अध्यात्मातील विविध पातळ्यांना होणा-या त्रासाचे प्रधान स्वरूप, त्रासाचे प्रमाण आणि त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रमाण

आध्यात्मिक पातळी

अध्यात्मातील विविध पातळ्यांना होणार्‍या त्रासाचे प्रधान स्वरूप, त्रासाचे प्रमाण आणि त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रमाण : सनातनचे साधक आणि संत तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करत समष्टी साधना करत असतांना त्यांना वाईट शक्तींचा त्रास का होतो ?, असा प्रश्‍न काही जणांच्या मनात निर्माण होतो. त्याचे उत्तर पुढील तक्त्यावरून लक्षात येईल.

आध्यात्मिक पातळी
(टक्के)

त्रासाचे प्रधान स्वरूप

त्रासाचे प्रमाण (टक्के)
व्यष्टी साधनेचे प्रमाण (टक्के) समष्टी साधनेचे प्रमाण (टक्के)
१० – ३० शारीरिक आणि  मानसिक ५० (टीप १)  ०
३१ – ६० मानसिक ५० ७० ३० (टीप २) 
६१ – ८० आध्यात्मिक ३० ३० ७० (टीप ३)
८१ – ९० २० २० ८०
९१ – ९९ १००

टीप १ – हे साधना करत नसल्यामुळे त्यांना होणारे त्रास प्रामुख्याने प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म यांमुळे होतात.

टीप २ – यांतील काही जण समष्टी साधना करत नसले, तरी त्यांच्यातील सत्त्वगुण वाढल्यामुळे त्यांची अप्रत्यक्षपणे समष्टी साधना होते. त्यामुळे त्यांनाही त्रास होतो.

टीप ३ – यांच्याकडून अधिक प्रमाणात समष्टी साधना होत असल्यामुळे त्यांना ते मुक्त होईपर्यंत, म्हणजे १०० टक्के पातळी गाठीपर्यंत वाढत्या प्रमाणात त्रास होतात.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले