श्री गणपति

एखाद्या देवतेविषयी आपल्याला अध्यात्मशास्त्रीय ज्ञान (माहिती) कळले, तर त्या देवतेसंबंधी आपली श्रद्धा अधिक वाढायला साहाय्य होते. श्रद्धेमुळे साहजिकच उपासना भावपूर्ण व्हायला साहाय्य होते आणि भावपूर्ण उपासना ही अधिक फलदायी असते. या दृष्टीने या ग्रंथात श्री गणपतीसंबंधीचे सर्वसाधारणतः इतरत्र कोठेही न आढळणारे; पण उपयुक्त असे अध्यात्मशास्त्रीय ज्ञान (माहिती) देण्यावर भर दिला आहे.

श्री गणपतीच्या प्रमुख नावांचा भावार्थ; देवांची प्रकाशभाषा आणि मानवाची नादभाषा यांचे एकमेकांत रूपांतर करणारा, प्राणशक्ती वाढवणारा इत्यादी गणपतीची कार्ये अन् वैशिष्ट्ये; उजव्या आणि डाव्या सोंडेच्या गणपतीचे महत्त्व;


गणपतीला दूर्वा आणि लाल फुले का वहातात; दूर्वांची लांबी, संख्या आणि अर्पण करण्याची पद्धत; चतुर्थी अन् चंद्र यांचा संबंध; तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे सध्याचे विदारक स्वरूप पहाता ‘तो कसा नसावा आणि कसा असावा’ इत्यादींचे विवेचन या ग्रंथात थोडक्यात केले आहे.

श्री गणपतीविषयीचे हे अध्यात्मशास्त्रीय ज्ञान गणेशभक्तांना आणि गणपतीची सांप्रदायिक साधना करणार्‍यांना निश्चितच उपयुक्त ठरेल; परंतु सर्वसाधारण व्यक्तीने या संदर्भात पुढील नियम लक्षात ठेवावा. रामायण वाचल्यावर श्रीरामाची, गणेशपुराण किंवा श्री गणपति अथर्वशीर्ष वाचल्यावर श्री गणपतीची आणि देवीमाहात्म्य वाचल्यावर देवीची उपासना करावी, असे काही जणांना वाटते. त्याचप्रमाणे या ग्रंथातील ज्ञान वाचून ‘आपणही
श्री गणपतीची उपासना करावी’, असे काही जणांना वाटण्याची शक्यता आहे. अशा व्यक्तींनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, अशा प्रकारच्या उपासनेने सर्वांचीच आध्यात्मिक उन्नती शीघ्र होत नाही; कारण गणपति इत्यादींची उपासना करणे त्यांना आवश्यक असले, तरच त्या उपासनेचा जास्त लाभ होतो, नाहीतर भरपूर काळ साधना करूनही फारच थोडी प्रगती होते. ‘गणपतीची उपासना ही पुढच्या टप्प्याची उपासना आहे अन् ती करणे आवश्यक आहे कि नाही’, हे सर्वसाधारण व्यक्तीला कळत नाही, तर अध्यात्मदृष्ट्या उन्नत असलेलेच ते सांगू शकतात; म्हणून सर्वसाधारण व्यक्तीने केवळ ज्ञान म्हणूनच हा ग्रंथ वाचावा. साधनेसंबंधी अनुभूती येण्याच्या दृष्टीने साधनेचा पहिला टप्पा म्हणून आपल्या कुलदेवतेच्या नावाचा ‘श्री… (कुलदेवी / कुलदेव यांच्या नावाचा चतुर्थीचा प्रत्यय)… नमः ।’ या पद्धतीने (उदा. कुलदेवी श्री भवानीदेवी असल्यास ‘श्री भवानीदैव्यै नमः ।’ याप्रमाणे) नामजप करावा. पुढे गुरूंनी गणपतीचा नामजप करण्यास सांगितले, तर त्या वेळी या ज्ञानाचा उपयोग गणपतीवरील श्रद्धा वाढण्यासाठी होईल. इतरांना या ग्रंथातील ज्ञान वाचून ‘गणपतीविषयी काहीतरी नवीन कळले’, असे जाणवेल.

हा ग्रंथ वाचून गणपतीच्या उपासकांची गणपतीवरील श्रद्धा दृढ होवो आणि त्यांना अधिक साधना करण्याची प्रेरणा मिळो, ही श्री गुरुचरणी प्रार्थना. – संकलक

(श्री गणपति ही देवता आणि त्याची उपासना करण्याच्या संदर्भातील प्रत्येक गोष्टीचे बुद्धीपलीकडील शास्त्रीय कारणमीमांसा करणारे ‘न भूतो न भविष्यति’ असे ज्ञान सनातनच्या ‘श्री गणपति – भाग ३’ आणि ‘श्री गणपति – भाग ४’ या ग्रंथांत दिले आहे.)

अर्पणमूल्य : ६० रु.

संपर्क क्रमांक : ९३२२३१५३१७

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्री गणपति’

Leave a Comment