प्राणी आणि पक्षी यांना मृत्यूत्तर चांगली गती मिळण्यासाठी त्यांच्या मृत्यूसमयी करावयाचे आध्यात्मिक उपाय !

काही घरांमध्ये एखादा प्राणी अथवा पक्षी याचे दीर्घकाळ संगोपन केले जाते. वर दिल्याप्रमाणे संबंधित व्यक्तीने त्यांच्यासाठी काही धार्मिक उपाय केल्यास त्याचा त्यांना पुढील जीवनासाठी उपयोग होईल.

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या संदर्भात पू. उमेश शेणै यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

साधकांच्या मनात सातत्याने काही ना कारणाने विकल्प येत असतात. त्यामुळे त्यांच्या मनाची स्थिती खाली-वर होत असते. साधकांच्या केवळ वेळेचीच नव्हे, तर व्यष्टी आणि समष्टी साधनेचीसुद्धा हानी होते. याच संदर्भात पू. उमेशण्णांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

तमोगुणाचा प्रभाव न्यून करून व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांत सात्त्विक परिवर्तन करणारी सात्त्विक उत्पादने !

देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या गोअर्क, कापूर, उदबत्ती आदी सात्त्विक उत्पादनांच्या वापरामुळे व्यक्तीला चैतन्य आणि देवतांची तत्त्वे यांचा लाभ होतो. यांच्या नित्य वापरामुळे व्यक्तीतील तमोगुण न्यून होतो. त्याचप्रमाणे व्यक्तीने धर्माचरण करण्यासाठीही यांचे साहाय्य होते..

मंडपातील पावित्र्य टिकून ठेवणे महत्त्वाचे !

मुंबईतील प्रसिद्ध अंधेरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जीन्स, स्कर्ट परिधान करून येणार्‍या महिलांना, तसेच अर्धविजार घालून येणार्‍या पुरुषांना गणपतीचे दर्शन घेण्यास प्रतिबंध केला. सात्त्विकता टिकवण्याच्या दृष्टीने मंडळाने निर्णय घेतला.

सनातन संस्थेच्या वतीने गोकुळाष्टमीनिमित्त देहली, हरियाणा आणि उत्तरप्रदेश यांठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन !

देहली येथे जी.के. २, वसंत कुंज, न्यू कोण्डली, न्यू अशोकनगर, अशा एकूण ४ ठिकाणी, हरियाणातील गुरुग्राम आणि उत्तरप्रदेशमध्ये नोएडा येथे एका ठिकाणी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी सनातनचा दृष्टीकोन

सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा समाज एकत्रित येऊन भव्य मोर्चे काढत आहे. मराठा समाज हिंदु समाजाचे अभिन्न अंग आहे. त्यामुळे या माध्यमातून हिंदु समाजाचेच एक प्रकारे संघटन होत आहे, अशी सनातनची एकप्रकारे धारणा आहे..

मंगळुरू (कर्नाटक) येथे सात दिवसीय राज्यस्तरीय शिबीर भावपूर्ण वातावरणात संपन्न

साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि विहंगम धर्मप्रसार व्हावा, याकरता १० ते १६ सप्टेंबर या कालावधीत येथे साधनावृद्धी आणि विहंगम धर्मप्रसार हे ७ दिवसीय राज्यस्तरीय शिबीर उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले.

बलुची मुसलमान करतात हिंगलाज मातेची पूजा !

बलुचिस्तानमधील मुसलमान ५१ शक्तिपिठांपैकी एक असलेल्या हिंगलाज मातेची पूजा करतात. सत्ताधिशांनी अनेक वेळा हे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला; परंतु बलुच लोकांनी प्राणपणाने या मंदिराचे रक्षण केले आहे.

श्री दुर्गादेवीची मूर्ती सिद्ध करतांना मूर्तीकाराने पाळावयाचे आचारधर्म, करावयाची साधना अन् त्यामागील शास्त्र

मूर्तीचा रंग, आकार, उंची आणि त्या मूर्तीत देवत्व आणणे ही दैवी कला आहे. मूर्तीकाराला आचारधर्माचे पालन आणि साधना केल्यामुळे ही कला आत्मसात होते; परंतु मूर्तीकाराला याचे ज्ञान नसल्याने आणि मूर्ती सिद्ध करण्यामागे केवळ व्यावसायिक दृष्टीकोन असल्यामुळे मूर्तीत देवत्व अल्प प्रमाणात येते.

जय जवान गणेशोत्सव मंडळात धर्मशिक्षण आणि क्रांतीकारकांची माहिती देणारे फ्लेक्सप्रदर्शन !

६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत लावलेल्या या प्रदर्शनाचा लाभ ६०० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला. पोलीस उपनिरीक्षक श्री. रत्नदीप साळोखे यांनी प्रदर्शन पाहून अन्य गोष्टींना फाटा देऊन एक चांगला उपक्रम राबवल्यामुळे मंडळातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.