सनातनचे अद्वितीयत्व !
लेखात ज्या ठिकाणी '(टीप)' असे लिहिले असेल तेथे कर्सर न्यावा.


Google Groups
Subscribe to
Sanatan Sanstha
Email: Visit this group



वाचकांना विनंती !

१. ‘संस्कृत’ ही देवभाषा असून चैतन्यदायी आहे. तिच्यातील चैतन्याचा लाभ वाचकांना व्हावा, यासाठी संकेतस्थळावर संस्कृत श्लोक / वचने देण्यात येतात. यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास वाचकांनी त्या आम्हाला अवश्य कळवाव्यात.

२. संकेतस्थळावर संस्कृत वचने / श्लोक संदर्भासहित दिले आहेत. काही संस्कृत वचनांचे / श्लोकांचे संदर्भ मिळू शकले नाहीत, त्यांच्यापुढे कंसात ‘संदर्भ : अज्ञात’ असे लिहिले आहे. त्यांचा संदर्भ ज्ञात असल्यास कृपया वाचकांनी तो कळवावा.

संगणकीय पत्ता : sanatan@sanatan.org




सनातनची उत्पादने !

सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने
सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने

प.पू. डॉक्टरांनी समस्त मानवजातीच्या उद्धारासाठी आशीर्वादरूपी दिलेली
अमूल्य भेट म्हणजे सनातनची उत्पादने, त्यांतील तत्त्व आणि त्यांची उपयुक्‍तता


१. कुंकू


तत्त्व कोणत्या प्रकारच्या त्रासावर उपयुक्‍त वापरायची पद्धत किंवा परिणाम
देवी
 थकवा आणि प्राणशक्‍ती न्यून होणे


 कुंकवाच्या सुगंधातून प्रक्षेपित होणार्‍या मारक देवीतत्त्वाच्या सुगंधाने प्राणशक्‍ती मिळून थकवा अल्प होण्यास साहाय्य होणे


२. अष्टगंध


तत्त्व कोणत्या प्रकारच्या त्रासावर उपयुक्‍त वापरायची पद्धत किंवा परिणाम
गणपति आणि कृष्ण
 १. प्राणशक्‍ती न्यून होणे आणि निरुत्साह जाणवणे
 २. खरखरीत त्वचेला लावल्यास ती मुलायम होणे
त्रास अल्प होणे





३. अत्तर

अ. चंदन


तत्त्व कोणत्या प्रकारच्या त्रासावर उपयुक्‍त वापरायची पद्धत किंवा परिणाम
श्रीकृष्ण
 थकवा येऊन श्‍वास घेण्यास त्रास होणे

 याच्या सुगंधाचा दीर्घ श्‍वास घेतल्याने त्रास अल्प होणे


आ. चमेली


तत्त्व कोणत्या प्रकारच्या त्रासावर उपयुक्‍त वापरायची पद्धत किंवा परिणाम
मारक देवी
 मांत्रिकाच्या शारीरिक हालचाली, विशेषतः डोळ्यांवाटे प्रकटीकरण होणे
 अत्तराचा सुगंध घेणे, खोल श्‍वास घेऊन दोन श्‍वासांमध्ये काही क्षणांचे अंतर ठेवून श्‍वास घेणे


इ. मोगरा


तत्त्व कोणत्या प्रकारच्या त्रासावर उपयुक्‍त वापरायची पद्धत किंवा परिणाम
तारक देवी आणि श्रीराम
 मानसिक किंवा बौदि्धक प्रकटीकरण होणे, म्हणजे विचारांच्या माध्यमातून त्रास होणे
 सुगंधाचा दीर्घ श्‍वास घेणे



४. गोमूत्र


तत्त्व कोणत्या प्रकारच्या त्रासावर उपयुक्‍त वापरायची पद्धत किंवा परिणाम
गायत्रीदेवी
 १. विविध प्रकारचे शारीरिक आणि काही प्रमाणात मानसिक त्रास होणे
 २. स्थूल अन् सूक्ष्म देह जडत्व, काळी शक्ती साठलेली असणे
 ३. पचनसंस्थेचे विकार पाण्यातून ग्रहण केल्याने
 सुगंध दुरून घेतल्यासही लाभ होणे

 पाण्यात गोमूत्र घालून स्नान केल्याने देहांची शुद्धी होणे
 पचनसंस्थेचे त्रास न्यून होणे


५. दंतमंजन


तत्त्व कोणत्या प्रकारच्या त्रासावर उपयुक्‍त वापरायची पद्धत किंवा परिणाम
 दात, जीभ आणि हिरड्या यांवरील काळ्या शक्‍तीचे आवरण (टीप) वाईट शक्‍तींनी काळी शक्‍ती प्रक्षेपित केल्यामुळे व्यक्‍तीचे मन आणि बुद्धी यांच्याभोवती त्रासदायक स्पंदनांचे सूक्ष्म-आच्छादन निर्माण होते, त्याला ‘काळ्या शक्‍तीचे आवरण’ असे म्हणतात. अन् त्यांमध्ये साठलेल्या काळ्या शक्‍तीमुळे दात सळसळणे, हिरड्यांतून रक्‍त येऊन वेदना होणे, जीभ जड होणे
 मधल्या बोटाने दात घासल्यावर त्रास उणावणे मुखशुद्धी होऊन मुखाद्वारे वायूरूपी वाईट शक्‍तींचा देहात प्रवेश न होणे



६. कापूर


तत्त्व कोणत्या प्रकारच्या त्रासावर उपयुक्‍त वापरायची पद्धत किंवा परिणाम
सगुण-निर्गुण तारक शिवतत्त्व
 १. श्‍वसनाचे विकार, सर्दीचा त्रास, शरीर, मन आणि बुद्धी यांना एकत्रित त्रास होऊन प्रकटीकरण होणे
 २. साधकाचे अस्तित्व अल्प होणे, स्मृतीभ्रंश होणे, बाहेरून आणि आतून एकाच वेळी मांत्रिकांचे सातत्याने आक्रमण होऊन शरीर पिळवटले जाणे, यांसारखे अनेक त्रास होणे
 ३. त्वचा आणि त्वचेलगतच्या अवयवांवरील काळ्या शक्‍तीचे आवरण अन् काळी शक्‍ती नष्ट होणे; शरिरात आणि भोवती सगुण-निर्गुण स्तरावरील संरक्षककवच निर्माण होऊन शरिरात वाढलेली सात्त्विकता दीर्घकाळ टिकून रहाणे
 ४. कपड्यांमध्ये साठलेली काळी शक्‍ती साठणे आणि दुर्गंधी येणे

    
 दीर्घ सुगंध घेणे


 दीर्घ सुगंध घेणे श्‍वास घेतल्याने त्रास अल्प होणे, उत्साहात वाढ होणे


 कापराची पूड आंघोळीच्या पाण्यात घालून स्नान करणे



 कापराच्या पाण्यात कपडे भिजत घालून ते धुणे

 कपड्यांचे जडत्व अल्प होऊन सुगंध येऊन कपडे पाहिल्यावर किंवा घातल्यावर उत्साह जाणवणे


७. उटणे : मारक श्रीकृष्ण आणि तारक देवी अन् मारक गणपति


अ. याच्या मारक सुगंधाने देहाभोवतीच्या देहमंडलाची शुद्धी होऊन मांत्रिकांनी देहाच्या बाहेर ठेवलेली काळ्या शक्‍तीची स्थाने नष्ट होऊन देहाला होणार्‍या वेदना आणि बाहेरून जाणवणारा दाब अल्प होणे
आ. उटण्याने स्नान केल्याने त्वचेतील सूक्ष्म छिद्रांमध्ये वायूतत्त्वाच्या स्तरावर साठवलेली काळी शक्‍ती नष्ट होऊन जडत्व अल्प होणे, त्वचेतील रंध्रारंध्रात चैतन्यमय कणांचा संचार होणे, देहाभोवती सूक्ष्म चैतन्यमय संरक्षककवच निर्माण होऊन बाहेरच्या दिशेने वायूतत्त्वाच्या स्तरावर होणार्‍या मांत्रिकांच्या आक्रमणांपासून स्थूलदेह अन् मनोदेह यांचे रक्षण होणे
इ. गुलाबकळी, नागरमोथा, वाळा, अनंतमूळ यांसारखी ११ सुगंधी औषधीद्रव्ये आणि यज्ञातील विभूती यांसारख्या आध्यात्मिक घटकांनी युक्‍त सनातन उटणे !

८. देहातील काळी शक्‍ती नष्ट करणारा सनातन-निर्मित साबण



    स्थूलदेहात पुष्कळ प्रमाणात काळी शक्‍ती आणि अनेक वर्षांपासून रज-तम कण साठलेले असल्यास साबण उपयुक्‍त आहे. सनातन-निर्मित साबणाचा सातत्याने वापर केल्याने देहातील काळी शक्‍ती आणि तिची स्थाने नष्ट होण्यास साहाय्य होते. मांत्रिकाची स्थूलदेहशी एकरूपता आणि त्याचे त्रासदायक परिणाम नष्ट करण्याचे कार्य सनातन साबणाने होते.

८ अ. प्रकार आणि उपयुक्‍त ठरणारा विकार
१. चमेली : त्वचेची आग होणे
२. नीम : त्वचा चरचरीत आणि काळपट होणे
३. तुळस : त्वचेवर पांढरे चट्टे, पुरळ उठणे, त्वचा लाल पडणे
४. अष्टगंध
अ. त्वचा संवदेनशील होण्याचे प्रमाण अत्यल्प होऊन संवेदना अल्प जाणवणे
आ. त्वचेची संवेदना अधिक होऊन त्वचेला धूळ, पाणी, हवा यांच्या स्पर्शमात्राने त्रास होणे
इ. त्वचा निस्तेज दिसणे; त्वचा कोरडी होऊन सुरकुत्या पडणे
ई. मांत्रिक (टीप) मनुष्याला त्रास देणारे भुवलोक आणि पाताळ येथील अदृश्य जीव (लिंगदेह) म्हणजे आसुरी शक्‍ती. आसुरी शक्‍तीचे भूत, पिशाच, हडळ यांसारखे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांपैकी सर्वांत बलाढ्य आसुरी शक्‍तीला ‘मांत्रिक’ म्हणतात. मांत्रिक व्यक्‍तीच्या शरिराबाहेर राहून किंवा तिच्या शरिरात राहून तिला त्रास, तसेच धर्मकार्यातही अडथळे आणतात. त्वचेशी एकरूप झालेला असणे

८ आ. वापरण्याची पद्धत : सुगंध घेणे, आज्ञाचक्रावर लावणे

९. सनातन-निर्मित उदबत्ती

सनातन-निर्मित उदबत्ती
सनातन-निर्मित उदबत्ती

९ अ. लाभ

१. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या देहांच्या शुद्धीसह अन्नमय, प्राणमय, ज्ञानमय आणि विज्ञानमय या सर्व कोषांमध्ये साठलेले सूक्ष्मतर स्तरावरील रजतम गुण आणि काळ्या शक्‍तीची स्थाने नष्ट करण्याचे सामर्थ्य आहे.

२. उदबत्तीमध्ये उच्च देवतांचे सुगंधमय सूक्ष्म स्तरावरील पृथ्वीतत्त्व आणि सूक्ष्मतर स्तरावरील तेजतत्त्व कार्यरत असल्याने तिचा परिणाम सर्व देह आणि सर्व कोष यांवर होऊन त्यांची सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते.

३. मांत्रिकाचे स्थूल आणि सूक्ष्म देह यांच्याशी असलेली एकरूपता अन् त्याचे त्रासदायक परिणाम नष्ट करण्याचे कार्य काही प्रमाणात साध्य होते.

९ आ. प्रकार

१. चंदन : स्थूल आणि सूक्ष्म देह यांभोवती काळे आवरण येणे, प्राणशक्‍ती सातत्याने न्यून होऊन दीर्घकाल थकवा आणि मनाला निराशा जाणवणे.

२. चमेली : देहाभोवतीचे काळे आवरण वाढून शरिराला जडत्व आणि मनाला निरुत्साह जाणवणे

३. केवडा : देहाभोवतीचे आवरण वाढून देहावर बाहेरून होणार्‍या मोठ्या प्रमाणातील आक्रमणामुळे शारीरिक जडत्व जाणवून वेदना होणे आणि मनाला निरुत्साह किंवा निराशा येऊन बुद्धीलाही न सुचणे

४. खस : वरील तिन्ही प्रकारचे त्रास तीव्रतेने किंवा दीर्घकाल होत असतील, तर खस उदबत्तीचा सुगंध घेऊन इतर तिन्ही उदबत्त्यांद्वारे देहांभोवतीचे काळ्या शक्‍तीचे आवरण  काढल्याने त्रासाची तीव्रता अल्प होते.

 

९ इ. वापरण्याची पद्धत : उदबत्तीने आवरण काढणे.

         स्थूल आणि सूक्ष्म देह यांभोवती ‘रज-तम’चे आवरण आल्यावर थकवा येणे, काही न सुचणे, निराशा येणे असे प्रकार होतात. प्रार्थना करत उदबत्ती देहाभोवती फिरवल्याने ‘रज-तम’चे विघटन होऊन आवरण नष्ट होते आणि ताजेतवाने तसेच उत्साही वाटायला लागते.


१०. ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे, जवळ बाळगणे आणि वास्तूत ठेवणे

         ‘सनातन प्रभात’चे वाचन आणि जवळ बाळगल्याने त्यातून प्रक्षेपित होणार्‍या उच्च देवतांच्या मारक शक्‍तीच्या ज्ञानलहरींमुळे अधर्माचे सावट दूर होऊन सर्व प्रकारच्या वाईट शक्‍तींच्या आक्रमणांपासून वास्तूत रहाणार्‍यांचे रक्षण होते. मांत्रिकाचे स्थूल आणि सर्व सूक्ष्म देह यांवर असणारे नियंत्रण अत्यल्प होऊन त्यांचे नियंत्रण भगवंताकडे जाण्यास आरंभ होतो.

अ. मनोदेहावरील काळ्या आवरणाचा प्रभाव दूर करते.

आ. मन सकारात्मक आणि उत्साहित होऊन बुद्धीवरील काळ्या शक्‍तीचे आवरणही विरळ होते.

इ. वास्तूतील काळ्या शक्‍तीने भारित रज-तम कणांचे उच्चाटन करून वातावरण शुद्ध आणि सात्त्विक बनते. वास्तूतील भुते आणि पूर्वजांचे त्रासदायक लिंगदेह यांना वास्तूत रहाता येत नाही. ‘सनातन प्रभात’ एखाद्या वास्तूत सातत्याने राहिल्याने वास्तूत वास करणार्‍या वरिष्ठ वाईट शक्‍तींची शक्‍ती न्यून होते.


११. अनेक देवतांच्या चित्रांमुळे सात्त्विकता प्रदान करणारे सनातन पंचांग

सनातन पंचांग
सनातन पंचांग

अ. सर्व देहांवरील काळ्या शक्‍तीच्या आवरणाचा प्रभाव नष्ट होतो.

आ. सर्व देहांची सात्त्विकता वाढून त्यांची चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता वाढते.

इ. चित्तावर धर्माचरणाचे संस्कार करून धर्माच्या अधिष्ठानाची स्थापना प्रत्येक कुटुंबात चालू होते.

ई. वास्तूमध्ये सात्त्विकता, धर्मशक्‍ती, चैतन्य, तसेच आनंद यांचे प्रक्षेपण करून वास्तू काही दिवसांत शुद्ध होते.

उ. वास्तूभोवतीचे वायूमंडल काही मासांत शुद्ध होते.

ऊ. वाईट शक्‍तींना वास्तूत स्थान करण्यासाठी संधी उपलब्ध होत नाही.

ए. पंचांगातील जागृत देवतांच्या चित्रांमुळे उच्च देवतांच्या सूक्ष्मतम तत्त्वलहरींना वास्तूत प्रवेश मिळून वास्तू आणि वास्तूत रहाण्यार्‍या व्यक्‍तींचे वाईट शक्‍तींपासून संरक्षण होऊन ते धर्माचरणी बनतात.


१२. धर्मसत्संग

         धर्मसत्संगाद्वारे उच्च देवतांच्या सगुण-निर्गुण स्तरावरील तत्त्वलहरी शब्दज्ञानाच्या रूपाने वास्तूत कार्यरत होऊन रज-तम, काळी शक्‍ती आणि राजसिक-तामसिक माया यांचा प्रभाव वेगाने नष्ट करून वास्तूतील वातावरण अन् वास्तूभोवतीचे वायूमंडल शुद्ध होते तसेच ऐकणार्‍या प्रेक्षकांवरील त्यांचा प्रभाव न्यून होतो. धर्माचे शास्त्र जाणल्याने चित्तावरील धर्माचरणाचे संस्कार अधिक दृढ होतात. धर्माचरण करण्याची ओढ वाढून धर्मावरील विश्‍वासाचे रूपांतर श्रद्धेत होते. धर्मसत्संगातून धर्मशक्‍ती, चैतन्य, आनंद आणि अल्प प्रमाणात शांती या लहरींचे प्रक्षेपण झाल्याने मध्यम स्तरावरील वाईट शक्‍तींच्या आक्रमणांपासून वास्तूतील व्यक्‍ती आणि वास्तू यांचे रक्षण होते.


१३. हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे आणि मोठ्या स्तरावर योगदान असलेले सनातनचे ग्रंथ !

सनातनचे ग्रंथ
सनातनचे ग्रंथ

अ. सर्व देह आणि सर्व सूक्ष्म-कोष यांवरील काळ्या शक्‍तीचे आवरण (टीप) वाईट शक्‍तींनी काळी शक्‍ती प्रक्षेपित केल्यामुळे व्यक्‍तीचे मन आणि बुद्धी यांच्याभोवती त्रासदायक स्पंदनांचे सूक्ष्म-आच्छादन निर्माण होते, त्याला ‘काळ्या शक्‍तीचे आवरण’ असे म्हणतात. वाईट शक्‍तींनी काळी शक्‍ती प्रक्षेपित केल्यामुळे व्यक्‍तीचे मन आणि बुद्धी यांच्याभोवती त्रासदायक स्पंदनांचे सूक्ष्म-आच्छादन निर्माण होते, त्याला ‘काळ्या शक्‍तीचे आवरण’ असे म्हणतात. नष्ट होऊन त्यांच्या स्थानांचे विघटन होण्यास आरंभ होतो अन् सात्त्विकता भरभर वाढू लागते.

आ. चित्तावर धर्माचरणाचे संस्कार दृढ करून साधनेचे बीज पेरले जाते.

इ. मनाची चंचलता उणावून मन स्थिर आणि सकारात्मक होते.

ई. बुद्धीची सात्त्विकता वाढून सद्सद्विवेक बुद्धीत रूपांतर होऊ लागते आणि साधना करण्याचा बुद्धीचा निश्चय होतो.

उ. वास्तूच्या आतील वातावरण, वास्तूच्या सभोवतालचे वायूमंडल चैतन्याच्या स्तरावर शुद्ध होऊन ईश्‍वराचे निर्गुण-सगुण चैतन्य वास्तूत आकृष्ट होते.

ऊ. सतत ग्रंथांच्या सत्संगात राहिल्याने आणि त्यानुसार आचरण केल्याने व्यक्‍ती अन् वास्तू यांभोवती चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होऊ लागते.

ए. ग्रंथातून प्रक्षेपित होणार्‍या ज्ञानशक्‍तीच्या निर्गुणसगुण सूक्ष्मतर चैतन्यलहरींमुळे वास्तूवर निर्गुण स्तरावरील उपायांना आरंभ होऊन बलाढ्य वाईट शक्‍तींना वास्तूच्या जवळही फिरकता येत नाही. आनंदमय शांती आणि ज्ञानशक्‍ती यांच्या निर्गुणसगुण सूक्ष्मतर चैतन्यलहरींमुळे ग्रंथांचे मनापासून वाचन करणार्‍या जिवावरील मायेचा प्रभाव न्यून होऊन साधनेची ओढ जागृत होते.

ऐ. मांत्रिकांची लिंगदेहाशी असलेली एकरूपता आणि तिचे परिणाम सनातन-निर्मित ग्रंथ यांमुळे न्यून होऊन व्यक्‍तीचे अस्तित्व वाढून मांत्रिकाच्या जाचातून मुक्‍ती मिळण्यास साहाय्य होते.’


- श्रीकृष्ण (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, भाद्रपद शु. एकादशी, कलियुग वर्ष ५११३ (८.९.२०११), रात्री १०.१८)



सनातनच्या सात्त्विक उत्पादनांतील चैतन्य !

१. सनातनचे सात्त्विक कुंकू लावल्यावर वर्षभर होत असलेला शारीरिक आणि मानसिक त्रास नाहीसा होणे

         ‘आमच्या परिचयातील एका काकूंना मागील वर्षभर अस्वस्थ वाटणे, डोके दुखणे, झोप न येणे, काही कळेनासे होणे आणि निराश वाटणे, अशा प्रकारचे त्रास होत होते. त्यांना मी सनातनचे सात्त्विक कुंकू कपाळास लावण्यास दिले. त्यानंतर भेटल्यावर त्यांनी मला सांगितले, ‘‘एकदा मला त्रास होत असतांना मी सनातनचे कुंकू लावले आणि १५ मिनिटांनी मला एकदम उत्साह वाटू लागला. माझी मरगळ निघून गेली. असा अनुभव मला ५-६ वेळा आला. त्यामुळे आता मला त्रास होऊ लागला की, मी लगेच ते कुंकू लावते आणि मगच इतर कामांना आरंभ करते.’’


२. बोडणाच्या वेळी सनातनच्या वास्तूछतामुळे
घरात पुष्कळ प्रकाश पसरून बाहेरून चैतन्य घरात आल्याचे जाणवणे

         आमच्याकडे कुलाचारामध्ये ‘बोडण’ असल्यामुळे ते भरण्यासाठी आम्ही घरी ७-८ सवाष्णींना (सौभाग्यवती स्त्रियांना) बोलावले होते. कुलाचाराप्रमाणे घरात येतांना त्यांच्या पावलांवर दूध-पाणी घालून मी त्यांना आत घेतले. परत जातांना त्यांच्यापैकी एकजण मला म्हणाल्या, ‘‘तुमच्या घरात आल्यावर ‘पुष्कळ प्रकाश पसरला आहे’, असे वाटत होते. भिंतीवरच्या नामपट्ट्या पाहून मला फार आनंद वाटत होता आणि ‘बोडण चालू असतांना बाहेरचे चैतन्य घरात येत आहे’, असे मला वाटत होते.’’ मला हे सांगतांनासुद्धा त्यांना फार प्रसन्न वाटत होते. त्यांना मी सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व सांगितले. आता त्या आपली सात्त्विक उत्पादने नियमित वापरतात.


३. दत्ताच्या चित्रामुळे अंगावर करणीच्या फुल्या उठणे कमी होणे

         आमच्या घराजवळ एक मध्यमवयीन ताई रहाते. तिला वाईट शक्‍तींच्या करणीचा त्रास आहे. तिच्या अंगावर फुल्या उठून त्यांतून रक्‍त येते. तिने हे माझ्या सासूबाईंना सांगितले. तेव्हा त्यांनी तिला सभोवताली दत्ताची चित्रे लावून बसण्यास सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या असे लक्षात आले की, ती (लघवीला जाणे, दार उघडणे यांकरता) दत्ताच्या चित्रांच्या मंडलाच्या बाहेर आल्यास तिच्या अंगावर फुल्या उठतात.’


- सौ. केतकी शशांक साने, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


केवळ बाह्यशुद्धीच नव्हे, तर शरिरावरील
त्रासदायक रज-तमाचे आवरण नष्ट करणारी सनातनची उत्पादने !

         हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने व्यक्‍ती, वास्तू आणि भोवतालचे वायूमंडल यांमध्ये सत्त्वगुणाचे संवर्धन करणे, धर्माचा पाया रचणे आणि त्यावर साधनेचे  मंदिर उभारून त्यातील गाभार्‍यात ईश्वरी अधिष्ठान निर्माण करण्याचे संतांसारखे प्रचंड आध्यात्मिक सामर्थ्य असलेली सनातनची उत्पादने !





Total Comments: 13
abhay mirajkar, India (Bharat)
16 May 2013, 18:35
मी खूप भाग्यवान आहे की हि उत्पादने मला वापरण्याची आणि वितरण करण्याची संधी प.पू. डॉक्टर यांनी मला दिली. याबद्दल कृतज्ञता.
swapnil kodolikar, India (Bharat)
03 Apr 2013, 12:57

सनातनची उत्पादने फारच छान असून जेवढी शुद्ध तशीच त्यामानाने किंमतीने न्यून (कमी)सुद्धा आहेत. सर्वांनी एकदा नक्की वापरून पहावीत मग परत परत वापरण्याचा मोह नक्की होईल .
Ajay Naik, India (Bharat)
23 Mar 2013, 14:05

सनातनचे दंतमंजन वापरात आले. ते फारच प्रभावी आहे. कुठलेच दंतमंजन अथवा पेस्ट मला इतकी गुणकारी जाणवली नाही. सकाळी दात घासल्यावर रात्रीपर्यंत तोंड ताजे राहते.
Rahul Sharad Bharamgunde, India (Bharat)
19 Jan 2013, 13:19

आम्ही ही उत्पादने वापरतो. ही खूप चांगली आहेत व सत्त्विकही आहेत. त्याचा आम्ही प्रचार करू.
• Post your comment
Sau. Shreya Keshav Masurkar, India (Bharat)
06 Dec 2012, 14:24

सनातन-निर्मित उत्पादने सात्त्विक असल्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास कमी झाल्याची अनुभूती आली आहे. मी सर्व उत्पादने वापरते आणि इतरांनाही त्याचे महत्त्व सांगते. उदबत्तीने वातावरण प्रसन्न रहाते. धन्यवाद.

Pramod Suresh Suryavanshi, India (Bharat)
12 Oct 2012, 11:55

‘सनातन प्रभात’ दैनिक हे प्रबोधनात्मक दैनिक असून प्रत्येक हिंदू व्यक्तीने ते आवर्जून वाचले पाहिजे. त्याचबरोबर सनातनची उत्पादनेदेखील खूपच सुंदर आहेत. एकप्रकारचा पवित्र अनुभव या उत्पादनातून मी अनुभवलेला आहे.
धन्यवाद !

Amol R Bhosale, India (Bharat)
12 Oct 2012, 10:30

मला आपली उत्पादने फार आवडतात. मी आपली उत्पादने रोज वापरतो आणि ती घरातील प्रत्येकाला तसेच ओळखीच्या लोकांना वापरण्यास सांगतो. सनातनचे उत्तपादन वापरल्यावर दिवस आनंदात जातो. कापूरचा सुगंध खूप छान आहे.


Sanam mhatre, India (Bharat)
07 Sep 2012, 11:40

मी स्वतः हि उत्पादने वापरतो आणि वितरण करतो. मी खूप भाग्यवान आहे की हि उत्पादने मला वापरण्याची आणि वितरण करण्याची संधी प.पू. डॉक्टर यांनी मला दिली. याबद्दल कृतज्ञता.



• Post your comment
shivajiraje kinhikar, India (Bharat)
16 Jul 2012, 16:44

मला आपली उत्पादने फार आवडतात. मी आपली उत्पादने रोज वापरतो आणि ती घरातील प्रत्येकाला तसेच ओळखीच्या लोकांना वापरण्यास सांगतो. सनातनचे उत्तपादन वापरल्यावर दिवस आनंदात जातो. कापूरचा सुगंध खूप छान आहे.
Renuka Amit Pande., American Samoa
12 Jul 2012, 22:10

वरील माहिती वाचून छान वाटले. यापैकी काही उत्पादने मी वापरलेली आहेत. खरोखरीच सनातनची सर्व उत्पादने सात्विक आणि शुद्ध आहेत आणि मी दैनिक रोज वाचते. ते वाचल्यावर खरेच आपल्या हिंदू राष्ट्राच्या स्थापनेस खारीचा तरी वाटा असावा असे विचार सारखे मनात येत असतात. ।। श्री गुरुवे नमः ।।
pankaj, India (Bharat)
29 Jun 2012, 00:06
खूपच छान, वाचून मनाला फार बरे वाटले. आणि माझ्या ज्ञानात भर पडली.
Vikram Bhor, India (Bharat)
29 May 2012, 18:55
लेख वाचून मनाला खूप बरे वाटले.
• Post your comment
Arun, India (Bharat)
17 Apr 2012, 18:48

खूपच छान, वाचून मनाला फार बरे वाटले. आणि माझ्या ज्ञानात भर पडली, अशीच अमृत वाचणे वाचावयास मिळवीत अशी मनापासून इच्छा.

अभिप्राय

* आपला अभिप्राय मोडरेटरकडून तपासून येइपर्यंत वेळ लागू शकतो.
* कृपया अयोग्य शब्द टाळावे.
* URLs व संगणकीय पत्ता टाकण्यास प्रतिबंध आहे.
 
नाव :   लक्षात ठेवा ?: 
आपला संगणकीय पत्ता:   
शहर :
देश :
अभिप्राय:
You may enter 700 letters. Type in Marathi (Press Ctrl+m to toggle between English and Marathi)
Image Characters: