आहाराचे (अन्नाचे) प्रकार
आणि त्याचे शरिरावर होणारे परिणाम

अनुक्रमणिका

१. माणूस स्वतःच्या वृत्तीनुसार आहार ग्रहण करत असतो

२. सात्त्विक, राजसिक, तामसिक आणि राक्षसी आहार (अन्न)

३. सूक्ष्म-चित्र

४. इतर सूत्रे

५. सात्त्विक, राजस आणि तामस आहाराची उदाहरणे

६. सात्त्विक, राजसिक आणि तामसिक आहाराचे शरिरावर होणारे परिणाम

७. अन्नाचे प्रकार


‘माणसाच्या प्रवृत्तीनुसार त्याच्या आहाराचे सत्त्व, रज आणि तम असे तीन प्रकार असतात. अन्न शाकाहारी आणि सात्त्विक असेल, तर मन आणि बुद्धी सात्त्विक होते. विविध प्रकारांच्या आहाराचे शरिरावर काय परिणाम होतात, हे आपण येथे पाहू.

१. माणूस स्वतःच्या वृत्तीनुसार आहार ग्रहण करत असतो

१. पूर्वीच्या काळी, व्यक्ती सत्त्वगुणी होती. त्यामुळे ती आहारात कंदमुळे खात असे. त्यात अधिक सात्त्विकता होती.

२. त्यानंतर काळ पालटला, त्याप्रमाणे आहारातही पालट झाला. माणूस वरण, भात, भाजी, आमटी असे रजोगुणी पदार्थ खाऊ लागला.

३. त्यानंतर पृथ्वीवरील रज-तमाचे प्राबल्य अधिकच वाढले. त्यामुळे माणसाच्या आहारात त्याप्रमाणे पालट झाले. तो मांस, मासे, मद्यपान असा तमोगुणी आहार करू लागला.’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (मार्गशीर्ष कृ. ५, कलियुग वर्ष ५१११ ६.१२.२००९)

२. सात्त्विक, राजसिक, तामसिक आणि राक्षसी आहार

अ. ‘सात्त्विक अन्न : फलाहार म्हणजे केळी, पेरू आदी झाडावरून काढलेली पक्व फळे तशीच खाणे.

आ. राजसिक अन्न : धान्याहार म्हणजे तांदूळ, डाळी, गहू आदी धान्ये शिजवून किंवा दळून खाणे.

इ. तामसिक अन्न : मांस, चरबी आदी पदार्थ शिजवून खाणे.

ई. राक्षसी अन्न : कच्चे मांस खाणे.

३. सूक्ष्म-चित्र

३ अ. केळे (सात्त्विक आहाराचे उदाहरण) चित्र

खालील सूक्ष्म-चित्र मोठे करून बघण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

४. इतर सूत्रे

अ. केळ्यात ईश्वरी तत्त्व असल्याने ते खाणार्‍याचा सूक्ष्म-देह शांत झाल्याचे जाणवते. खाणार्‍याला ही शांती अनुभवता येते. केळ्यातील ईश्वरी तत्त्वामुळेच ते पूजाविधीमध्ये आणि देवाची उपासना करतांना वापरले जाते.

आ. केळ्यामध्ये शक्ती असल्याने ते खाल्ल्याने देहाभोवती आलेले काळ्या शक्तीचे आवरण दूर होते आणि त्याची शुद्धी होऊन त्यातील प्राणशक्तीचे प्रमाण अन् त्याची कार्यक्षमता वाढते.

इ. केळ्यातून सूक्ष्म-गंध प्रक्षेपित होत असतो.

– सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (आश्विन शु. १०, कलियुग वर्ष ५१११ २८.९.२००९)

५. सात्त्विक, राजस आणि तामस आहाराची उदाहरणे

१. पिकलेली फळे सात्त्विक आहेत, फळांची लोणची राजस आहेत, तर फळांपासून बनवलेले मद्य तामस आहे.

२. दुष्ट लोकांनी दिलेले अन्न तामस, नातेवाइकांनी आणि मित्रांनी दिलेले अन्न राजस, तर संतांनी दिलेले अन्न सात्त्विक असते.

३. मद्यासह घेतलेले अन्न तामस, बोलत-बोलत (गप्पा मारीत) घेतलेले अन्न राजस आणि प्रत्येक घासासमवेत ‘गोविंद, गोविंद’ (नामजप) म्हणत घेतलेले तेच अन्न सात्त्विक होते.

४. उपाहारगृहातील आणि लग्नाच्या जेवणावळीतील अन्न राजस असते. देवतांच्या उत्सवप्रसंगी दिलेले, तसेच संतांनी केलेल्या भंडार्‍यांतील जेवण सात्त्विक असते.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अन्नं ब्रह्म । : खंड १’

६. सात्त्विक, राजसिक आणि तामसिक आहाराचे शरिरावर होणारे परिणाम

६ अ. सात्त्विक आहार

१. आयुः सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः ।

रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ।। – श्रीमद्भगवद्गीता १७.८

अर्थ : आयुष्य, सत्त्व, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती यांची वृद्धी करणारा; स्निग्ध; शरिरामध्ये जास्त काळ रहाणारा अन् मनास आनंददायक असा आहार सात्त्विक वृत्तीच्या लोकांना प्रिय असतो.

२. आहारशुद्धौ सत्त्वशुद्धिः । सत्त्वशुद्धौ ध्रुवा स्मृतिः ।

स्मृतिलम्भे सर्वग्रंथीनां विप्रमोक्षः । – छांदोग्योपनिषद, अध्याय ७, खंड २६, वाक्य २

अर्थ : सात्त्विक आहाराने सत्त्वशुद्धी होते, सत्त्वशुद्धीने आत्मस्मृती होते. त्यामुळे सर्व वासनाग्रंथी तुटतात आणि मुक्ती मिळते.

६ आ. राजसिक आहार

याने रजोगुण वाढतो. त्यामुळे वासना उद्दीपित होतात. उत्तेजना आणि कामवासना वाढते.

६ इ. तामसिक आहार

याने तमोगुण बळावतो. त्यामुळे आळस, अज्ञान, प्रमाद आणि पाप वाढते. व्यक्तीला विचार आणि विवेक करता येत नाही. मानसिक अकर्मण्यता येते.

७. अन्नाचे प्रकार

१. भक्ष्यान्न : दातांनी चावून खावे लागणारे कडक अन्न, उदा. शेंगदाणे, लाडू इत्यादी.

२. भोज्यान्न : चावून / कालवून खावे लागणारे मऊ अन्न, उदा. पोळी, भात इत्यादी.

३. चोष्यान्न : चोखून खावे लागणारे अन्न, उदा. उस, आंबा इत्यादी.

४. लेह्यान्न : चाटून खावे लागणारे अन्न, उदा. चटणी, रायते, मुरंबा इत्यादी.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सात्त्विक आहाराचे महत्त्व’

Leave a Comment