देवाला साष्टांग नमस्कार कसा घालावा ?

साष्टांग नमस्कार घालणे

साष्टांग नमस्कार घालणे

देवाच्या मूर्तीसमोर पुरेसे मोकळे स्थान (जागा) असल्यास देवाला साष्टांग नमस्कार घालणे इष्ट असते. या लेखात शास्त्रशुद्ध साष्टांग नमस्कार कसा घालावा, याचे वर्णन केले आहे. हे वर्णन वाचून अनेकांना देवळात, गणेशोत्सवात आरतीनंतर आदी प्रसंगी योग्य प्रकारे साष्टांग नमस्कार घालण्याची प्रेरणा मिळेल !

 

१. विधीवत साष्टांग नमस्कार म्हणजे काय आणि तो करण्यामागील शास्त्र काय ?

(साष्टांग नमस्कार म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक पद्धतीने देवतांना शरण येणे अन् त्याद्वारे आत्मशक्‍ती जागृत करून संपूर्ण स्थूलदेह आणि सूक्ष्मदेह यांची शुद्धी केली जाणे)

उरसा शिरसादृष्ट्या मनसा वचसा तथा

पद्भ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणामोऽष्टांगमुच्यते ।

अर्थ : १. छाती, २. शिर (डोके), ३. दृष्टी (डोळ्यांनी नमस्कार करणे), ४. मन (मनाने नमस्कार करणे), ५. वाचा (‘तोंडाने’ नमस्कार असे म्हणणे), ६. पाय, ७. हात आणि ८. जानु (गुडघे), भूमीला टेकवून नमस्कार करणे म्हणजे साष्टांग नमस्कार.

‘याप्रमाणे केल्या जाणार्‍या नमस्काराला ‘विधीवत नमस्कार’ असे म्हणतात. यामध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक पद्धतीने देवतांना शरण येऊन त्यांना आवाहन केले जाते.

देवतांना शरण जाण्याची पद्धत

कार्य

वैशिष्ट्य

१. कायिक (शरीर)
अ. पाय, गुडघे
आणि हात

आ. छाती

इ. शिर

ई. दृष्टी

पापक्षालन करणे

अनाहतचक्र जागृत करणे

भावऊर्जेसहित आज्ञाचक्र जागृत करून देवतांकडून येणार्‍या लहरी ग्रहण करणे

दृष्टीभेदाने अंतःचक्षूंची जागृती करून मस्तिष्क पोकळी कार्यरत करणे

प्रत्यक्ष कर्म करणार्‍या अवयवांच्या माध्यमातून शरण येणे

भक्‍तीभाव

सहजभाव

वात्सल्यभाव

२. वाचिक (वाचा) वाणी चैतन्ययुक्‍त बनवून वाणीची शुद्धी करणे वाचिक शरणागती
३. मानसिक (मन) अंतर्मुखता प्राप्त करून देवतेच्या चैतन्यलहरींचा जास्तीतजास्त लाभ करून घेऊन देहबुद्धी न्यून करण्याचा प्रयत्‍न करणे मानसिक शरणागती

अशा प्रकारे साष्टांग नमस्कारातून आत्मशक्‍ती जागृत करून संपूर्ण स्थूलदेह आणि सूक्ष्मदेह यांची शुद्धी केली जाते.

 

२. साष्टांग नमस्काराची दुसरी व्याख्या

षड्‌रिपू, मन आणि बुद्धी या आठ अंगांसह ईश्‍वराला शरण जाणे, म्हणजे साष्टांग नमस्कार करणे होय. षड्‌रिपू हे सूक्ष्ममनाशी संबंधित आहेत. वरील व्याख्येत मन आणि बुद्धी हे दोन घटक अनुक्रमे स्थूलमन आणि स्थूलबुद्धी या अर्थी वापरले आहेत. ईश्‍वरप्राप्तीची तळमळ ६० टक्क्यांच्या पुढे असलेला साधकच ‘अहं’सहित शरण येऊ शकतो; म्हणून वरील व्याख्या ही सर्वसाधारण तळमळ असलेल्या साधकाच्या संदर्भातील आहे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.७.२००५, दुपारी १.३४)

(षड्‌रिपू म्हणजे चित्तावर जन्मोजन्मीच्या असलेल्या संस्कारांचा आविष्कार. संस्कार हे चित्ताशी, म्हणजे अंतर्मनाशी संबंधित असतात आणि अंतर्मन हे बाह्यमनाच्या संदर्भात सूक्ष्म आहे. यासाठी षड्रिपू हे सूक्ष्ममनाशी संबंधित असतात, असे येथे म्हटले आहे. सर्वसाधारणतः ज्यांना आपण विचार करणारे मन (बाह्यमन) आणि विचार करणारी बुद्धी असे संबोधतो, त्यांना येथे अनुक्रमे स्थूलमन आणि स्थूलबुद्धी असे संबोधले आहे. – संकलक)

 

३. कृती

अ. साष्टांग नमस्कार घालतांना प्रथम दोन्ही हात छातीशी जोडून कटीत (कमरेत) वाकावे आणि त्यानंतर ओणवे होऊन दोन्ही हात भूमीवर टेकवावेत.

आ. आधी उजवा, मग डावा पाय मागे ताणून सरळ लांब करावा.

इ. हातांचे कोपरे दुमडून डोके, छाती, हात, गुडघे नि पायांची बोटे भूमीला टेकतील, असे आडवे पडावे आणि डोळे मिटावेत.

ई. मनाने नमस्कार करावा. मुखाने ‘नमस्कार’ असे उच्चारावे.

उ. उभे राहून छातीशी हात जोडून भावपूर्ण नमस्कार करावा.

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘नमस्काराच्या योग्य पद्धती’

Leave a Comment