Category Archives: सनातन वृत्तविशेष

सनातनच्या १ सहस्र साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्यांचे संतत्वाच्या दिशेने मार्गक्रमण !

हिंदु धर्मात कोणत्याही योगमार्गाने साधना केली, तरी आध्यात्मिक उन्नती करता येते; मात्र ही उन्नती शीघ्रगतीने व्हावी, यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली.

Read More »

सनातन प्रभातचे वार्ताहर राहुल कोल्हापुरे यांच्यावर आकसाने कारवाई केल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेदरे यांना ठरवले निर्दोष !

येथील दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांच्यावर गणेशोत्सव काळात आकसाने कारवाई करण्याचा प्रयत्न करणारे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेदरे निर्दोष असल्याचा निर्वाळा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाने दिला आहे.

Read More »

आदि शंकराचार्यं यांच्यावर आधारित धड्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार ! – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

आदि शंकराचार्य यांच्याविषयी लोकांना माहिती मिळावी, यासाठी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आेंकारेश्‍वर येथे एका संस्थेची स्थापना करण्यात येईल, तसेच त्यांच्यावर आधारित धड्याचाही शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.

Read More »

कागल (जिल्हा कोल्हापूर) येथे संजय साडविलकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात आणखी एक तक्रार प्रविष्ट !

संजय साडविलकर या अवैध शस्त्रास्त्र विक्रेत्याला अटक करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात यावेत, अशी तक्रार शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. किरण कुलकर्णी यांनी येथील पोलीस ठाण्यात ११ फेब्रुवारीला केली.

Read More »

(म्हणे) अध्यात्माच्या भाषेमुळे देश गुलाम बनला आहे !

देश भगवा करणे म्हणजे, अध्यात्मात बुडवून टाकणे असून ती प्रगती नाही. तळातला माणूस शहाणा होईल, तेव्हाच प्रगती होईल. अध्यात्माच्या नावाखाली काहीही बोलू नये. थोडेच बोलावे; पण शहाणपणाने बोलावे, असे धर्मविरोधी प्रतिपादन साहित्यिक राजा ढाले यांनी केले.

Read More »

कोल्हापूर येथे संजय साडविलकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी प्रविष्ट

अवैधपणे शस्त्रास्त्रे विकणारे संजय साडविलकर यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात यावेत, अशी तक्रार हिंदुत्वनिष्ठ श्री. संजय पौंडकर यांनी येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात ११ फेब्रुवारीला केली.

Read More »

देहली येथील सनातनच्या सेवाकेंद्रात भृगुसंहितेच्या माध्यमातून महर्षि भृगु यांचे शुभागमन !

होशियारपूर, पंजाब येथील भृगुसंहितावाचक भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा यांचे ९ फेब्रुवारी २०१७ या दिवशी देहली येथील सनातनच्या सेवाकेंद्रात भृगुसंहितेसह शुभागमन झाले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी भृगुसंहितेचे पूजन केले.

Read More »

सनातनवरील बंदीसाठी राज्यसरकारकडे पुरावेच नाहीत ! केंद्रशासनाची न्यायालयात स्वीकृती

सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संस्था आहे. सनातन निर्दोष आहे, हे आम्ही प्रथमपासूनच सांगत आलो आहोत.

Read More »

समीर गायकवाड यांना जपमाळ देण्यास न्यायालयाची अनुमती

सनातनचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन हे युक्तीवाद करतांना म्हणाले की, अत्तर, उदबत्ती आणि गोअर्क वापरल्याने श्री. समीर गायकवाड यांना मनःशांती मिळते. सनातन गोअर्कामुळे त्यांच्या पोटातील विकार नष्ट होतात. यासाठी त्यांना ही उत्पादने देणे आवश्यक आहे.

Read More »

डॉ. तावडे यांच्या न्यायअधिकारावर पोलिसांची गदा ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना कोल्हापूर येथील न्यायालयात उपस्थित करण्यात येत नाही. यासाठी पोलीस वेगवेगळी कारणे देत आहेत. डॉ. तावडे यांना कोल्हापूर येथे उपस्थित न करण्याला ४ मासांहून अधिक काळ लोटला आहे.

Read More »