ग्रहणाचा गुरु, सद्गुरु आणि परात्पर गुरु या पदांवरील संतांवर झालेला परिणाम

‘ग्रहणाचा ‘गुरु’, ‘सद्गुरु’ आणि ‘परात्पर गुरु’ या पदांवरील (विविध आध्यात्मिक पातळीच्या) संतांवर (टीप) काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली.

जळगाव जिल्ह्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या विरोधात विविध उपक्रमांद्वारे प्रबोधन

सनातन संस्थेचे श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी धर्मचरणाचे महत्त्व, तसेच धर्मरक्षणासाठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

पाश्‍चिमात्य संस्कृती आणि विचार यांपासून रक्षण करण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

आज हिंदू पाश्चिमात्य संस्कृती आणि विचार यांना बळी पडत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी ‘नारीशक्ती’ या विषयावरील आयोजित कार्यक्रमात केले.

गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून मनापासून साधना करणे आवश्यक ! – रमानंद गौडा, सनातन संस्था

सध्या आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया मनापासून आणि गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून राबवणे क्रमप्राप्त आहे. अंतःकरण शुद्धी झाली, तरच आपण भगवंताच्या समीप जाऊ शकतो. त्यासाठी आपण सर्वांनी अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत.

महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात विविध ठिकाणी लावलेले सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाला मान्यवरांच्या भेटी अन् ग्रंथांचे कौतुक

कल्याण येथील श्री शंकर मंदिरात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला येथील भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार यांनी भेट दिली. त्यांनी सनातनच्या ग्रंथांची माहिती जाणून घेत ग्रंथ खरेदीही केली.

रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सनातन संस्थेकडून सदिच्छा भेट

९ फेब्रुवारी या दिवशी कामोठे येथे रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांची हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर आणि सनातन संस्थेच्या सौ. संगीता लोटलीकर यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी पनवेलचे आमदार श्री. प्रशांत ठाकूर हेही उपस्थित होते.

सनातनचे कार्य चांगले आहे, ते चालूच ठेवा ! – केंद्रीयमंत्री अनंत कुमार

बेंगळुरू येथे सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त, म्हणजेच १३ फेब्रुवारीला सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक वस्तूंचे प्रदर्शन लावले होते. त्या प्रदर्शनाला केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी नुकतीच भेट दिली.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्रांची कुंडली

ज्योतिषशास्त्रानुसार प्रभु श्रीरामाच्या कुंडलीचा अभ्यास संक्षिप्त स्वरूपात देत आहे. प्रभु श्रीरामाच्या कुंडलीविषयी अनेक मते असल्याने भिन्न कुंडल्या आहेत. प्रभु रामचंद्रांची अभ्यासण्यासाठी घेतलेली कुंडली महाराष्ट्राचा कुंडली-संग्रह (लेखक म.दा. भट, व.दा. भट) या ग्रंथातून घेतली आहे.

सनातन संस्थेकडून महाशिवरात्रीनिमित्त देशभर ६५० हून अधिक ठिकाणी धर्मप्रसार

सनातन संस्थेच्या वतीने देशभरातील विविध शिवमंदिरांमध्ये ६५० हून अधिक ठिकाणी ग्रंथ आणि सात्त्विक साहित्यांचे वितरण कक्ष, तसेच शिवाची अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगणारे फलक लावून धर्मप्रसार करण्यात आला.

‘महाशिवरात्रीला शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक न करता ते दूध अनाथांना द्या’, असे धर्मद्रोही आवाहन करणार्‍यांना बाणेदारपणे पुढील उत्तर द्या !

दुधामध्ये शिवाचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्याने दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून शिवाचे तत्त्व लवकर जागृत होते. त्यानंतर ते दूध तीर्थ म्हणून प्राशन केल्याने त्या व्यक्तीला शिवतत्त्वाचा अधिक लाभ होतो.