Archives

गुरुपौर्णिमा : हिंदूंनो, भावी भीषण काळात जिवंत रहाण्यासाठी संत आणि गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करा !

भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना, म्हणजे सनातन धर्मराज्याची पुनर्स्थापना करण्यासाठी काळानुसार प्रयत्न करणे, हेही एक प्रकारचे समष्टी गुरुकार्य आहे. आज धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि अहिंदू राजकारणी हिंदु राष्ट्र या शब्दालाच विरोध करत आहेत. अध्यात्माचा अभ्यास नसल्यामुळे त्यांना कालमाहात्म्य, सूक्ष्म जगत्, भगवंताची कृपा इत्यादी गोष्टी कळत नाहीत. खरे तर पृथ्वीवरील घटना क्षुल्लक असतात. स्थुलातून घडणारी प्रत्येक घटना

Read More »

अनुभवातून शहाणे न होणार्‍या भारतातील हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे, यात काय आश्‍चर्य !

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्या. एका निवडणुकीत एखाद्या पक्षाला हिंदूंनी मत दिल्यामुळे तो निवडून आला, तरी देशाची स्थिती सुधारली नाही. हे लक्षात आल्यावर पुढच्या निवडणुकीत दुसर्‍या पक्षाला हिंदू मोठ्या आशेने निवडून आणतात. पुन्हा त्यांना आधीचाच अनुभव येतो. त्यामुळे ते पुढच्या निवडणुकीत पुन्हा पहिल्या पक्षाला मोठ्या आशेने निवडून आणतात. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७० वर्षांत असे अनेकदा होऊनही

Read More »

राष्ट्र आणि विश्‍व यांच्या उत्कर्षाकरिता समर्पित व्हा !

साड्या, सोफासेट, टी.व्ही., गाडी यातच गुदमरून एक दिवस जीवनयात्रा संपवायची नाही. समाज आणि धर्म यांचे काही कर्तव्य अन् ऋण आहे. प्रत्येकानेच ते बजावले पाहिजे. उपेक्षिले तर सर्वनाश अटळ आहे. धर्माकरिता समर्पित झाले पाहिजे. सर्वस्व वाहिले पाहिजे. त्यातच त्याचा, तसेच राष्ट्र आणि विश्‍व यांचाही उत्कर्ष आहे. कल्याण आहे आणि मुक्तीही ! धर्माकरिता बाजी लावण्याचा आजचा प्रसंग

Read More »

सर्वशक्तीमान आणि सर्वसमर्थ असल्याने ईश्‍वरच खरा दयाळू, अहिंसावादी आणि कृपाळू असणे

ईश्‍वरच खरा दयाळू आणि क्षमाशील आहे. माणसाने पुष्कळ पापे आणि कुकर्मे केली, तरी ईश्‍वर त्याला पुनःपुन्हा जन्म देऊन मोक्षप्राप्तीची संधी देतो. तो सर्वशक्तीमान आणि सर्वसमर्थ असल्याने दयावान, अहिंसावादी आणि कृपाळू आहे.

Read More »

सुसंघटित आणि सामर्थ्यशाली रहा हे महर्षि महायोगी अरविंद घोष यांचे बोधवाक्य आपल्याला सदैव अन् सतत ध्यानात ठेवणे अत्यावश्यक !

महर्षि अरविंद यांचे हे मत आपल्या समस्त हिंदु बांधवांनी मनावर घेतले असते, तर आज आमच्या या भारताला सर्वच बाजूंनी छळणारा जिहादी आतंकवाद आणि त्यांचा हिंसाचार यांची भीषण समस्या उद्भवलीच नसती. सुसंघटित आणि सामर्थ्यशील अशा हिंदु समाजाला आघात पोहोचवण्यास्तव या जिहाद्यांना दहादा विचार करावा लागला असता.

Read More »

संस्काराने राष्ट्र तेजस्वी होणे

पिढ्यान्पिढ्या जेव्हा चांगले संस्कार होत असतात, तेव्हा ती आत्मशक्ती जागृत रहाते आणि चांगले नियोजन करून जीवन सुखदायी आणि समृद्ध करते. मध्येच जर संस्कार बंद पडले, तर ते पुन्हा प्रस्थापित करण्यास वेळ लागतो. तेथपर्यंत राक्षसीवृत्ती बोकाळून विघटनकारी कृत्ये सुरू होतात. त्याचे परिणाम समाजाला आणि राष्ट्राला भोगावे लागतात. आज भारताचे असेच झाले आहे. सुसंस्कार नाहीसे झाले आहेत

Read More »

नीतीशून्य आणि संस्कृतीद्रोही दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम आणि चित्रपट !

सध्याच्या काळात दूरचित्रवाहिन्यांवरील बर्‍याच कार्यक्रमांत, तसेच चित्रपटांतही कौटुंबिक कलह, एकमेकांविषयी ईर्षा आणि सूडभावना, स्वतःची पत्नी असतांनाही परस्त्रीसह प्रेमसंबंध इत्यादी दाखवले जाते. अशा नीतीशून्य, अविवेकी आणि संस्कृतीद्रोही कार्यक्रमांचा परिणाम मोठ्यांसह लहानांवरही होतो. याला कारणीभूत असणार्‍या दूरचित्रवाहिन्या, चित्रपट-निर्माते आदींसह घराघरांत असे कार्यक्रम पहाणारे आणि लहानांनाही ते पाहू देणारे स्वतःच्याच हाताने स्वतःचे पाप वाढवत असून राष्ट्रालाही अधःपतित करत

Read More »

मोहक विषवेली एक दिवस सनातन वृक्षच उन्मळून टाकेल की काय, असे भय निर्माण झाले असणे

सनातन हिंदु धर्म संस्कृतीच्या अत्यंत जुनाट सनातन वृक्षाला ही विषवेली बिलगली असून; ती इतकी वाढली आहे की, तो वृक्षच आता दिसेनासा झाला आहे. ती मोहक विषवेली आता एक दिवस तो सनातन वृक्षच उन्मळून टाकेल की काय ?, असे भय निर्माण झाले आहे. हिंदु जीवन ही चीज हिंदूनाच दुर्मिळ झाली आहे. हिंदुत्वाची बात दूरची ! आणि

Read More »

मक्सम्यूलरने हिंदु धर्माचे मूळ असलेल्या वेदांनाच उखडून टाकणे

ऋग्वेदाच्या अनुवादाविषयी मॅक्सम्यूलर हा पाश्‍चिमात्त्य विचारवंत आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हणतो, वेद हेच हिंदूंच्या धर्माचे मूळ आहे. … आणि तेच कसे हीन आहेत ?, हे मी दाखवतो आहे. माझी खात्री आहे की, तीन सहस्त्र वर्षांपासून जे जे या वेदापासून मोहरले आहे, त्या सर्वांचे मूळच मी उखडून टाकले आहे.

Read More »

हिंदुस्थानातच राहिलेला हिंदु अंतःकरणाने मात्र गोरा साहेब झालेला असणे

आज भारतियांच्या घराघरातील तेजस्वी शिक्षणाचे, संस्काराचे निर्मळ निर्झर आटून कोरडे ठणठणीत झाले आहेत. हिंदुस्थानात, हिंदु घराण्यात, हिंदु म्हणून जन्मला, हिंदु म्हणून वाढला, हिंदुस्थानातच राहिला असला, तरी आज अंतःकरणाने तो हिंदु, गोरा साहेब झाला आहे.

Read More »
1 2 3 54