‘R.F.I. रीडींग’ उपकरण व ‘PIP’ तंत्रज्ञान यांद्वारे सिद्ध झालेले सात्त्विक गणेशमूर्तीचे श्रेष्ठत्व !

‘आर्.एफ्.आय. रीडींग’ उपकरण आणि ‘पिप’
तंत्रज्ञान यांद्वारे सिद्ध झालेले सनातन-निर्मित सात्त्विक रंगीत
गणेशमूर्ती आणि धूम्रवर्णाची गणेशमूर्ती यांचे चैतन्य प्रक्षेपणातील श्रेष्ठत्व !

एखाद्या वस्तूत किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत किंवा ती वस्तू सात्त्विक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील ज्ञान असणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक वस्तूतील स्पंदनांचे निदान अचूक लावू शकतात. सूक्ष्मातील जाणकार व्यक्ती किंवा अध्यात्मातील अधिकारी व्यक्तीही यावर उत्तम भाष्य करून नकारात्मक स्पंदने असल्यास त्यावर उपायही सांगू शकतात. भक्तांची, साधकांची, तसेच संतांना आणि देवतांना मानणार्‍यांची यावर श्रद्धा असते; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक कसोटीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध केली असेल, तरच ती खरी वाटते.

येथेही ‘PIP’, तसेच ‘R.F.I.’ रिडिंग या तंत्रज्ञान प्रणालींचा उपयोग करून ‘तांत्रिक गणेशमूर्ती, सर्वसामान्य गणेशमूर्ती ’ यांच्या तुलनेत ‘सनातन-निर्मित सात्त्विक रंगीत गणेशमूर्ती आणि धूम्रवर्णाची (धुरकट रंगाची) गणेशमूर्ती’ यांची सात्त्विकता वैज्ञानिक निकषांद्वारा सिद्ध झाली आहे.

‘R.F.I.’च्या साहाय्याने आपण वातावरणातील वैश्विक ऊर्जा मोजू शकतो, तर ‘PIP’ तंत्रज्ञानाद्वारे आपण एखाद्या वस्तूभोवती असणार्‍या स्पंदनांची गती, तसेच त्या वस्तूची रंगीत प्रभावळ पाहू शकतो. ‘पिप’ हे एक संगणकीय अद्ययावत सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरला व्हिडिओ कॅमेर्‍याशी जोडून त्यात असलेल्या वेगवेगळ्या फिल्टरद्वारे प्रत्येक वस्तूची, वास्तूची, व्यक्तीची ऊर्जावलये पहाता येतात. हे सॉफ्टवेअर रंगांचे विभाजन करते. सकारात्मक आणि नकारात्मक रंग त्यांच्या क्षमतेनुसार दिसण्याची सोय यात आहे.

शेवटी विज्ञानालाही मर्यादा असल्याने यंत्राद्वारे लावले जाणारे वैज्ञानिक निकष काही टप्प्यांपर्यंत एखाद्या गोष्टीतील स्पंदनांचे निदान लावू शकले, तरी संत, गुरु, सद्गुरु हे यंत्राने मोजमापन केलेल्या स्पंदनांपेक्षाही कितीतरी पटीने अधिक सूक्ष्म असणार्‍या, म्हणजेच सूक्ष्मातीसूक्ष्म असणार्‍या स्पंदनांना ईश्वरी शक्तीच्या बळावर जाणू शकतात; म्हणून शेवटी प्रत्येकालाच विज्ञानातून अध्यात्माकडे वाटचाल करण्याशिवाय पर्याय नसतो.

‘पिप’ या तंत्रज्ञानाच्या बळावर सिद्ध झालेल्या ‘सनातन-निर्मित गणेशमूर्तींच्या’ चैतन्यमयतेवर श्रद्धा ठेवून या मूर्तींचा आपल्या साधनेसाठी अधिकाधिक लाभ करून घेता येर्इल. या गणेशमूर्तींच्या दर्शनाचा लाभ अनेकांना होवो आणि श्री गणेशाच्या कृपेने त्यांच्या साधनेतील प्रयत्नांत उत्तरोत्तर वाढ होवो, हीच श्री गुरुचरणी तळमळीची प्रार्थना !

 

तांत्रिक गणेशमूर्ती

मूर्तीवर पसरलेला त्रासदायक लाल रंग आणि मूर्तीभोवती असलेली<br />तणावदर्शक भगव्या रंगाची प्रभावळ यांमुळे त्रासदायक असणारी तांत्रिक गणेशमूर्ती !
मूर्तीवर पसरलेला त्रासदायक लाल रंग आणि मूर्तीभोवती असलेली तणावदर्शक भगव्या रंगाची प्रभावळ यांमुळे त्रासदायक असणारी तांत्रिक गणेशमूर्ती !

 

सर्वसामान्य गणेशमूर्ती

मूर्तीभोवती भगव्या रंगाची तणावदर्शक प्रभावळ आणि हिरव्या रंगाच्या<br />सकारात्मक उर्जेची न्यूनता यांमुळे उपासना करण्यास फारशी अनुकूल नसलेली गणेशमूर्ती !
मूर्तीभोवती भगव्या रंगाची तणावदर्शक प्रभावळ आणि हिरव्या रंगाच्या सकारात्मक उर्जेची न्यूनता यांमुळे उपासना करण्यास फारशी अनुकूल नसलेली गणेशमूर्ती !

 

सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्ती

मूर्तीभोवतालची आकाशी रंगाच्या आध्यात्मिक वैश्विक उर्जेची प्रभावळ आणि हिरव्या रंगाच्या<br />सकारात्मक उर्जेची प्रभावळ यांच्यामुळे सगुण उपासनेसाठी लाभदायक असणारी गणेशमूर्ती !
मूर्तीभोवतालची आकाशी रंगाच्या आध्यात्मिक वैश्विक उर्जेची प्रभावळ आणि हिरव्या रंगाच्या सकारात्मक उर्जेची प्रभावळ यांच्यामुळे सगुण उपासनेसाठी लाभदायक असणारी गणेशमूर्ती !

 

सनातन-निर्मित धूम्रवर्णाची गणेशमूर्ती

मूर्तीभोवती असलेल्या सोनेरी-पिवळ्या रंगाच्या तेजस्वी प्रभावळीयोगे भक्तांना<br />उच्च आध्यात्मिक तत्त्व प्रदान करण्यात अग्रेसर असणारी सनातन-निर्मित धूम्रवर्णाची गणेशमूर्ती !
मूर्तीभोवती असलेल्या सोनेरी-पिवळ्या रंगाच्या तेजस्वी प्रभावळीयोगे भक्तांना उच्च आध्यात्मिक तत्त्व प्रदान करण्यात अग्रेसर असणारी सनातन-निर्मित धूम्रवर्णाची गणेशमूर्ती !

 

निष्कर्ष

१. सनातनच्या साधक-मूर्तीकारांनी साधना म्हणून मूर्ती बनवणे

‘वरील प्रयोगांतून ‘PIP’ आणि ‘R.F.I.’ या उपकरणांद्वारे ‘सनातनच्या साधक-मूर्तीकारांनी साधना म्हणून बनवलेल्या सात्त्विक धूम्रवर्णाची मूर्ती आणि रंगीत मूर्ती’ यांच्या चैतन्याच्या प्रक्षेपणातील कार्य सिद्ध झाले.

२. प.पू. डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ‘श्री गणेशाचा
नामजप’ करत भावपूर्णरित्या मूर्ती तयार केल्याने त्यात चैतन्य येणे

प.पू. डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ‘श्री गणेशाचा नामजप’ करत भावपूर्णरित्या या मूर्ती बनवल्याने तिच्यात चैतन्य आले आहे. या मूर्ती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य पद्धतीने बनवल्या आहेत. अशा मूर्ती ब्रह्मांडातील गणेशतत्त्व लवकर आकृष्ट करून घेऊन त्याचे वातावरणात प्रक्षेपण करू शकतात. मूर्तीत सात्त्विकता नसेल, तर तिच्या उपासनेने विशेष लाभ होत नाही.

३. अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य पद्धतीने बनवलेल्या
मूर्तींमध्ये इतरांना अनुभूती देण्याचे सामर्थ्य असणे

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य पद्धतीने बनवलेल्या मूर्तीतच इतरांना अनुभूती देण्याचे सामर्थ्य असते. तसेच सामर्थ्य या मूर्तींमध्ये आहे, हे या उपकरणांनी दाखवलेल्या प्रभावळीतूनही स्पष्ट होते.

४. सनातनच्या मूर्तींमध्ये अधिक सात्त्विकता असणे

‘सनातनच्या मूर्तींमध्ये अधिक सात्त्विकता आहे’, हे येथे वैज्ञानिक निकषांद्वारा सप्रमाण सिद्ध झाल्याने या मूर्ती अध्यात्माबरोबरच ज्ञानाच्या कसोटीलाही खर्‍या उतरल्या आहेत.

 

प्रार्थना !

‘श्री गणेशाच्या कृपेने आणि प.पू. डॉक्टरांच्या आशीर्वादाने बनवलेल्या सनातनच्या मूर्तींमधील गणेशतत्त्वाचा लाभ अनेक भक्तांना होवो आणि या मूर्तींच्या माध्यमातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याने सार्‍या ब्रह्मांडाची शुद्धी होऊन ईश्वरी राज्याची स्थापना लवकर होवो’, हीच श्री गणेशाच्या चरणी कळकळीची प्रार्थना !’

– सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२१.४.२०१२)

Leave a Comment