश करणारे आणि विश्‍वकल्याणाचे ध्येय बाळगणारे धर्माधिष्ठित ईश्‍वरी राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे. यासाठी सर्वांनी धर्मपालक आणि नीतीमान राज्यकर्त्यांनाच निवडून दिले पाहिजे.