ओडिशा राज्यातीलधर्मप्रसाराच्या कार्याचा डिसेंबर २०१३ मधील आढावा

ओडिशा राज्यातील सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या कार्याचा डिसेंबर २०१३ मधील संक्षिप्त आढावा

जिज्ञासूंना दिलेल्या वैयक्तिक संपर्कांची संख्या

जिज्ञासूंना दिलेल्या वैयक्तिक संपर्कांची संख्या : १९४

ओडिशा राज्यात अग्रणी असलेल्या राजधानी बूक फेअरमध्ये
आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला मिळालेला उत्तम प्रतिसाद !

प्रतिवर्षी भुवनेश्‍वर येथे आयोजित करण्यात येणार्‍या पुस्तक मेळ्यांमध्ये राज्यातील अग्रणी असलेल्या राजधानी बूक फेअरमध्ये सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाला ओडिशा राज्यातील जिज्ञासूंनी सहस्रोंच्या संख्येने भेट दिली.

अ. ४.१२.२०१३ ते १५.१२.२०१३ या कालावधीत येथील एक्झिबिशन ग्राऊंडवर आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात सनातन-निर्मित अध्यात्म, राष्ट्ररक्षण, आयुर्वेद इत्यादी विषयांवरील ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि सनातन पंचांग २०१४ यांचे महत्त्व समजून घेऊन शेकडो जिज्ञासूंनी हे साहित्य खरेदी केले. संस्थेचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्यही सहस्रो जिज्ञासूंनी उत्साहाने अन् जिज्ञासेने जाणून घेतले.

आ. या प्रदर्शनात उडिया भाषेतील ग्रंथ आणि लघुग्रंथ यांचे चांगले वितरण झाले. यांमध्ये २९६ ग्रंथ, १ सहस्र १२२ लघुग्रंथ आणि ३३७ सनातन पंचांगे यांचे वितरण झाले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून १७ सहस्र ९८६ रुपयांचे वितरण झाले. ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने घेणार्‍या १४८ जिज्ञासूंचे संपर्क क्रमांक प्राप्त झाले.

इ. क्रियायोग आंतरराष्ट्रीय संस्थानचे संत स्वामी प्रज्ञानानंद यांनी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या सात्त्विक चित्राविषयीची माहिती जिज्ञासेने ऐकून घेतली, तसेच सनातनचे कार्य, आध्यात्मिक ग्रंथ आणि साहित्य निर्मिती यांविषयी समाधान व्यक्त केले.

ई. योग वेदांत समितीचे तरुण आणि अभियांत्रिकी शाखेत उच्च शिक्षण घेत असलेले २ – ३ साधक प्रतिदिन प्रदर्शनाला भेट देऊन कापूर आणि अत्तर यांची उपायपद्धती जाणून घेत होते. ते प्रतिदिन निरनिराळ्या ४ – ५ मित्रांना घेऊन येऊन त्यांना ही माहिती समजावून सांगण्यास साधकांना सांगत होते.

राज्यस्तरीय जादूगार श्री. कृष्णचंद्र त्रिपाठी आणि
अधिवक्ता श्री. ब्रीजेश मिश्रा यांचा सत्संगाचे आयोजन करण्यातील उत्स्फूर्त सहभाग !

राऊरकेला येथील राज्यस्तरीय जादूगार श्री. कृष्णचंद्र त्रिपाठी यांनी त्यांच्या घरी सत्संगाचे आयोजन केले. त्यांच्या वसाहतीतील १५ जिज्ञासू या सत्संगाला उपस्थित होते. मुसलमान, ख्रिस्ती, काँग्रेस शासन, प्रसिद्धीमाध्यमे इत्यादींकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात धर्महानी केली जाते, याविषयी आम्ही अनभिज्ञ होतो, यासंदर्भातील माहिती नव्यानेच ऐकायला मिळाली, असे मत सहभागी जिज्ञासूंनी व्यक्त केले. धर्माभिमानी अधिवक्ता श्री. ब्रीजेश मिश्रा यांनी या सत्संगाच्या आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले.

येथील राज्यस्तरीय जादूगार श्री. कृष्णचंद्र त्रिपाठी यांनी प्रत्येक पंधरवड्याला सत्संगाचे आयोजन करण्यास सांगितले.

सनातन पंचांगांचे झालेले भरघोस वितरण

ओडिशा राज्यामध्ये २०१४ च्या सनातन पंचांगांच्या उडिया भाषेतील १० सहस्र, हिंदी भाषेतील ७५० आणि इंग्रजी भाषेतील १०० अशा एकूण १० सहस्र ८५० प्रती वितरित करण्यात आल्या.

– श्री. प्रकाश मालोंडकर, भुवनेश्‍वर, ओडिशा.


राष्ट्रीय तंत्रविज्ञान संस्थेमध्ये राष्ट्राची सद्यःस्थिती, कारणे आणि उपाययोजना
या विषयावरील व्याख्यानाला राष्ट्र आणि धर्म प्रेमी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद !

राऊरकेला येथील राष्ट्रीय तंत्रविज्ञान संस्थेमध्ये (नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) राष्ट्राची सद्यःस्थिती, कारणे आणि उपाययोजना या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी तेथील विद्यार्थ्यांना हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ध्वनी-चित्रचकत्यांच्या साहाय्याने मार्गदर्शन केले. या वेळी पदव्युत्तर शिक्षण घेणारे २२ राष्ट्र आणि धर्म प्रेमी विद्यार्थी उपस्थित होते. काही विद्यार्थ्यांनी अध्यात्मशास्त्राविषयीचे ग्रंथ जिज्ञासेने खरेदी केले.

येथील राष्ट्रीय तंत्रविज्ञान संस्थेमध्ये राष्ट्राची सद्यःस्थिती, कारणे आणि उपाययोजना या विषयावर मासातून (महिन्यातून) न्यूनतम एकदा मार्गदर्शन आयोजित करण्याची विद्यार्थ्यांनी सिद्धता दर्शवली.

– श्री. प्रकाश मालोंडकर, भुवनेश्‍वर, ओडिशा.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’