सनातन संस्थेच्या गुजरातमधीलकार्याचा डिसेंबर २०१३ चा संक्षिप्त आढावा

१. धर्मप्रसार कार्याचा आढावा

जिल्ह्याचे नाव जिज्ञासूंना संपर्क सनातन-निर्मित ग्रंथांचे वितरण (रुपये) सनातन-निर्मित उत्पादनांचे वितरण (रुपये) सनातन प्रभातचे नवे वर्गणीदार
अहमदाबाद ३,१७० ७,६७४
बडोदा २,२३८ १०,५७७
वापी ८०० १२,०५०

२. धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांचा अनुकरणीय सहभाग दर्शवणारा केंद्रनिहायआढावा

२ अ. कर्णावती (अहमदाबाद)

१. डभोडा हनुमान मंदिर (गांधीनगर) : येथे लावलेल्या ग्रंथप्रदर्शनात ४०० गुजराती पंचांगाचे वितरण झाले. या प्रदर्शनाला श्री. विष्णुभाई भरतभाई देसाई या उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी भेट दिली आणि सनातन संस्था अन् हिंदू जनजागृती समिती यांचे कार्य जाणून ते प्रभावित झाले. तुम्ही हिंदुत्वाच्या कार्यासाठी कुठेही बोलवा, मी यायला सिद्ध आहे. डभोडा या विस्तारात कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास मला संपर्क करा, असे त्यांनी सांगितले.

२. संतराम मंदिर (नडीयाद) : या मंदिराच्या महाराजांनी पंचांग पाहूनच पंचाग वितरणाची अनुमती दिली. या परिसरात ते कोणालाही विक्री करण्याची अनुमती देत नाहीत.

३. कर्णावतीमधील चांदखेडा विभागातील श्री. मुकेश कौशल या मंडपवाल्याने ७०० पंचांगांचे वितरण केले आणि संस्थेच्या कार्यक्रमांसाठी विनामूल्य मंडप देण्याची सिद्धताही दर्शवली.

४. श्री. घनश्यामभाई पटेल हे साणंद गावातील वन्दे मातरम् मिशन या नावाखाली कार्य करत आहेत. ते प्रखर हिंदुत्ववादी आहेत आणि राष्ट्रविषयक कार्यक्रम करतात.

५. अहमदाबाद येथे १६.१२.२०१३ या दिवशी तिरूपती येथे उभारण्यात येत असलेल्या इस्लामिक विश्‍वविद्यालयाच्या विरोधातील आंदोलन झाले. या आंदोलनासाठी गृहमंत्रालय खात्यातील क्राईम ब्रँचमधील अधिकारी श्री. सी.आर. पटेल हे उपस्थित होते. त्यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली. काशी, मथुरा आणि अयोध्या यांसारखी स्थिती तिरूपतीमध्ये निर्माण न होण्यासाठी अशी आंदोलने व्हायला पाहिजेत, असे वक्तव्य केले. आंदोलन पूर्ण होईपर्यंत ते थांबले होते. (आंदोलनाला आलेले असे अधिकारी हितचिंतक म्हणूनच आले आहेत, अशा भ्रमात साधकांनी राहू नये. – संकलक)

६. डीसा या गावातील (बनासकांठा जिल्हा) अ‍ॅडव्होकेट श्री. नरेंद्रभाई माधु हे हिंदुत्ववादी आहेत. त्यांना आपले कार्य आवडले असून त्यांनी अहमदाबाद येथील केंद्राला भेटही दिली आहे.

२ आ. बडोदा केंद्र

१. कुबेरेश्‍वर दत्तमंदिर येथे दत्तजयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.

२ इ. वापी केंद्र

१. वापी येथे दक्षिण आफ्रिकेत रहाणारे श्री. चेतनभाई शुक्ल भेटलेे. ते तेथे व्यवसाय करतात, तसेच त्यांच्याकडे आणि त्यांच्या भावाकडे दोन देवळांचे दायित्व आहे. त्यांना दक्षिण आफ्रिकेत इंग्रजी आणि गुजराती सनातन प्रभात, तसेच इंग्रजी अन् गुजराती धर्मशिक्षण फलकग्रंथ हवे आहेत. त्यांना तेथे कार्य चालू करण्याची इच्छा आहे.

२. भरूचचे प.पू. ओंकारेश्‍वरानंदजी देवद येथील सनातनच्या आश्रमात येऊन गेले. त्यांनी भरूच-अंकलेश्‍वर येथे कार्य चालू करण्यास सांगितले आहे.

३. उमरगावचे श्री. जयेश गोर यांनी सनातन प्रभातला पुढील १ वर्षासाठी ६०,००० रुपयांचे विज्ञापन आनंदाने दिले. मागील २ वर्षांपासून ते असे विज्ञापन देत आहेत.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’