सनातन संस्‍था निर्मित ‘गणेश पूजा आणि आरती’ अ‍ॅपवरील ‘ऑडियो’ लावून पूजा करतांना आलेली अनुभूती !

‘१०.९.२०२१ (भाद्रपद शुक्‍ल चतुर्थी) या दिवशी मी ‘सनातन संस्‍था’निर्मित ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या ‘अ‍ॅप’च्‍या साहाय्‍याने घरात पार्थिव श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्‍ठापना करत होतो. प्राणप्रतिष्‍ठापनेचे मंत्र चालू झाल्‍यावर मी माझ्‍या उजव्‍या हाताची बोटे श्री गणेशमूर्तीच्‍या हृदयावर ठेवली. तेव्‍हा मला श्री गणेशमूर्तीच्‍या हृदयाच्‍या ठिकाणी स्‍पंदने जाणवू लागली.

‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’त उपस्थित रहाणार्‍या पुणे येथील जिज्ञासूंनी केलेले प्रयत्न, त्यांना स्वतःत जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती !

वर्ष २०१९ च्या शेवटी आलेल्या कोरोना महामारीच्या कालावधीत जगभरात दळणवळण बंदी लागू झाली. अनेक ठिकाणी कौटुंबिक समस्यांमध्ये वाढ होऊन जीवन तणावपूर्ण झाले होते. ‘सर्वांना नवसंजीवनी मिळावी’, यासाठी सनातन संस्थेद्वारे ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’चे आयोजन करण्यात आले होते.

देवघरातील ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या छायाचित्रात झालेले पालट आणि आलेल्या अनुभूती

माझ्या घरातील देवघरात असणा-या ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या छायाचित्रात ७ – ८ मासांपासून पुढील पालट जाणवत आहेत. दत्तात्रेयांच्या आधीच्या छायाचित्रात पार्श्वभूमीचा रंग गडद निळा होता. आता तो रंग फिकट होऊन पांढ-या रंगाचे प्रमाण वाढले आहे.

वैश्विक महामारीसारख्या आपत्काळात कठीण प्रसंगांना सामोरे जातांना अनुभवलेले गुरुकृपेचे कवच

‘वर्ष २०२० च्या जुलै मासाच्या आरंभी आमच्या रहात्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर एका भागात रहाणार्‍या व्यक्तीचे ती ‘कोरोना पॉझिटीव्ह’ असल्याचे निदान झाले. त्यामुळे आम्ही रहात असलेली इमारत सील करण्यात आली. त्यामुळे मला माझ्या दोन लहान मुलींना (मोठीचे वय ४ वर्षे आणि धाकटीचे वय ३ वर्षे) घेऊन माझ्या सासरी जाण्याचा निर्णय घ्यावा लागला.

रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !

२१.७.२०२१ पासून महाड शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने सावित्री, गांधारी अन् इतर नद्यांना महापूर येऊन पाणी महाड शहरामध्ये शिरले. त्यामुळे महाड शहरामध्ये जवळजवळ २० ते २५ फूट पाणी भरले आणि शहर दोन दिवस पाण्याखाली होते.

‘सनातन संस्थेच्या ॲप’वरील ‘विकार निर्मूलनासाठी नामजप’ या सदरात सांगितल्याप्रमाणे ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप केवळ अर्धा घंटा करूनही पित्ताचा त्रास समूळ दूर होणे

एक दिवस मी भ्रमणभाषवर अन्य काही पहात असतांना मला ‘सनातन ॲप’वर ‘विकार निर्मूलनासाठी नामजप’ या सदरामध्ये पित्ताच्या त्रासाच्या निवारणासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करावा’, असे वाचनात आले. तेव्हा मी लगेच न्यास करून तो नामजप करायला आरंभ केला.

साधकांनो, अमूल्य असा मनुष्यदेह आहे, तोपर्यंतच साधना आणि गुरुसेवा करू शकत असल्याने प्राप्त परिस्थितीतच झोकून देऊन साधना करा !

देह सोडून जातांना इथे असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला सोडून जाव्या लागतात. समवेत काही नेता येत नाही. समवेत केवळ एकच गोष्ट घेऊन जाऊ शकतो, ती म्हणजे साधना ! आपली साधना ही आपली खरी संपत्ती आहे. ‘आपला देह हा अमूल्य आहे. देह आहे, तोपर्यंतच आपण गुरुसेवा आणि साधना करू शकतो.

दत्ताच्या नामजपाने आलेल्या काही अनुभूती

‘मला स्वप्नात अगदी रोज साप दिसायचे, भीती वाटायची, कधी कधी दचकून जाग यायची. सनातन संस्थेच्या साधिका कु. माधवी आचार्य यांनी मला ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करायला सांगितला.

‘सनातन संस्था’निर्मित ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ हे ‘ॲप’ लावून श्री गणेशमूर्तीची विधीवत् प्रतिष्ठापना करतांना आलेली अनुभूती !

‘१०.९.२०२१ (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) या दिवशी मी ‘सनातन संस्था’निर्मित ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या ‘ॲप’च्या साहाय्याने घरात पार्थिव श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करत होतो.

‘सनातन चैतन्यवाणी ॲप’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन ऐकून प्रभावित झालेल्या जिज्ञासूंना स्वतःत जाणवलेले पालट !

मी साधनेत येण्यापूर्वी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर प्रवचनाला उपस्थित रहाण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. गुरुदेवांच्या मधुर वाणीतील मार्गदर्शनाचा त्या वेळी माझ्यावर असा काही परिणाम झाला होता की, ‘ती ‘दैवी वाणी’ सतत ऐकत रहावी’, असे मला वाटत होते.