वरुणदेवतेची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर सदैव राहावी, यासाठी समुद्रकिनारी राहणारे आणि समुद्राच्या माध्यमातून आपला चरितार्थ चालवणारे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करतात. ही पूजा करण्यामागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
समुद्राचे पूजन
नागपंचमीनंतर श्रावण महिन्यात येणारा हा दुसरा महत्त्वाचा सण आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात.
महत्त्व
‘या दिवशी अधिकाधिक प्रमाणात ब्रह्मांडात कार्य करणार्या आपतत्त्वाच्या लहरी वायूमंडलात (वातावरणात) भ्रमण करत असतात. वरुणदेवतेच्या पूजनाने या आपतत्त्वात्मक लहरींचा लाभ आपल्याला मिळतो. तसेच ब्रह्मांडातील चैतन्य अल्प कालावधीत या आपतत्त्वाच्या प्रवाहाबरोबर आपल्यात (देहात संक्रमित करणे) येणे शक्य होते. या दिवशी आपतत्त्वरूपी वायूमंडलाचे प्रमाण सागरी किनारा, तसेच नदीकाठ यांठिकाणी जास्त प्रमाणात असते. म्हणून तो प्रदेश पूजाविधीसाठी जास्त उपयुक्त मानला जातो. या दिवशी वरुणदेवतेचा आशीर्वाद मिळवून ब्रह्मांडातील अधिकतम प्रमाणात आपतत्त्वस्वरूप लहरी ग्रहण करण्याचा प्रयत्न केला जातो.’ - सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’ (टीप) ईश्वराची कृपा आणि प.पू. डॉ. जयंत आठवले यांची संकल्पशक्ती यांमुळे २००३ पासून सनातन संस्थेच्या काही साधकांना ज्ञानप्राप्ती होत आहे. ईश्वर गुरुतत्त्व, ब्रह्मतत्त्व, सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’, एक ज्ञानी इत्यादींच्या माध्यमातून ज्ञान देतो. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)
समुद्राचे पूजन
श्रावण पौर्णिमेला समुद्रकिनारी राहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम आणि संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. ‘सागरे सर्व तीर्थानि’ असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करतांना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो साहाय्य करतो.
नारळी पौर्णिमच्या दिवशी करायची प्रार्थना
‘नारळी पौर्णिमेच्या अगोदर समुद्राला भरती येणे, तसेच लाटांचे प्रमाण अधिक असणे, यांमुळे समुद्र खवळलेला असतो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रदेवतेला नारळ अर्पण करतात. तसेच ‘तुझ्या रौद्ररूपापासून आमचे रक्षण होऊ दे आणि तुझा आशीर्वाद प्राप्त होऊ दे’, अशी प्रार्थनाही करतात. त्यामुळे समुद्राला येणार्या भरतीचे प्रमाण अल्प होते.’
- कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा.
समुद्राला नारळ अर्पण कसा कराल ?
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात नारळ अर्पण करतांना तो पाण्यात फेकतात. त्यामुळे नारळ अर्पण करण्यामागील अपेक्षित लाभ मिळत नाही; त्यामुळे तो भावपूर्ण हळुवारपणे पाण्यात सोडावा अन् वरील प्रार्थना करावी !
नारळी पौर्णिमेला नारळाचे पूजन करून तो समुद्रदेवतेला अर्पण करणे या प्रक्रियेचे केलेले सूक्ष्म-परीक्षण
खालील चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !
१. ‘समुद्रदेवतेला भावपूर्ण वंदन केल्याने व्यक्तीमध्ये भावाचे वलय निर्माण होणे
२. (श्रीफळ समुद्राला अर्पण करण्यापूर्वी त्याचे पूजन करण्यात येते.) श्रीफळाचे पूजन केल्याने त्यात परमेश्वरी तत्त्वाचे वलय कार्यरत होणे
३. नारळात चैतन्याचे वलय कार्यरत होणे
३ अ. समुद्रदेवतेला शरणागत भावाने नारळ अर्पण केल्यामुळे चैतन्याचा प्रवाह समुद्राकडे प्रक्षेपित होणे
४. समुद्रदेवतेचे भावपूर्ण पूजन केल्यामुळे परमेश्वरी तत्त्वाचा प्रवाह समुद्रात आकृष्ट होणे
४ अ. अप्रकट स्वरूपातील परमेश्वरी तत्त्व वलयाच्या स्वरूपात प्रकट होऊन कार्यरत होणे
५. वरुणतत्त्व वलयाच्या स्वरूपात कार्यरत असणे
समुद्रदेवतेचे, म्हणजे वरुणदेवतेचे पूजन केले जाते. त्यामुळे वरुणतत्त्व वलयाच्या स्वरूपात कार्यरत असते.
निर्गुण तत्त्व
६. निर्गुण तत्त्व समुद्रामध्ये अधिक प्रमाणात वलयाच्या स्वरूपात कार्यरत असणे
६ अ. निर्गुण तत्त्वात्मक कण वातावरणात पसरणे आनंद
७. ईश्वराकडून आनंदाचा प्रवाह आकृष्ट होणे
७ अ. आनंदाचे वलय समुद्रात निर्माण होणे
७ आ. आनंदाचा प्रवाह व्यक्तीकडे प्रक्षेपित होणे
७ इ. आनंदाचे वलय व्यक्तीमध्ये निर्माण होणे चैतन्य
८. चैतन्याचा प्रवाह ईश्वराकडून समुद्रात आकृष्ट होणे
८ अ. चैतन्याचे वलय निर्माण होणे
८ आ. चैतन्याच्या प्रवाहाचे व्यक्तीकडे प्रक्षेपण होणे
८ इ. चैतन्याचे वलय निर्माण होणे
शक्ती
९. शक्तीचा प्रवाह समुद्रात आकृष्ट होणे
९ अ. शक्तीचे वलय निर्माण होणे
९ आ. शक्तीच्या प्रवाहाचे व्यक्तीकडे प्रक्षेपण होणे आणि शक्तीचे वलय निर्माण होणे
९ इ. शक्तीचे कण कार्यरत असणे
१०. व्यक्तीवरील काळ्या शक्तीचे आवरण दूर होणे’
- कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा.

अभिप्राय