परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हिंदु राष्ट्राचा संकल्प पूर्ण होणारच ! – समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर

पुणे जिल्ह्यातील गुरुपौर्णिमा महोत्सवात मान्यवरांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

परात्पर गुरु डॉ. आठवले अत्यंत कठीण परिस्थितीत साधकांना घडवण्याचे आणि समाजाला दिशा देण्याचे कार्य करत आहेत. २१ व्या शतकातील ते द्रष्टे संत आहेत. त्यामुळे २१ वे शतक हे आगामी काळात त्यांच्या नावाने ओळखले जाईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधक हिंदु राष्ट्राच्या निर्मितीचे कार्य करत असून ते उत्तरोत्तर वाढत जाईल. आगामी आपत्काळानंतर त्यांनी सोडलेला हिंदु राष्ट्राचा संकल्प पूर्ण झाल्याविना रहाणार नाही.

सनातनचे ३ आश्रम म्हणजे देहू, आळंदी आणि
पंढरपूर ही तीर्थक्षेत्रे आहेत ! – समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर

पू. सुनील चिंचोलकर

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेले सनातनचे रामनाथी, देवद आणि मिरज येथील आश्रम म्हणजे देहू, आळंदी अन् पंढरपूर यांच्यासारखी तीर्थक्षेत्रेच आहेत.

श्री. आनंद दवे यांचे सनातन संस्थेविषयी गौरवोद्गार !

हिंदूंच्या एकतेचे पवित्र कार्य सनातन संस्था करत आहे !

१०० कोटी हिंदूंच्या हिंदुबहुल देशात हिंदूंची एकता का आवश्यक आहे, हे समजावून सांगावे लागणे, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. जर एकत्र चालायचे असेल, एकत्र रहायचे असेल, तर हिंदू म्हणूनच एकत्र येऊ शकतो आणि हे पवित्र कार्य सनातन संस्था करत आहे. साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित आणि सनातनचे साधक यांना निरर्थक अटक करून त्यांना अनेक वर्षे कारावासात ठेवले जाते. हे का केले जाते, तर सनातनला लक्ष्य करण्यासाठीच ! सनातन संस्था हिंदुत्वाचे कार्य नैतिक दायित्वाने करत आहे. त्यामुळे हिंदूंनी त्यांच्या पाठीशी उभे रहायला हवे.

श्री. शिवराज तलवार यांनी सनातन संस्था
आणि सनातन प्रभात यांविषयी काढलेले गौरवोद्गार !

हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांविषयी केवळ सनातन प्रभातच माहिती देते. त्यामुळे सर्वांनी सनातन प्रभातचे वर्गणीदार व्हा ! सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यात सहभागी व्हा ! हिंदु राष्ट्राची प्रेरणा आणि गुरुकुल पद्धती काय असते, हे पहाण्यासाठी सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमाला एकदा तरी निश्‍चित भेट द्या.

सनातनच्या साधकांच्या साधनेविषयी
गौरवोद्गार काढणारे अधिवक्ता श्री. प्रशांत यादव !

साधना करणार्‍या साधकांच्या चेहर्‍यावर एक वेगळी प्रसन्नता आहे. कारण जीवन जगण्यामध्ये स्वारस्य निर्माण झाले आहे. आपण ईश्‍वरापर्यंत पोहोचू शकतो, ही दिशा त्यांना सापडली आहे. त्याचा आनंद साधकांच्या तोंडवळ्यावर प्रकट होतो आणि अंत:करणातील भाव तोंडवळ्यावर उमटतो. नामजप, मंत्रजप, ध्यानधारणा ही आपली संस्कृती आहे, म्हणून साधना केली पाहिजे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याविषयी
कृतज्ञतापूर्वक गौरवोद्गार व्यक्त करणारे अधिवक्ता श्री. प्रशांत यादव !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी व्यष्टी साधना करून भगवंताला प्राप्त केले असते; पण त्यांनी स्वत: केलेली साधना देश-विदेशात कळावी आणि साधना करतांना समाजात होणारे आघात सहन करण्याची क्षमता साधकांमध्ये निर्माण व्हावी; म्हणून हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा अशा विविध संस्था निर्माण केल्या. त्यांच्या संकल्पामुळेच आपण गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यात उपस्थित आहोत. जेव्हा समाज तपश्‍चर्येवर उभा राहील, तेव्हा सद्गुणांची निर्मिती होईल. असे सांगून त्यांनी सनातनने उत्पादित केलेल्या सात्त्विक वस्तूंचे महत्त्व सांगून प्रदर्शन पहाण्याचे सर्वांना आवाहन केले.

कोल्हापूर येथील गुरुपौर्णिमा महोत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण घटना

१. कोल्हापूर येथील चहाच्या दुकानाचे मालक श्री. प्रमोद बोरगावकर यांनी १५० कप चहा विनामूल्य अर्पण म्हणून दिला.

२. गडहिंग्लज येथे जिज्ञासू श्री. शेट्टी अतिशय व्यस्त असूनही १० मिनिटांसाठी वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांनी पुन्हा घरी जाऊन १ सहस्र रुपये अर्पण म्हणून आणून दिले.

३. इचलकरंजी येथील सनातन प्रभातच्या एका वाचकांना कार्यक्रम आवडल्याने त्यांनी घरी जाऊन त्यांच्या २ मुलींनाही कार्यक्रमस्थळी आणले.

वैशिष्ट्यपूर्ण

१. पंडित वसंतराव गाडगीळ यांनी स्वतःचे संपूर्ण मार्गदर्शन संस्कृत भाषेमधून केले.

२. भाजप नगरसेविका सौ. नीता दांगट (पाटील) या १ घंटा १५ मिनिटे कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनी सनातन संस्थेकडून गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेला महोत्सव नियोजनबद्ध आणि सुंदर होता. सिंहगड रस्ता भागात अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना धर्मरक्षणाचे कार्य करत आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन कार्य केले, तर मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन आपले कार्य अधिक चांगले होईल, असा लेखी अभिप्राय दिला.

३. राजगुरुनगर येथील छत्रपती सभागृहाचे मालक श्री. नंदकुमार पिंगळे यांचा कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला. त्याला उत्तर देतांना म्हणाले की, गुरुपूजनापेक्षा दुसरी कोणतीही पूजा वास्तुशांतीसाठी मोठी नाही, असे मला वाटते.

४. हडपसर येथे आलेल्या श्रीमती सुनीता पदे (वय ६९ वर्षे) यांनी असे कार्यक्रम हिंदु संघटनासाठी वारंवार घेतले पाहिजेत, असे सांगितले.

५. हडपसर येथे स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके पाहिल्यानंतर सौ. सुजाता टोपे यांनी आवर्जून स्वतःच्या १० वीमध्ये शिकणार्‍या मुलीसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाला जाण्याची नाव नोंदणी केली. यासमवेत अन्य ठिकाणच्या गुरुपौर्णिमांच्या ठिकाणीही स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर झाल्यानंतर अनेक जिज्ञासू महिलांनी उत्स्फूर्तपणे स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाची मागणी केली.

६. अधिवक्ता श्री. प्रशांत यादव यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना नमन करून मार्गदर्शनाला प्रारंभ केला.

७. विणकर सभागृहातील प्रोजेक्टरजवळ काही वेळ फुलपाखरू फिरत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment