पापकर्मे, त्याचे भोग आणि पाप करणार्‍याचा मृत्यूनंतरचा प्रवास (भाग २)

अनुक्रमणिका

५. मनुस्मृति (१२, ५४ ते ६९) आणि याज्ञवल्क्य स्मृति (३, २०६ ते २१५) यांनुसार महापाप्याला मिळणारा जन्म

६. देवता आणि ब्राह्मण यांच्या धनाचा दुरुपयोग केल्याने मिळणारे फळ

७. श्रीगुरुचरित्रात दिल्याप्रमाणे पापामुळे पुढील जन्मात किंवा नरकात भोगावयास लागणारे फळ


तीव्र पाप केल्याने मिळणारे फळ, मृत्यूनंतर शिक्षा भोगून झाल्यावर पुढील प्रवास, पापकर्माचा प्रकार त्याचे फळ आणि उपाय; तसेच बुद्धीप्रामाण्यवादी, सत्ताधारी, राजकारणी आणि अधिकारी यांनी निःस्वार्थ बुद्धीने आणि सज्जनतेने काम न केल्यास होणारे परिणाम यांविषयीची माहिती आपण पहिल्या भागात पाहिली. याविषयीचा पुढील भाग प्रस्तुत लेखात पाहूया !

पहिल्या भागातील सूत्रे वाचण्यासाठी येथे क्लिक करा !

५. मनुस्मृति (१२, ५४ ते ६९) आणि याज्ञवल्क्य
स्मृति (३, २०६ ते २१५) यांनुसार महापाप्याला मिळणारा जन्म

महापाप्याला पुढील जन्म हा प्राण्याचा किंवा एखादी जागा, उदा. डोंगर यासारखा मिळू शकतो.

अ. ब्राह्मणाचा वध करणे : कुत्रा, डुक्कर, गाढव, उंट, बैल, बकरा, मेंढा, हरीण आणि रानटी माणूस, अशा जन्मांतून गेल्यावरच माणसाचा जन्म मिळतो.

आ. दारू पिणे : जंत, किडे, फुलपाखरू, पक्षी आणि रानटी प्राणी, अशा जन्मांतून गेल्यावरच माणसाचा जन्म मिळतो.

६. देवता आणि ब्राह्मण यांच्या धनाचा दुरुपयोग केल्याने मिळणारे फळ

देवस्वं ब्राह्मणस्वं वा लोभेनोपहिनस्ति यः ।

स पापात्मा परे लोके गृध्रोच्छिष्टेन जीवति ।। – मनुस्मृति ११.२५

अर्थ : जो मनुष्य लोभाने देवता (मूर्ती आदी) आणि ब्राह्मण यांच्या धनाचा दुरुपयोग करतो, तो पापी (मेल्यावर) परलोकातही गिधाडाचे उच्छिष्ट खाऊन जगतो.

७. श्रीगुरुचरित्रात दिल्याप्रमाणे पापामुळे पुढील जन्मात किंवा नरकात भोगावयास लागणारे फळ

पाप

पुढील जन्मात किंवा नरकात भोगावे लागणारे फळ

मनुष्य योनी

प्राणी योनी

१. स्त्रीचे पाप

   

अ. सासू, सासरे, नणंदा, दीर, वहिनी इत्यादींना सोडून निराळे रहाणे

 

कुत्रा, अस्वल

आ. पतीशी अयोग्य वागणे

१. पतीशी रागावून बोलणे

२. पतीला न देता एकटीनेच खाणे

मुकी, सात जन्म दरिद्री

कुत्री, कोल्ही

प्रथम गांडूळ आणि नंतर स्वतःची विष्ठा खाणारे वाघूळ

इ. व्यभिचार

१. परपुरुषांकडे वाईट दृष्टीने पहाणारी

२. व्यभिचार करणे

चकणी, दरिद्री

कुत्री

२. पुरुषाचे पाप

   

अ. आई, वडील आणि गुरु यांना सोडून निराळे रहाणे

महारोगी, चांडाळ

सात जन्म कृमी

आ. दुसरी पत्नी करणे

सात जन्म दुर्भाग्य

 

इ. वैश्वदेवाच्या वेळी अतिथीला अन्न न देणे

 

कोंबडा

ई. स्त्रीला गर्भपात करायला लावणे

वांझ; पुत्र झाल्यास तो अल्पायुषी

 

उ. व्यभिचार

१. वाईट दृष्टीने परस्त्रीचा तोंडवळा पहाणे

२. परस्त्रीची योनी पहाणे

३. परस्त्रीला आलिंगन

४. गुरुपत्नीसमवेत संबंध

५. मित्राची पत्नी किंवा मामी यांच्यासमवेत संबंध

६. वहिनीसमवेत संबंध

७. शूद्राचा ब्राह्मण स्त्रीसमवेत संबंध

चक्षूरोगी

जन्मांध

कुष्ठरोग

 

हीन (नीच) जात

 

शंभर जन्म कुत्रा आणि नंतर सर्प

श्वान

गर्दभ (गाढव), मग सर्पयोनी आणि शेवटी नरक

दोघेही कृमी, कीटक किंवा वृक्षवल्ली

३. स्त्री आणि पुरुष दोघांचे पाप

   

अ. पंचमहायज्ञ केल्यावाचून भोजन

(टीप १)

(टीप १)

आ. आपले गुरु आणि उपास्यदेवता सोडून इतर गुरु अन् देवता यांची निंदा

दारिद्र्य

 

इ. वेदांना नावे ठेवणे, ब्राह्मणांचा अपमान करणे, कर्मभ्रष्ट होणे

मूत्रकृच्छ्र रोगी

‘कृमी (कीटलोह)’ या नरकात जाणे

ई. कोणी धर्मशास्त्रपुराण सांगत असल्यास न ऐकणे

बहिरेपणा

 

उ. ‘दुसरा किती जेवतो’, यावर डोळा ठेवणे

अंधत्व

 

ऊ. पापी लोकांसह मैत्री

 

गाढव

ए. पापी लोकांकडून औषध घेणे

 

मृग

ऐ. इतरांना दुःख वाटेल, असे नेहमी बोलणे

हृद्रोग

 

ओ. केलेले उपकार विसरणे

ब्रह्महत्येचे पातक

 

औ. दुसर्‍यांचा द्वेष करणे

निपुत्रिक

 

अं. विश्वासघातकीपणा

अन्न जेवल्यावर उलटी

 

क. अश्ववध, गोवध

वांझ, ज्वरी

 

ख. सर्पहत्या

 

सर्प

ग. ब्रह्महत्या (ब्राह्मणाची हत्या)

क्षयरोग, कुष्ठरोग आणि दात किडणे

 

४. चोरी

   

अ. सर्वसाधारण

नखे वाईट होणे

 

आ. जल

 

कावळा

इ. फळ

विद्रूपता

वनचर

ई. पाने, फांद्या अन् फळे

खरूज

गोचीड

उ. दूध

कुष्ठरोग

 

ऊ. मध

 

घार

ए. धान्य

शरिरातून रक्तस्त्राव अन् दुर्गंधयुक्त शरीर

 

ऐ. तेल

दुर्गंधयुक्त शरीर

 

ओ. अन्न

गुल्मगाठीची व्याधी

 

औ. वस्त्र, कास्य, लोह, कापूस अन् मीठ

कोड

 

अं. गृहोपयोगी वस्तू, उदा. भांडी

 

कावळा

क. पुस्तक

अंध

 

ख. परद्रव्य

निपुत्रिक

 

ग. दुसर्‍याची ठेव

सदा दुःखी

 

घ. गाय, धन

 

उंट

च. मोती, माणिक अन् रत्न

हीन जात

 

छ. सोने

प्रमेहव्याधी, मधुमेह, कुनखी (नखांचा रोग झालेला)

कृमी, कीटक

ज. मरणोन्मुख असलेल्याच्या वस्तू

आजन्म कारावास

 

झ. गणद्रव्य (समाजाचे पैसे)

गंडमाळ विकार

 

ट. देवद्रव्य

पंडुरोग

 

ठ. दुसर्‍याचा सेवक (नोकर)

कारावास

 

ड. स्त्री

मतीहीन आणि शेवटी नरक

 

५. कित्येक पापे

 

वृक्षवल्ली

६. गुरुनिंदा; ब्राह्मणद्वेष; अकारण वेदचर्चा, परस्त्री, परवस्तू किंवा ब्राह्मणाचे द्रव्य यांचे हरण

 

ब्रह्मराक्षस

टीप १ : २८ नरकांपैकी एक ‘कृमीयुक्त खड्डा’ आहे; तेथील कृमींनी खाणे (मूळस्थानी)

ब्रह्महत्यादी पातकांपैकी कोणत्या पापामुळे कोणत्या योनीत जन्म घ्यावा लागतो, त्याची विस्तृत यादी मनूने दिली आहे.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘पुण्य-पाप आणि पापाचे प्रायश्चित्त’
Facebooktwittergoogle_plusmail