ईश्‍वराशी एकरूप झालेले आणि निर्गुण स्थितीत असलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या काही अनमोल भावमुद्रा !

गेली अनेक वर्षे कठोर तपःसाधना केलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा देह अनेक दैवी गुणवैशिष्ट्यांनी विभूषित आहे.

किन्नीगोळी, कर्नाटक येथील संत प.पू. देवबाबा यांची लक्षात आलेली विविध आध्यात्मिक वैशिष्ट्ये

प.पू. देवबाबा यांनी अनेक वने आणि विविध ठिकाणी जाऊन खडतर तपश्चर्या केली आहे. त्यांची ही तपश्चर्या अजूनही चालू आहे. हे त्यांच्या दिनक्रमावरून लक्षात येते.

परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यासारख्या बहुविध गुणांनी नटलेल्या आणि चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या महान विभूतीचा जीवनपट उलगडणे खरेतर अशक्यप्रायच !

एकमेवाद्वितीय महान तपस्वी परात्पर गुरु पांडे महाराज !

परात्पर गुरु पांडे महाराज सनातनच्या कार्याशी काया-वाचा-मनाने पूर्णपणे एकरूप झाले होते. ‘गुरुकार्य गतीने व्हावे’, यासाठी ‘संस्था स्तरावर आणखी काय करता येईल ?’ याविषयी त्यांचे सतत चिंतन चालू असायचे.

मध्यप्रदेशातील थोर संत सर्वसंग परित्यागी प.पू. भुरानंदबाबा

मध्यप्रदेश येथील प.पू. भुरानंदबाबा हे सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज महाराज यांचे गुरुबंधू होत. प.पू. भुरानंदबाबा यांचे कौटुंबिक जीवन, बालपण, गृहत्याग, गुरुभेट, साधकांना त्यांच्याविषयी आलेली अनुभूती आणि देहत्याग यांविषयी आज असलेल्या त्यांच्या निर्वाणोत्सवाच्या निमित्ताने जाणून घेऊया.

प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्य स्पष्ट करणारी वैज्ञानिक चाचणी !

संतांच्या पादुकांमध्ये चैतन्य असते. हे चैतन्य भावपूर्ण उपासनेने टिकून रहाते अन् वृद्धिंगत होते. अशाप्रकारे संतांच्या देहत्यागानंतर ते स्थूलदेहाने प्रत्यक्षात नसतांनाही त्यांच्या पादुकांच्या माध्यमातून संतांमधील चैतन्याचा लाभ भाविकांना होत असतो. त्यामुळे हिंदु संस्कृतीत गुरूंच्या आणि संतांच्या पादुकांचे पूजन करण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे.

गुजरात येथील संत पू. वसंतराव जोशी यांचा परिचय आणि जीवनकार्य !

पू. वसंतराव जोशी यांना लहानपणापासून साधनेची आवड होती. ते ब्रह्मचारी होते. ते नेहमी साधनेसाठी घरातून डोंगरावर पळून जात असत.

समर्थांची शिकवण तंतोतंत आचरणात आणणारे आणि समर्थांएवढीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणारे ज्येष्ठ समर्थभक्त कै. पू. सुनीलजी चिंचोलकर !

‘पू. चिंचोलकरकाका दासबोध, रामायण या किंवा अन्य विषयांवर प्रवचने करायचे. ‘त्यांनी त्यावर केवळ आध्यात्मिक निरूपण केले’, असे कधीच झाले नाही. रामायणातील प्रसंग आणि सद्यःस्थिती सांगून ते श्रोत्यांना समष्टी साधना करण्यासाठी उद्युक्त करत असत. राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणारे आघात मांडून ते जागृती करत.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी आध्यात्मिक उपायांसाठी दिलेला स्टीलचा संस्कारित डबा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी उपायांसाठी वापरल्यानंतर त्या डब्यावर झालेला परिणाम

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना आध्यात्मिक उपायांसाठी दिलेल्या संस्कारित डब्यातील शक्तीची स्पंदने त्या आध्यात्मिक उपायांनंतर अल्प होऊन त्या डब्यात आनंदाची स्पंदने जाणवू लागणे.