सनातनच्या चित्रकार साधिकांना कृष्णमयचित्रे पाहून चित्रकार संकलकाची जाणवलेली वैशिष्ट्ये !

प्रस्तूत लेखात आपण सनातनच्या चित्रकार साधिकांना बालकभावातील चित्रांसंदर्भात जाणवलेली वैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती पहाणार आहोत. यांतून ‘कोणताही अनुभव नसतांना केवळ ईश्वराप्रती असलेल्या उत्कट भावामुळे चित्रकला कशी आत्मसात होते’, हे स्पष्ट होईल.

 

१. कु. प्रियांका विजय लोटलीकर
(रहेजा कला महाविद्यालय, मुंबई येथून ‘कमर्शियल आर्टस्’मध्ये पदविका प्राप्त)

कु. प्रियांका लोटलीकर
कु. प्रियांका लोटलीकर

१ अ. ‘मॉडर्न आर्ट’नुसार काढली जाणारी चित्रे समजण्यास कठीण
आणि त्रासदायक असून साधक-चित्रकारातील भावाचे प्रमाण वाढल्यावर
देवच त्याच्यात कलेची निर्मिती करत असल्याने ही चित्रे पाहून भाव जागृत होणे

`चित्रकाराच्या चित्रांतून इतरांना आनंद मिळाला आणि त्या चित्रांकडे पाहिल्यावर ती समोरच्यांना सहजतेने कळली, तर चित्रकाराच्या चित्राची, म्हणजेच कलाकृतीची फलनिष्पत्ती अधिक असते. सध्याच्या जगतातील ‘मॉडर्न आर्ट’नुसार काढली जाणारी चित्रे इतरांना समजणे कठीण आणि त्रासदायक असल्याने ‘ती पाहू नये’, असेच वाटते. साधक-चित्रकार साधना करू लागतो आणि साधना वाढू लागल्यावर त्याच्यातील ईश्वराप्रतीच्या भावाचे प्रमाण वाढते. त्या वेळी देवच ती कला त्याच्यामध्ये निर्माण करतो. देवाचे प्रत्यक्ष रूप पाहून साधक-चित्रकार त्याप्रमाणे चित्र रेखाटत असल्यामुळे त्यातून इतरांना आनंद मिळतो आणि त्यांचा भावही जागृत होतो. ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेल्या सौ. उमा यांची चित्रे इतरांना आनंद देणारी आणि कृष्णभक्तीमध्ये रममाण करणारी आहेत.

१ आ. विविध भावातील कृष्णचित्रे काढणे, हे कृष्णाशी असलेले अनुसंधानच !

सौ. उमा यांनी कला क्षेत्रातील शिक्षण घेतलेले नसतांनाही त्यांनी काढलेली कृष्णाची चित्रे ही त्यांचे कृष्णाशी असणारे अनुसंधान दर्शवतात. मनातील आवड, म्हणजेच तीव्र इच्छा आणि त्यातून निर्माण होणारी तळमळ यांमुळेच सौ. उमा या कृष्णभक्तीपर चित्रे चांगल्याप्रकारे रेखाटू शकल्या.’

– कु. प्रियांका विजय लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.९.२०१२)

 

२. सौ. जान्हवी रमेश शिंदे
(सोफिया कला महाविद्यालय, मुंबई येथून ‘कमर्शियल आर्टस्’’मध्ये पदविका प्राप्त)

सौ. जान्हवी शिंदे
सौ. जान्हवी शिंदे

२ अ. आध्यात्मिक गोडवा असलेली आणि बालकांत
असलेली निर्मळताही अनुभवायला देणारी बालकभावातील चित्रे !

`सौ. उमा रविचंद्रन् यांनी काढलेल्या चित्रांचे वेगळेपण म्हणजे त्यांचा श्रीकृष्णाप्रती असलेला बालकभाव ! त्यांनी अत्यंत भावपूर्णतेने आणि कौशल्याने तो चित्रांतूूून रेखाटल्यामुळे त्या चित्रांतून पुष्कळ आनंद अन् भाव जाणवतो. एखाद्या बालकाप्रमाणेच त्यांचे प्रत्येक चित्र निर्मळ वाटते. त्यांच्या चित्रांत गोडवा आहे. श्रीकृष्णाचे आणि प.पू. डॉक्टरांचे वर्णन करतांना गोपी ‘मधुर’ हा शब्द वापरतात, तसेच सौ. उमा यांच्या चित्रांचेही वर्णन करावेसे वाटते. त्यांच्या प्रत्येक चित्रातच आध्यात्मिक गोडवा आहे.

२ आ. चित्राचा विषयही श्रीकृष्ण आणि चित्रकारही
श्रीकृष्णच असल्यामुळे साकारली जाणारी उत्कृष्ट कृष्णमयचित्रे !

चित्रातून जाणवणारी स्पंदने ही प्रामुख्याने त्या चित्राचा विषय, ते काढण्यामागील चित्रकाराचा उद्देश आणि त्याचे कौशल्य यांवर अवलंबून असतात. सौ. उमा यांचा श्रीकृष्णाप्रती उत्कट भाव आहे. ‘तोच सर्व करतो’, असे त्यांना वाटते, म्हणजेच त्यांच्यात अहं आणि कर्तेपणा नाही. येथे चित्राचा विषय श्रीकृष्ण आणि चित्रकारही श्रीकृष्णच असल्यामुळे त्यांची चित्रे उत्कृष्ट वाटतात आणि त्यांचा परिणाम दीर्घकाळपर्यंत मनावर टिकतो.

२ इ. सराईत चित्रकारालाही लाजवतील, अशा भावचित्रांची वैशिष्ट्ये !

सौ. उमा यांच्या बोलण्यातून कळले की, त्यांनी त्यांच्या शालेय जीवनानंतर साधारण २५ ते ३० वर्षांनंतर आता चित्रे काढली आहेत; मात्र त्यांच्या चित्रांतील सुबकता पाहून कोणालाही असे वाटणार नाही. एखादा सराईत चित्रकार काढेल, अशीच ती चित्रे आहेत. त्यांच्या चित्रांची अनेक आध्यात्मिक वैशिष्ट्ये आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या चित्रांकडे कलेच्या दृष्टीने पाहिल्यास ती अत्यंत सुरेख असून त्यात चांगल्या चित्रांमध्ये असतात, तशी अनेक वैशिष्ट्येही आहेत.

२ इ १. उत्स्फूर्तता

त्यांनी चित्रकलेचा कोणताही अभ्यासक्रम केलेला नसूनही त्या चित्रांद्वारे कोणताही विषय मांडू शकल्या. विषय मांडतांना कोणत्या कोनातून (अँगलने) चित्र काढायचे, असा प्रश्न त्यांना निर्माण झाला नाही. आतून जे स्फुरले, ते त्यांनी उत्स्फूर्तपणे रेखाटले.

२ इ २. अल्प वेळेत चित्र पूर्ण होणे

प्रत्येक चित्र पूर्ण करायला त्यांना साधारण अर्धा घंटा लागला. चित्र क्लिष्ट असल्यास ४५ मिनिटे लागले. सराईत कलाकारालाही साधारण इतकाच वेळ लागतो.

२ इ ३. विषयांप्रमाणे आवश्यक तेथेच पालट करणे

त्यांच्या सर्वच चित्रांमध्ये श्रीकृष्ण आणि छोटी बालिका यांचा तोंडवळा अन् शरिराची ठेवण एकसारखीच आहे. त्यात विषयाप्रमाणे केवळ हावभाव तेवढे पालटले आहेत.

२ ई. श्रीकृष्ण आणि बालिका यांचे विषयानुसार व्यक्त केले जाणारे भाव !

चित्रे काढतांना ‘श्रीकृष्णच माझा पालनकर्ता असून मी त्याचे बाळ आहे’, असा त्यांचा भाव असल्यामुळे चित्रातील श्रीकृष्णाची शरीररचना, मुखावरील हावभाव हे एखाद्या पित्याप्रमाणे आहेत, तर बालिकेचा भाव विषयाप्रमाणे कधी खट्याळ, तर कधी निरागस बालकाप्रमाणे आहे.

प्रत्येक चित्रात श्रीकृष्णाच्या मुखावरील भाव निरनिराळे आहेत आणि ते विषयानुसार पालटतात, उदा. मुलगी क्षमायाचना करतांना श्रीकृष्णाच्या मुखावर गांभीर्य, तसेच वात्सल्यभावही आहे.

२ ई १. ‘बिंब प्रतिबिंब’ या न्यायाने उत्स्फूर्तपणे भाव उमटणे

६१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त झाला; म्हणून झालेल्या सत्काराच्या कार्यक्रमात मुलीचे कौतुक केल्यावर जे भाव आईवडिलांच्या तोंडवळ्यावर उमटतील, तसेच भाव श्रीकृष्णाच्या मुखावर दिसतात.

(चित्र काढतांना सौ. उमा यांचा तसाच भाव होता. चित्रात कोणते भाव असायला हवेत, हे त्यांनी ठरवून प्रयत्नपूर्वक केलेले नसते. ते ‘बिंब प्रतिबिंब’ या न्यायाने उत्स्फूर्तपणे उमटत असतात. – संकलक)

२ ई २. व्यक्तीरेखांचे सुरेख रेखाटन

सौ. उमाक्कांनी श्रीकृष्णाचीच नव्हे, तर प.पू. डॉक्टर अन् पू. सत्यवान कदम यांची व्यक्तीरेखाही अगदी सुरेख रेखाटली आहे.

२ ई ३. भावावस्था व्यक्त होणे

आरंभीची त्यांची चित्रे मुलगी श्रीकृष्णासह खेळतांना, नाचतांना अशी आहेत. नंतरच्या चित्रांतून त्यांनी अनुभवलेल्या भावावस्था व्यक्त झाल्या आहेत, उदा. अपराधीभाव, कृतज्ञताभाव, शरणागतभाव इत्यादी.

२ ई ४. साधनेचे प्रयत्न चित्रस्वरूपात साकारणे

त्यांनी केलेल्या प्रार्थना, साधनेचे प्रयत्न, उदा. मानसपूजा, क्षमायाचना इत्यादी चित्रस्वरूपात साकारल्या गेल्या आहेत.

२ उ. विविध गुणांचे दर्शन घडवणारी चित्रकला !

त्यांच्या चित्रातून त्यांच्यातील निरीक्षणक्षमता, परिपूर्णतेकडे असलेला त्यांचा कल आणि त्यांच्यातील सेवाभाव, शिष्यभाव असे विविध गुण दिसतात.’

– सौ. जान्हवी रमेश शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.९.२०१२)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग २) (धर्मसंदेश देणारी श्रीकृष्णाची चित्रे अनुभूतींसह)’

Leave a Comment