Category Archives: हिंदु देवता

‘रामसे बडा रामका नाम’ ही म्हण सार्थ ठरवणारा भक्तशिरोमणी हनुमान !

‘जो कुणी प्रभु श्रीरामाचे स्मरण करत असेल, त्याचे संरक्षण हनुमंत करील आणि कुणीही त्या व्यक्तीचे अहित करू शकणार नाही’, असा वर हनुमानाने मागितला.

Read More »

ब्रिटीश महिलेला जाणवला महारुद्र अनुष्ठानाचा महिमा !

स्वातंत्र्यपूर्वकाळात अफगाणिस्थान आणि ब्रिटन यांच्यात युद्ध चालू होते. अलाहाबाद येथे मार्टिन्डेल नावाच्या ब्रिटीश अधिकार्‍यालाही युद्धावर पाठवण्यात आले. तो पत्नीला पत्र लिहित असे. एकदा ‘येेथे प्रसंग बिकट आहे’, असे त्याचे पत्र आले.

Read More »

श्री गणेश जयंती

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते.

Read More »

श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व आकृष्ट करणारे यंत्र, देवीचे चित्र आणि रांगोळी यांचा वायूमंडलावर होणारा परिणाम !

या चाचणीत श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणारे श्री महालक्ष्मी यंत्र, सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीचे चित्र आणि रांगोळी यांची छायाचित्रे चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या अन् ठेवल्यानंतरच्या वातावरणाची घेतलेली पिप छायाचित्रे निवडली आहेत. या तीनही छायाचित्रांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?, हे या चाचणीद्वारे जाणता आले.

Read More »

मनुष्याला २३ पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन केल्याचे पुण्य देणारी अमरनाथ यात्रा !

धार्मिक मान्यतेनुसार अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने काशीमध्ये घेतलेल्या दर्शनापेक्षा १० पट, प्रयागपेक्षा १०० पट आणि नैमिषारण्यापेक्षा १ सहस्र पट अधिक पुण्य लाभते. म्हणूनच आजही कोट्यवधी हिंदू मोठ्या भक्तीभावाने अमरनाथ यात्रा करतात.

Read More »

‘देवों के देव महादेव’ या शिवाविषयीच्या मालिकेतील भगवान शिव आणि असुर लोहितांग यांच्यातील संगीतयुद्ध अन् संगीतातून उत्पन्न होणार्‍या नादलहरींविषयी मिळालेले ज्ञान !

दूरचित्रवाणीवर अनेक धार्मिक मालिका असतात. त्याकडे केवळ कथा म्हणून न पहाता त्याचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून अभ्यास केल्यास त्यातून स्थूल आणि सूक्ष्म जगताच्या विविध पैलूंचे ज्ञान होऊन अध्यात्म आणि देव यांच्या वरील श्रद्धा दृढ होण्यास साहाय्य होते.

Read More »

देवतेच्या विडंबनात्मक, कलात्मक आणि सात्त्विक चित्रांचा यू.टी.एस्. उपकरणाद्वारे अभ्यास !

प्रत्येक देवता हे एक विशिष्ट तत्त्व आहे. देवतेची उपासना करतांना पूजकाच्या मनात त्या देवतेविषयी सतत भावजागृती होईल, असे तिचे रूप असणे महत्त्वाचे ठरते. देवतेचे द्विमितीय रूप (चित्र) अथवा त्रिमितीय रूप (मूर्ती) जितके…

Read More »

श्री दुर्गादेवीची मूर्ती सिद्ध करतांना मूर्तीकाराने पाळावयाचे आचारधर्म, करावयाची साधना अन् त्यामागील शास्त्र

मूर्तीचा रंग, आकार, उंची आणि त्या मूर्तीत देवत्व आणणे ही दैवी कला आहे. मूर्तीकाराला आचारधर्माचे पालन आणि साधना केल्यामुळे ही कला आत्मसात होते; परंतु मूर्तीकाराला याचे ज्ञान नसल्याने आणि मूर्ती सिद्ध करण्यामागे केवळ व्यावसायिक दृष्टीकोन असल्यामुळे मूर्तीत देवत्व अल्प प्रमाणात येते.

Read More »

अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम आणि लाभ

थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्‍चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गलऋषी यांनी साममुद्गल गणेशसूक्त लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी श्री गणपति अथर्वशीर्ष लिहिले.

Read More »