Category Archives: विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म

सनातन धर्म, हिंदु धर्म यांची वैशिष्ट्ये जाणून घ्या !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रामानंद परब यांनी रंगवलेली त्रिनेत्र गणेशाची शिळा पाहून त्यांचे कौतुक करणे आणि त्रिनेत्र गणेशाचे डोळे अगदी सजीव झाल्याचे सांगणे

रामनाथी आश्रमाच्या परिसरात स्थापन करायची त्रिनेत्र गणेशाची शिळा आश्रमातील साधक श्री. रामानंद परब यांनी शेंदरी रंगाने रंगवली आणि तिच्यावर गणेशाचे त्रिनेत्र काढले. अशी ही शिळा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दाखवल्यावर ते म्हणाले, किती छान रंगवले आहे.

Read More »

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात धनाची उणीव भासू नये, यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेनुसार श्री लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन !

‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात धनाची उणीव भासू नये, यासाठी सप्तर्षि जीवनाडीपट्टीद्वारे मार्गदर्शन करणार्‍या महर्षींनी ‘सर्व आश्रम आणि जिल्हे यांठिकाणी असलेल्या ‘धनसंचयामध्ये मोगर्‍याची फुले ठेवा’, अशी आज्ञा दिली होती.

Read More »

महर्षि भृगु यांच्या आदेशानुसार रामनाथी येथील सनातन आश्रमात ‘विष्णुयाग’ संपन्न !

होशियारपूर, पंजाब येथील भृगुसंहिता वाचक भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून महर्षि भृगु यांनी दिलेल्या आदेशानुसार येथील सनातनच्या आश्रमात माघ पौर्णिमा, अर्थात् १० फेब्रुवारी २०१७ या दिवशी ‘विष्णुयाग’ करण्यात आला.

Read More »

पंजाबमधील होशियारपूर येथील भृगुसंहितावाचक पं. लालदेव शास्त्री यांच्या माध्यमातून फलादेशाद्वारे महर्षि भृगु यांनी सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी सांगितलेली सूत्रे

पंजाबमधील होशियारपूर येथील भृगुसंहितावाचक पं. लालदेव शास्त्री यांच्याकडून भृगुसंहितेतील फलादेशाचे वाचन करण्यात आले. त्यातील सूत्रे येथे देत आहोत.

Read More »

देहली येथे भृगुसंहितेच्या माध्यमातून महर्षि भृगु यांचे शुभागमन !

होशियारपूर, पंजाब येथील भृगुसंहितावाचक भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा यांचे ९ फेब्रुवारी २०१७ या दिवशी देहली येथील सनातनच्या सेवाकेंद्रात भृगुसंहितेसह शुभागमन झाले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी भृगुसंहितेचे पूजन केले.

Read More »

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात भृगु संहितावाचक डॉ. विशाल शर्मा यांच्याद्वारे भृगु फलादेशवाचन

पंजाबमधील होशियारपूर येथील भृगु संहिता आणि शिव संहिता यांचे वाचक डॉ. विशाल शर्मा यांचे ८ फेब्रुवारी या दिवशी दुपारी साडेतीन वाजता रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात भृगु संहिता आणि शिव संहिता यांसह शुभागमन झाले.

Read More »

महर्षि भृगु यांनी भृगुसंहितावाचक भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात झालेल्या फलादेशाद्वारे कथन केलेली परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्था यांविषयीची सूत्रे

‘महर्षि भृगु यांनी ‘भृगुसंहिता’ या ग्रंथात दिव्य योगांद्वारे जीवात्म्यांच्या कर्मांची माहिती दिली आहे. फलादेशाच्या वेळी फलादेश ऐकणार्‍याने प्रश्‍न विचारल्यावर जी परिस्थिती असते, ती त्या योगात सांगितलेली असते.

Read More »

वेदज्ञानाचे संरक्षण आवश्यक ! – कांची कामकोटी पिठाचे पीठाधीश्‍वर श्री विजयेंद्र सरस्वती स्वामी महाराज

देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रत्येक नागरिकाने मुखोद्गत पद्धतीने जतन करण्यात येत असलेल्या वेदज्ञानाचे संरक्षण करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन कांची कामकोटी पिठाचे पीठाधीश्‍वर श्री विजयेंद्र सरस्वती स्वामी महाराज यांनी केले.

Read More »

महर्षि भृगु यांच्या फलादेशानुसार सनातन संस्थेचे साधक श्री. गौरव सेठी हरिद्वारला गेले असतांना त्यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

महर्षि भृगु यांच्या फलादेशानुसार सनातनचे साधक श्री. गौरव सेठी यांना उत्तराखंडमधील हरिद्वार (मायाक्षेत्र) येथे १५ ते १८.९.२०१६ या कालावधीत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

Read More »

महर्षींच्या आदेशानुसार रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रम परिसरात राजस्थानमधील श्री तनोटमाता आणि श्री त्रिनेत्र गणेश यांच्या मूर्ती अन् उत्तराखंडमधील व्यासशिळा यांची स्थापना !

सप्तर्षि जीवनाडीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्‍या महर्षींच्या आदेशानुसार सनातन संस्थेच्या रामनाथी आश्रमाच्या परिसरात ८ फेब्रुवारी २०१७ या दिवशी श्री तनोटमाता (जैसलमेर, राजस्थान) आणि श्री त्रिनेत्र गणेश (सवाई माधोपूर, राजस्थान) या देवतांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली.

Read More »