ईश्‍वराच्या चरणकमली समर्पित करण्यासाठी केलेली ‘नादोपासना’ सर्वश्रेष्ठ

‘अपेक्षा ठेवून गाणारा कलाकार आणि स्वतःच्या सुख-समाधानासाठी ऐकणारा श्रोता, हे दोघेही श्रेष्ठ नाहीत, तर ‘ईश्वरार्पण करणे’, म्हणजेच आपली कला किंवा विद्या ईश्वरचरणी अर्पण करणे, हे श्रेष्ठ आहे.’

वेदना न्यून करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी संगीत उपयुक्त असल्याचे ब्रिटीश विद्यापिठाचे संशोधन

वेदना न्यून करणे, तसेच एखाद्या दुर्धर आजारावर मात करतांना मनाची स्थिती चांगली रहावी किंवा एकाग्रतेत वाढ व्हावी, यासाठी संगीत उपचारांचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे संशोधन ब्रिटनमधील ‘अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटी’ने केले आहे.

संगीताचा सराव कसा करावा ?

‘संगीत ही ईश्वराची देणगी आहे. ‘ज्याच्यावर देवाची कृपा आहे, तो गाऊ शकतो’, असे म्हटले जाते; परंतु ईश्वराने सर्वांना स्वतःच्या क्रियमाणाने स्वतःचे स्वप्न साकार करण्याची शक्ती दिली आहे.

गायनासंदर्भात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन

आपण आरती म्हणण्यास आरंभ केल्यानंतर त्या देवतेचे सगुण तत्त्व कार्यरत होते आणि आरतीतील ओळीतील शेवटचे अक्षर म्हणून थांबल्यावर पुन्हा निर्गुण तत्त्व कार्यरत होते,

गायन सेवा सादर करणार्‍या दोन साधिकांपैकी एकीचे डोळे बंद असणे आणि दुसर्‍या साधिकेचे डोळे उघडे असणे यांमागील शास्त्र !

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचा ७७ व्या जन्मोत्सवाच्या वेळी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी यांनी गायनाच्या माध्यमातून स्वरांजली अर्पण केली.

भारतीय शास्त्रीय संगीत ऐकून निद्रानाशापासून मुक्ती मिळालेला इटलीचा हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी !

वर्ष १९२२ ते १९४३ ही दोन दशके इटलीवर अधिराज्य गाजवणारा आणि जगात कुप्रसिद्ध असलेला हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी ! त्याला एकदा निद्रानाशाने ग्रासले.

केवळ गुरुकृपेनेच भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असलेल्या शास्त्रीय संगीताचे महत्त्व कळून साधकाला आलेली आनंदाची अनुभूती !

प्रत्येक व्यक्तीतील सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचे प्रमाण निरनिराळे असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात. संगीताच्या संदर्भातही असेच आहे. प्रत्येक व्यक्ती तिची प्रकृती आणि आवड यांनुसार संगीत ऐकत असते.

दोन वेगवेगळ्या विकारांवर परिणाम करणारा राग एकच असला, तरी त्या विकारांच्या संदर्भात तो वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत असणे

भारतीय शास्त्रीय संगीतातील एखादा राग दोन वेगवेगळ्या विकारांवरही परिणामकारक असू शकतो. येथे दिलेल्या उदाहरणांमध्ये गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी एखादा राग त्या दोन विकारांसाठी वेगवेगळ्या दिवशी गातांना त्या रागाची एकच बंदीश गायली होती.

सूरतपस्विनी : माँ अन्नपूर्णादेवी !

एक शांत, स्वस्थ, आत्मस्थ मुखमुद्रा आणि नखशिखांत साधेपणा; कलेच्या क्षेत्रातील अन् सूरबहार हे दैवी सुरावटीचे वाद्य सुरेलपणे वाजवू शकणारे एक उत्तुंग व्यक्तीमत्त्व; संपूर्ण आयुष्य कलेला वाहिलेले असूनही मोहमायेच्या जगापासून संपूर्ण अलिप्त असणारे प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तीमत्त्व म्हणजे माँ अन्नपूर्णादेवी !

भारतीय शास्त्रीय संगीताची निर्मिती आणि तिची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

मन सात्त्विक अवस्थेत असतांना मुखावाटे किंवा वाद्य वाजवल्याने प्रगट होणारा नाद सात्त्विक असतो. या सात्त्विक नादालाच ‘भारतीय शास्त्रीय संगीत’, असे संबोधले जाते. संगीत ही दिव्यत्वाशी संबंधित दैवी कला असून संगीताची उपासना, म्हणजे भगवंताला केलेली प्रार्थना आहे.