गुरूंविषयी श्रद्धा, भक्तीभाव निर्माण करा ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने १० जुलै या दिवशी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ विशेष सत्संग आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पू. रमानंद गौडा यांनी गुरु-शिष्य परंपरेविषयी मार्गदर्शन केले. या सत्संगाचा लाभ ३ सहस्रांहून अधिक जणांनी घेतला.

संभाजीनगर, जालना, धुळे, नंदुरबार येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !

संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या वाचनालयात संपर्क करून ग्रंथांविषयी सांगितल्यावर त्यांनी मराठी आणि इंग्रजी ग्रंथ संचांची मागणी दिली.

हडपसर (पुणे) येथे महिलांच्या स्नेह मेळाव्यात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ प्रवचनाला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद !

हडपसर येथे हांडेवाडी येथे १२ जून या दिवशी ‘सुनबाई घुले पाटलांच्या ग्रुप’च्या तृतीय वर्धापनदिनाच्या निमित्ताने नणंद-भावजयींचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने कु. क्रांती पेटकर यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन केले.

सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये ठिकठिकाणी ‘ऑनलाईन’ साधना सत्संगातील जिज्ञासूंसाठीच्या कार्यशाळा पार पडल्या !

कार्यशाळांमध्ये उपस्थित सर्व जिज्ञासूंनी साधनेमुळे त्यांच्यात झालेले पालट सांगितले. त्यामुळे उपस्थितांमध्ये साधनेविषयी श्रद्धा आणि तळमळ वाढण्यास साहाय्य झाले.

नीमच (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन

या प्रवचनाचा समारोप करतांना कमांडंट श्री. सूरजपाल वर्मा यांनी संस्थेने केलेल्या मार्गदर्शनानुसार कृती करण्याविषयी उपस्थितांना सांगितले.

पनवेल येथे धर्मप्रेमींच्या एकजुटीने निघाली यशस्वी हिंदू एकता दिंडी !

छत्रपती शिवरायांची कर्मभूमी, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जन्मभूमी रायगड येथील हिंदू एकता दिंडीत सहभागी धर्मप्रेमी हिंदूंनी हिंदु राष्ट्राचा जयघोष केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त २८ मे या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने हिंदू एकता दिंडी काढण्यात आली.

गणरायाच्या सांगलीत ‘हिंदू एकता दिंडी’च्या निमित्ताने दीड सहस्र हिंदूंचा हिंदू एकतेचा हुंकार !

गणरायाच्या सांगलीत ‘जय श्रीराम’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘हिंदु धर्म की जय’, अशा घोषणांनी मार्गक्रमण करणाऱ्या अत्यंत शिस्तबद्ध आणि हिंदू एकतेचा हुंकार देणाऱ्या हिंदू एकता दिंडीने सांगलीकरांची मने जिंकली.

क्षात्र आणि ब्राह्म तेजाचा हुंकार देणारी सातारा येथील भव्य ‘हिंदू एकता दिंडी’ !

सातारा – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे सनातन धर्माचा प्रसार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या ध्येयाच्या दिशेने कार्यरत असणारे अवतारी पुरुष आहेत. त्यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त सातारा येथे २४ मे या दिवशी भव्य ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. दिंडीचा प्रारंभ शंखनादाने झाला. दिंडी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि सातारा शहराचे … Read more

नगर येथे हिंदु एकजुटीचा आविष्कार दर्शवणारी सनातनची ‘हिंदू एकता दिंडी’ पार पडली !

‘इस्कॉन’ संप्रदायाचे गिरीवरधारीदास प्रभु यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करून आणि नंतर ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजाला पुष्पमाळ अर्पण करून गांधी मैदान येथून दिंडीला प्रारंभ झाला. पौरोहित्य सर्वश्री उपेंद्र खिस्ती आणि नरेंद्र खिस्ती यांनी केले.

नवी देहली येथे सनातनच्या साधकांनी मंदिर स्वच्छता करून हिंदु राष्ट्रासाठी केली प्रार्थना !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त १८ मे या दिवशी कलकाजी, अलकनंदा येथील श्री संतोषीमाता मंदिराची स्वच्छता करण्यात आली.