लेखात ज्या ठिकाणी '(टीप)' असे लिहिले असेल तेथे कर्सर न्यावा.


Google Groups
Subscribe to
Sanatan Sanstha
Email: Visit this group



वाचकांना विनंती !

१. ‘संस्कृत’ ही देवभाषा असून चैतन्यदायी आहे. तिच्यातील चैतन्याचा लाभ वाचकांना व्हावा, यासाठी संकेतस्थळावर संस्कृत श्लोक / वचने देण्यात येतात. यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास वाचकांनी त्या आम्हाला अवश्य कळवाव्यात.

२. संकेतस्थळावर संस्कृत वचने / श्लोक संदर्भासहित दिले आहेत. काही संस्कृत वचनांचे / श्लोकांचे संदर्भ मिळू शकले नाहीत, त्यांच्यापुढे कंसात ‘संदर्भ : अज्ञात’ असे लिहिले आहे. त्यांचा संदर्भ ज्ञात असल्यास कृपया वाचकांनी तो कळवावा.

संगणकीय पत्ता : sanatan@sanatan.org




श्री रेणुकादेवीचा नामजप कसा करावा ?

श्री रेणुकादेवी
श्री रेणुकादेवी

         देवीच्या विविध रूपांची ‘कुलदेवी’ म्हणून उपासना केली जाते. त्यांतील श्री रेणुकादेवी या रूपातील देवीचा नामजप कसा करावा, हे आपण आता समजून घेणार आहोत. तत्पूर्वी पाहूया, श्री रेणुकादेवीची थोडक्यात माहिती.



रेणुकादेवीची निर्मिती

         स्कंदपुराणातील सह्याद्रीखंडानुसार शिवाचा वर मिळवून श्री रेणुकादेवी पृथ्वीवर उतरली आणि कन्याकुब्ज देशाचा ईक्ष्वाकुवंशीय राजा ‘रेणू' याने केलेल्या यज्ञातून ती प्रकटली, यामुळे तिला ‘रेणुका' असे नाव पडले आहे. श्री रेणुकादेवी ही जमदग्नी ऋषींची पत्नी आणि भगवान परशुरामांची आई होय. तिचे स्थान महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामधील माहूर या गडावर आहे. माहूर हे महाराष्ट्रातील प्रमुख साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असून ते शक्तीचे मूळपीठ मानले जाते. या ठिकाणी देवीचा तांदळा आहे. तांदळा म्हणजे मुखवटा.



देवीचा ‘तांबूल प्रसाद’ !

         श्री रेणुकादेवीला नैवेद्य म्हणून विड्याची पाने, चुना, काथ, ओवा, बडीशेप, लवंग, वेलदोडा, खोवलेले किंवा किसलेले खोबरे आणि सुपारी हे सर्व एकत्र कुटून भरवण्याची पद्धत आहे. त्याला ‘तांबूल' असे म्हणतात. अभिषेक, पूजा इत्यादी झाल्यावर हा ‘तांबूल प्रसाद’ भक्तांना दिला जातो.



देवीचा तारक नामजप कसा करावा ?

         ‘श्री रेणुकादेव्यै नमः ।' हा नामजप देवीच्या तारक तत्त्वाशी संबंधित आहे, त्यामुळे ‘रेणुका' या शब्दातील ‘का' हे अक्षर उच्चारतांना थोडेसे लांबवावे, यामुळे भावजागृती लवकर होण्यास साहाय्य होते.


         आता आपण ऐकूया, श्री रेणुकादेवीचा नामजप .......



सनातन-निर्मित सात्त्विक नामपट्टी
सनातन-निर्मित सात्त्विक नामपट्टी

         देवतेच्या तारक किंवा मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे तारक किंवा मारक नामजप. याविषयीची सविस्तर माहिती ‘नाम’ या लिंकवर उपलब्ध आहे.


संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्माचे प्रास्ताविक’


संबंधित लेख

» नामसंकीर्तनयोग
» नामजप : कलियुगातील श्रेष्ठ उपासना !
» श्री दुर्गादेवीची उपासना


Total Comments: 1
ratnadip joshi, India (Bharat)
20 Oct 2012, 12:12

अत्यंत सुंदर माहिती . सर्वांना उपयुक्त अशा या मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद. सर्व देवी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा.

अभिप्राय

* आपला अभिप्राय मोडरेटरकडून तपासून येइपर्यंत वेळ लागू शकतो.
* कृपया अयोग्य शब्द टाळावे.
* URLs व संगणकीय पत्ता टाकण्यास प्रतिबंध आहे.
 
नाव :   लक्षात ठेवा ?: 
आपला संगणकीय पत्ता:   
शहर :
देश :
अभिप्राय:
You may enter 700 letters. Type in Marathi (Press Ctrl+m to toggle between English and Marathi)
Image Characters: