२५ वर्षांहून अधिक काळ होत असलेला ‘एक्झिमा’चा त्रास ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यावर एका मासातच दूर होणे

बहिणीने आरंभी नामजप न करणे, तिला साधनेच्या दृष्टीकोनातून नामजप आणि भावप्रयोग करायला सांगितल्यावर तिने नियमितपणे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करणे

मुलुंड (मुंबई) येथे सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा स्थळाच्या प्रवेशद्वाराजवळ साधक बसलेल्या रिक्शावर झाड कोसळूनही साधक आणि रिक्शाचालक सुखरूप !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी कार्यरत असणार्‍या गुरुतत्त्वानेच सनातनच्या साधकांचे रक्षण केल्याचे दर्शवणारी घटना!

चारचाकी गाडीवर विजेचा खांब पडल्यावर झालेल्या अपघातात गुरुकृपेने कोणत्याही प्रकारची दुखापत न होणे

३१.१२.२०२१ या दिवशी चारचाकी गाडीने मी आणि ४ साधक नोएडाहून मथुरेला जात होतो. माझ्या चारचाकीच्या पुढे एक ट्रक (मालगाडी) होता. त्या ट्रकमध्ये अगदी वरपर्यंत सामान भरले होते. मार्गावरील विजेच्या तारा त्या सामानात अडकल्या आणि तो ट्रक त्या तारांना तसाच ओढत पुढे चालला होता.

साधकाच्या घरी असलेल्या देवघरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये झालेले पालट आणि आलेल्या अनुभूती

देवघरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला नमस्कार करतांना मला त्यांच्या छायाचित्रामध्ये पालट जाणवला. परात्पर गुरुदेवांच्या उजव्या गालावर चंदन किंवा अष्टगंध लावल्याप्रमाणे पट्टा स्पष्ट दिसत होता आणि हे छायाचित्र पुष्कळ मनोहारी दिसले. ‘ते पुन:पुन्हा पहात रहावे’, असे मला वाटले.

दळणवळण बंदीमुळे जहाजांना बंदरांत थांबण्याची अनुमती न मिळाल्याने जहाजावरील कर्मचार्‍यांना झालेला त्रास आणि श्रीकृष्णाच्या कृपेने साधकाने अनुभवलेली स्थिरता !

मला घरी जातांनाही अडचणी येत होत्या. मी ठरवलेल्या दिवसापेक्षा २० दिवस उशिरा घरी पोचलो; पण श्रीकृष्णाच्या कृपेने सुखरूप घरी पोचलो.’

पितृपक्षाच्या काळात रामनाथी आश्रमात श्राद्धविधी करतांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

गुरुकृपेने रामनाथी आश्रमात श्राद्धविधी करण्याची संधी लाभली. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा, रामनाथी आश्रमातील चैतन्य आणि पुरोहित-साधकांचा भाव यांमुळे मला अनुभवायला आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

भाववृद्धी सत्संगात पितृपक्षानिमित्त माहिती मिळाल्याने महालय श्राद्धाच्या दिवशी आलेली अनुभूती

सकाळी देवपूजा झाल्यावर मी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या प्रतिमेला मोगर्‍याचा गजरा वाहिला होता. तो गजरा रात्रीही तसाच पूर्णपणे टवटवीत होता; मात्र तेथेच बाजूला ठेवलेला गजरा पूर्ण वाळला होता.

नायगाव (पालघर) येथील डॉ. संगीता म्हात्रे यांना श्री गणेशमूर्ती, देवघरात ठेवलेला कलश आणि विड्याची पाने यांमध्ये दैवी पालट झाल्याची आलेली अनुभूती

श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी आमच्या घरातील देवघरात श्री गणेशमूर्तीची स्थापना केली. त्यानंतर मला श्री गणेशमूर्तीच्या समोर लावलेले निरांजन आणि समई यांच्या ज्योतींचे मूर्तीच्या डोळ्यांत प्रतिबिंब पडलेले दिसले. डाव्या डोळ्यात ते अधिक स्पष्टपणे दिसत होते.

रात्रभर ५ फूट पुराच्या पाण्यात वहात असलेल्या ‘श्रीमद्भगवद्गीता’ ग्रंथाची सर्व पाने कोरडी

रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावनामुळे पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील श्री. गोरक्ष कारकिले यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील गृहोपयोगी साहित्य वाहून गेले, तसेच त्यांच्या पशूधनाचीही मोठी हानी झाली आहे; मात्र आश्चर्य म्हणजे त्यांच्या घरामध्ये नियमित पूजन करण्यात येणारा ‘श्रीमद्भगवद्गीता’ हा ग्रंथ ५ फूट पुराच्या पाण्यात रात्रभर वहात असूनही त्याचे एकही पान ओले झाले नाही.

‘कोरोना’मुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यावर नामजपावर विश्वास नसतांनाही भावाने नामजप आणि प्रार्थना करणे अन् पुढे त्याने नामजपात सातत्य राखणे

माझा भाऊ मार्क्सवादी विचारसरणीचा आहे. त्याने यापूर्वी कधीही नामजप केला नव्हता. इतरांनाही तो नामजप करण्यापासून परावृत्त करायचा. त्याच्या अशा वागण्यामुळे कुटुंबातील सर्वांना त्याची काळजी वाटायची.