प.पू. रामभाऊस्वामी यांनी रामनाथी आश्रमात केलेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या तिसर्‍या दिवसाचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले सूक्ष्म-परिक्षण !

yadnya_karatana
यज्ञात आहुती देतांना प.पू. रामभाऊस्वामी

१. परात्पर गुरु डॉ. आठवले
यांना आलेले वैयक्तिक अनुभव आणि अनुभूती

अ. माझे डोळे ४ – ५ मिनिटे खूप चुरचुरले.

आ. यज्ञस्थळी लावलेल्या संगिताच्या तालावर ४ – ५ मिनिटे हाताची, पायाची आणि शरिराची हालचाल होत होती.

इ. आज ७ – ८ फूट व्यासाचा पांढरा शुभ्र धूर यज्ञकुंडातून येत होता.

२. यज्ञाग्नि प्रदीप्त केल्यावर केलेले सूक्ष्म-परीक्षण

अ. अग्नीच्या ज्वाळांवर वरून पाण्याचा धबधबा पडत आहे, असे २ मिनिटे दिसले. नंतर काहीच दिसले नाही. केवळ पांढरा प्रकाश दिसला.

आ. जळणार्‍या लाकडांत आसुरी चेहरे जळतांना दिसले.

३. प.पू. रामभाऊस्वामी यज्ञकुंडात
बसल्यावर त्यांची स्थुलातून (पंचज्ञानेंद्रिये,
मन आणि बुद्धी यांनी) लक्षात येणारी वैशिष्ट्ये

३ अ. यज्ञकुंडात आहुती द्यायची पद्धत : प.पू. स्वामी सोडून इतर कोणीही आहुती द्यायची नाही.

३ आ. अग्नीसंदर्भात भाव

१. प.पू. स्वामी यज्ञकुंडाभोवती घालत असलेल्या फेर्‍या अत्यंत भावपूर्ण होत होत्या.

२. प.पू. स्वामी प्रत्येक वेळी भावपूर्ण नमस्कार करून अग्नीत प्रवेश करायचे.

३. बाळ आईजवळ जाईल तशा प्रेमाने प.पू. स्वामी अग्नीत प्रवेश करत होते. कधी ते नमस्कार करून अग्नीला भेटत होते.

३ इ. अग्नीचा परिणाम न होणे

१. प.पू. स्वामी एकदा जळणार्‍या गवतावर चेहरा ठेऊन यज्ञकुंडात पहुडले.

२. प.पू. स्वामींच्या दाढीला ज्वाळा लागल्या, तरी त्यांनी डोके हलवले नाही.

३. प.पू. स्वामींना त्यांच्या गुरूंनीच दिलेली शाल पेटत नाही, असे नाही. त्यांना यज्ञकुंडात बसण्यापूर्वी आश्रमातून दिलेल्या शालीही पेटल्या नाहीत.

३ ई. धुरावर प.पू. स्वामींचा परिणाम

१. प.पू. स्वामींनी हाताने धुराला दूर जायला खुणा केल्या की, धूर त्यांच्यापासून दूर जात होता.

२. कधी प.पू. स्वामींच्या हातातून वार्‍याप्रमाणे झोत आल्याप्रमाणे धूर जोरात दूर जात होता.

३. प.पू. स्वामी बहुधा धूर नसलेल्या अग्नीत बसत होते.

४. प.पू. स्वामींचा मुलगाही यज्ञकुंडाच्या बाजूला धुरात उभा रहात होता.

४. प.पू. स्वामींचे (पंचज्ञानेंद्रिये, मन आणि
बुद्धी यांचा वापर न करता केलेले) सूक्ष्म-परीक्षण

अ. प.पू. स्वामींची नजर आपल्याकडे असली, तरी आपल्याकडे पहात नसतात.

सूक्ष्म परीक्षणाविषयी विवेचन
सूक्ष्म : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला सूक्ष्म असे म्हणतात.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात. – संकलक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात