Category Archives: सनातनचे अद्वितीयत्व

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडवणारी सौ. उमा रविचंद्रन यांनी रेखाटलेली भावचित्रे

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चेन्नई येथील सौ. उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडते. त्यांनी त्या चित्रांचे विवरणही केले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे.

Read More »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रामानंद परब यांनी रंगवलेली त्रिनेत्र गणेशाची शिळा पाहून त्यांचे कौतुक करणे आणि त्रिनेत्र गणेशाचे डोळे अगदी सजीव झाल्याचे सांगणे

रामनाथी आश्रमाच्या परिसरात स्थापन करायची त्रिनेत्र गणेशाची शिळा आश्रमातील साधक श्री. रामानंद परब यांनी शेंदरी रंगाने रंगवली आणि तिच्यावर गणेशाचे त्रिनेत्र काढले. अशी ही शिळा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दाखवल्यावर ते म्हणाले, किती छान रंगवले आहे.

Read More »

सनातनच्या १ सहस्र साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्यांचे संतत्वाच्या दिशेने मार्गक्रमण !

हिंदु धर्मात कोणत्याही योगमार्गाने साधना केली, तरी आध्यात्मिक उन्नती करता येते; मात्र ही उन्नती शीघ्रगतीने व्हावी, यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली.

Read More »

खडतर जीवन आनंदाने कंठून देवाशी अनुसंधान साधत संतपद गाठणारे देवीहसोळ (रत्नागिरी) येथील पू. जनार्दन कृष्णाजी वागळे (वय ९४ वर्षे ) !

देवीहसोळ (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. जनार्दन कृष्णाजी वागळे (वय ९४ वर्षे) यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत केले. त्यांचे कौटुंबिक जीवन, त्यांच्या साधनेला झालेला प्रारंभ, त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिल्या आहेत.

Read More »
६१ टक्के पातळीला मायेतून मुक्त होता येते, म्हणजे काय होते, यावर सुचलेले विचार आणि ६१ टक्क्यांच्या पुढे जाण्यासाठी करावयाचे प्रयत्न

६१ टक्के पातळीला मायेतून मुक्त होता येते, म्हणजे काय होते, यावर सुचलेले विचार आणि ६१ टक्क्यांच्या पुढे जाण्यासाठी करावयाचे प्रयत्न

प्रस्तुत लेखात ६१ टक्के पातळी गाठलेल्यांनी आणखी पुढे जाण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न करायला हवेत, हे दिले आहे. त्यांच्या दृष्टीने साधनेतील कोणत्या सूत्रांना महत्त्व आहे, हे या लेखात स्पष्ट होते.

Read More »
१ सहस्र साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा टप्पा गाठणे, ही सत्त्वगुणी समाजनिर्मितीची प्रचीती !

१ सहस्र साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा टप्पा गाठणे, ही सत्त्वगुणी समाजनिर्मितीची प्रचीती !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याचे महत्त्व, ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी करावयाचे प्रयत्न, ६१ टक्के पातळी गाठल्यानंतर पुढील आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचे प्रयत्न आणि ६१ टक्के पातळी गाठू न शकलेल्या साधकांनी निराश न होता लक्षात घ्यायचे दृष्टीकोन, यांविषयी आतापर्यंत लिखाण करून परात्पर गुरुमाऊलींनी सर्वांनाच योग्य दिशा दिली आहे

Read More »
‘हिंदु राष्ट्रा’च्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके आणि युवा साधक !

‘हिंदु राष्ट्रा’च्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके आणि युवा साधक !

परात्पर गुरुमाऊलीशी अंतर्मनाने जोडलेली आणि हिंदु राष्ट्र समर्थपणे चालवू शकणारी ६१ टक्के अथवा त्याहून अधिक पातळी गाठलेली दैवी बालके ! ईश्‍वराने उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या शेकडो बालसाधकांची सनातनला करून दिलेली ओळख आणि त्यांचे अध्यात्मातील असामान्यत्व !

Read More »

गुरुमाऊलीने असा दिला आनंद साधकांना !

ईश्‍वरप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित होऊन साधना करणार्‍या साधकाच्या जीवनात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त होणे, हा अद्वितीय क्षण असतो. त्या क्षणीचे साधकांच्या मुखावरील भाव पाहून इतरांचीही भावजागृती होते.

Read More »

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात धनाची उणीव भासू नये, यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेनुसार श्री लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन !

‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात धनाची उणीव भासू नये, यासाठी सप्तर्षि जीवनाडीपट्टीद्वारे मार्गदर्शन करणार्‍या महर्षींनी ‘सर्व आश्रम आणि जिल्हे यांठिकाणी असलेल्या ‘धनसंचयामध्ये मोगर्‍याची फुले ठेवा’, अशी आज्ञा दिली होती.

Read More »

महर्षि भृगु यांच्या आदेशानुसार रामनाथी येथील सनातन आश्रमात ‘विष्णुयाग’ संपन्न !

होशियारपूर, पंजाब येथील भृगुसंहिता वाचक भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून महर्षि भृगु यांनी दिलेल्या आदेशानुसार येथील सनातनच्या आश्रमात माघ पौर्णिमा, अर्थात् १० फेब्रुवारी २०१७ या दिवशी ‘विष्णुयाग’ करण्यात आला.

Read More »