नमस्कार कसा करावा ?

हस्तांदोलन करणे, ही पाश्‍चात्त्य संस्कृती आहे. हस्तांदोलनाची कृती करणे म्हणजे पाश्‍चात्त्य संस्कृतीचा पुरस्कार करणे, तर नमस्कार करणे, म्हणजे भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करणे. भारतियांनी स्वतः भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करून ही शिकवण भावी पिढीलाही द्यायला हवी. 

सनातन धर्मानुसार सांगितलेल्या कृतींचा परिणाम किती खोलवर होतो, याचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे श्री. गौरव सेठी !

श्री. गौरव त्यांच्या वडिलांच्या पावलांना दोन्ही हातांनी स्पर्श करून नमस्कार करण्याचा प्रयत्न करू लागले. प्रत्येक दिवशी ते अधिक प्रमाणात झुकत गेले. पावलांना दोन्ही हातांनी स्पर्श करून नमस्कार करायला आरंभ केल्यापासून गौरव यांना वडिलांचे आशीर्वाद मिळत आहेत, असे जाणवू लागले.

देवळात प्रवेश करतांना पायरीला नमस्कार कसा करावा ?

परिसरातील चैतन्यामुळे पायर्‍यांनाही देवत्व प्राप्त झालेले असल्याने, पायरीला उजव्या हाताची बोटे लावून तोच हात डोक्यावर फिरवण्याची पद्धत आहे.