संत सखुबाई

श्री विठ्ठलाप्रती निस्‍सीम भक्‍ती आणि पराकोटीचा भाव असणाऱ्या संत सखुबाई कायमच्‍या अजरामर झाल्‍या. संत सखुबाई भगवद़्‍भक्‍तीत सदैव लीन असत.

कृष्णभक्त संत मीराबाई

ईश्वर निर्गुण-निराकार आणि सगुण-साकारही आहे. निराकार चेतन रूपात सृष्टीत भरलेला आहे. त्याच्याविना कुठेही काही नाही. वस्त्रात सूत असते आणि लाटेत पाणी असते, तसा तो सर्वत्र आहे. त्याच्याविना जगात कुठली सत्ता नाही. या गोष्टी ऐकून विश्वास ठेवावा लागतो. श्रद्धा आणि विश्वास यांच्याविना काही हाताला लागत नाही.

अनासक्त, देहभान विसरून मूर्ती घडवण्याची सेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे कारवार येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) (वय ८२ वर्षे) !

कारवार (कर्नाटक) येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) (वय ८२ वर्षे) यांच्याकडून सनातन संस्थेने श्री सिद्धिविनायकाची मूर्तीे घडवून घेतली. सनातन संस्थेचे साधक श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार त्यांच्याकडे शिल्पकला शिकण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांना गुरुजींकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

अत्यंत साधी रहाणी असलेले, प्रेमळ आणि निःस्पृह पंत महाराज बाळेकुंद्री !

पंतांची राहणी अत्यंत साधी असून ते प्रेमळ आणि निःस्पृह होते. त्यांनी आपल्या प्रेमाने आणि सौजन्याने संसार आनंदमय बनवून आपले अवतार कार्य वयाच्या ५१ व्या वर्षी समाप्त केले.

संत वेणाबाई

वेणाबाईंची समाधी सज्जनगड येथे आहे. रामदासस्वामींनी इ.स.१६५६ मध्ये बांधलेला वेणाबाईंचा मठ मिरज येथे आहे. वेणाबाईंना आदराने वेणास्वामी असे म्हटले जाते. 

थोर गणेशभक्त मोरया गोसावी आणि गाणपत्य संप्रदाय

‘गाणपत्य’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या संप्रदायामध्ये श्री गणपतीला परब्रह्म, परमात्मा कल्पिले असून त्यापासून इतर देवदेवतांची उत्पत्ती झाली आहे, अशी श्रद्धा आहे.

‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग २)’ या सनातनच्या ग्रंथातील भजन अन् त्याचा भावार्थ !

सनातनचा ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग २)’ या ग्रंथातील भजनांच्या भावार्थांचे लिखाण प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त कै. चंद्रकांत (दादा) दळवी आणि त्यांना साहाय्य त्यांची कन्या सौ. उल्का नितीन बगवाडकर यांनी केले आहे.

साधक आणि भक्त यांच्यासाठी प्रासादिक ठेवा असलेली प.पू. भक्तराज महाराज यांची चैतन्यमय भजने अन् त्यांचे भावार्थ !

चला जाऊ नाथ सदनाला । साई सदनाला ।
सर्व सौख्याचा लाभ होईल आपणाला ।।

होती ऐसी, नाही झाली संत मुक्ताबाई !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या बहीण संत मुक्ताबाई यांनी जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद (आताचे मुक्ताईनगर) येथे समाधी घेतली. संत ज्ञानेश्वरादि चार भावंडांत संत मुक्ताबाई आपल्या वैशिष्ट्याने प्रसिद्ध आहेत. चौदाशे वर्षे जिवंत राहून गर्व करणाऱ्या योगेश्वर चांगदेवांच्या त्या गुरु होत्या.

भोळ्याभावाच्या माध्यमातून भक्तीचे रहस्य अनुभवणारे ईश्वरपूर (सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान !

आज पांडुरंगाची ‘एकादशी’ आणि आजच्याच दिवशी विठ्ठलाने नरुटेकाकांना संतपदी विराजमान केले. यातून सर्वकाही कसे ईश्वरनियोजित असते, हे लक्षात येते.