सनातनच्या आश्रमांमध्ये वर्ष २००६ पासून आतापर्यंत अनिष्ट शक्तींनी विविध माध्यमांतून केलेली आणि त्या करत असलेली सूक्ष्मातील अनेक आक्रमणे

धर्मप्रसाराचे कार्य हे एक प्रकारे देवासुर युद्धच असते. सनातनचे साधक धर्म आणि अध्यात्म यांचे कार्य ईश्‍वरी अधिष्ठान ठेवून करत असल्यामुळे त्यांना अनिष्ट शक्तींकडून विरोधही मोठ्या प्रमाणात होत असतो. त्याचा दृश्य परिणाम व्यक्ती, वास्तू किंवा वस्तूंवर दिसून येतो. बुद्धीप्रमाण्यवाद्यांप्रमाणे या घटनांची हेटाळणी न करता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सनातन आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय त्यासंदर्भात अद्वितीय संशोधन करत आहे. धर्मशास्त्रात या घटनांचे संदर्भा पडताळण्यासमवेतच विविध वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्याने या घटनांच्या परिणामांच्या नोंदीही करत आहेत. या संशोधनकार्यातील काही घटनांची सूची पुढे देत आहोत.

लोलक चिकित्सा पद्धतीद्वारे स्पंदनांचा अभ्यास करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले, त्यांच्या बाजूला साधिका कु. सोनल जोशी

पुढे दिलेल्या बुद्धीअगम्य घटनांबरोबर वाईट शक्तीचा तीव्र त्रासही जाणवायचा. तो त्रास मलाच नाही, तर इतर खोल्यांतील साधकांनाही जाणवायचा. गेली १० वर्षे अनेक प्रकारचे त्रास होत असूनही केवळ अनेक संतांचे आशीर्वाद आणि त्यांनी केलेले विधी यांमुळे मी आणि साधक यांचे रक्षण झाले आणि होत आहे. त्या सर्व संतांच्या चरणी मी कृतज्ञ आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सूक्ष्म-चित्रातील बारकावे सांगून मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले, त्यांच्या बाजूला सूक्ष्म-चित्रकार साधिका कु. प्रियांका लोटलीकर (२००७)

सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये घडलेल्या आणि घडत असलेल्या सूक्ष्मातील अद्वितीय घटना बहुतेक सर्वच घटना परात्पर गुरु डॉ. आठवले रहात असलेल्या रामनाथी आश्रमातील आहेत.

१. पंचमहाभूते

१ अ. पृथ्वीतत्त्व

१. खोलीमध्ये दुर्गंध येणे

१ आ. आपतत्त्व

१ आ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील लाद्या आणि अन्य वस्तू यांचा चिकटपणा वाढणे

अ. एप्रिल २०१५ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील लाद्यांवरून चालतांना त्यांचा चिकट स्पर्श जाणवणे, लाद्यांवर पायांचे ठसेही उमटणे, दिवसातून ३ – ४ वेळा लादी पुसूनही ती स्वच्छ न होणे आणि थोड्या वेळाने ती पुन्हा अधिक चिकट होणे, काही वेळा या चिकटपणाचे प्रमाण अधिक, तर काही वेळा ते अल्प असणे

आ. ११.५.२०१५ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील लोखंडी आणि लाकडी कपाट, तसेच प्लॅस्टिकच्या आसंद्या यांसारख्या अन्य वस्तूंचा स्पर्शसुद्धा चिकट असल्याचे जाणवणे.

१ इ. तेजतत्त्व

१ इ १. डाग आणि आकृत्या

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना तीर्थ देण्यासाठी वापरलेल्या तांब्याच्या भांड्यात तळाला आलेले डाग

अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देण्यात येणार्‍या एका देवतेच्या जपाने अभिमंत्रित केलेले तीर्थ घ्यायच्या तांब्याच्या भांड्यात तळाला काही दिवस ०.५ सें.मी. आकाराचे ४ – ५ काळे डाग पडणे आणि कालांतराने त्या डागांमध्ये वाढ होणे.

आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वापरातील आणि साधक वापरत असलेली भांडी यांवर बाहेरील बाजूने डाग पडणे.

इ. परात्पर गुरु डॉ. आठवले रहात असलेली खोली आणि आश्रमातील इतर खोल्या यांच्या भिंतींवर तोंडवळे अन् आकृत्या उमटणे.

ई. परात्पर गुरु डॉ. आठवले लिखाणासाठी खाली धरतात तो पुठ्ठा (पॅड) आणि ते नेहमी खिशात ठेवतात तो कागद यांवर तोंडवळे उमटणे

उ. परात्पर गुरु डॉ. आठवले रहात असलेल्या खोलीतील हस्तप्रक्षालनपात्राच्या दोन्ही बाजूंच्या कोटा लाद्यांवर तोंडवळे आणि आकृत्या उमटणे

ऊ. २७.९.२०१३ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील लादीवर पावलांचे तीन ठसे उमटणे

ए. २५.५.२०१४ या दिवशी एका संतांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीमधील पलंगाखालच्या एका लादीखाली हुंडी (उपाय करण्यासाठीची वस्तू) ठेवण्याचा उपाय सांगणे आणि त्यासाठी लादी काढल्यावर सिद्ध झालेल्या खड्ड्यात सहा दिशांनी पाहिल्यास वेगवेगळे तोंडवळे दिसणे

ऐ. फेब्रुवारी २०१६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील उत्तरेकडील भिंतीवर हाताच्या पंजाप्रमाणे अनेक अस्पष्ट आकृत्या उमटणे (पूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा पलंग या ठिकाणी होता.)

ओ. खाद्यपदार्थांवर त्रासदायक शक्तींसारखे दिसणारे तोंडवळे उमटणे

१ इ २. ओरखडे

१ इ २ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील पालट

१. २४.२.२००६ या दिवशी खोलीतील दक्षिण दिशेच्या भिंतीचा टवका उडणे आणि त्या वेळी भूमीवर भिंतीचा रंग किंवा सिमेंट असे काहीही पडले नसणे

२. २१.१०.२०१३ या दिवशी दक्षिण दिशेकडील भिंतींवर ५.३० इंच (१४ सें.मी.) चे ओरखडे येणे

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या सज्जातील लाद्या आणि भिंत यांवर ओरखड्यांच्या स्वरूपात वर्तुळे निर्माण होणे

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील वातानुकूलन यंत्राच्या वरील काचेमध्ये आणि परात्पर गुरु डॉ. आठवले जेथे ग्रंथलिखाणाच्या सेवेला बसतात, त्या ठिकाणच्या सज्ज्याकडील दरवाजा आणि खिडकी यांच्या काचांना आतील अन् बाहेरील बाजूने चरोटे येणे

१ इ ३. तडे जाणे

अ. ३.३.२००६ या दिवशी खोलीच्या सज्ज्याच्या दरवाज्याच्या चौकटीवर, लोखंडी कपाटाच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर आणि स्नानगृहाच्या दरवाज्याच्या बाहेरील भिंतीवर अडीच इंचांचा (६.३५ सें.मी.) उभा तडा जाणेे आणि छताला भेग पडणे

१ इ ४. रक्ताचे डाग पडणे

अ. २४.३.२०१३ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले रहात असलेली खोली, संतांच्या आणि आश्रमातील इतर खोल्या येथे रक्ताचे डाग पडणे

१ इ ५. खोलीतील तापमान वाढणे

अ. १४.१२.२०१४ आणि २३.५.२०१४ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील तापमान अन्य खोल्यांच्या तुलनेत खूप अधिक असणे

आ. परात्पर गुरु डॉ. आठवले ग्रंथलिखाणाच्या सेवेला बसतात, तेथील भूमी उष्ण होऊन पायांना चटके बसणे, पायांमध्ये स्लिपर आणि मोजे असले, तरी पायांना उष्णता जाणवणे अन् तेथे काही सेकंदही पाय ठेवणे कठीण होणे

१ इ ६. लिंगदेह (ऑर्ब्स) दिसणे

अ. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्था यांच्यावर येणार्‍या संकटांच्या निवारणार्थ केलेल्या दशप्रणवी गायत्री हवनाच्या वेळी मोठ्या संख्येने चांगले अन् त्रासदायक लिंगदेह (ऑर्ब्स) दिसणे

१ ई. वायुतत्त्व

१ ई १. वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत पडणे अथवा दुसर्‍या ठिकाणी जाऊन पडणे

४.१०.२०१२ ला योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी उपायांसाठी दिलेली सोन्याची अंगठी घातल्यानंतर खोलीतील देवघराच्या कपाटावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि काही बाटल्या, कपाटावरील मोरपीस, छायाचित्राला वाहिलेली फुले खोलीत अस्ताव्यस्त स्थितीत पडणे

१ ई २. भिंतींवर आणि अन्य ठिकाणी उमटलेले तोंडवळे अन् आकृत्या यांची हालचाल होणे

अ. सप्टेंबर २०१३ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतीवर उमटलेल्या आकृत्या आणि तोंडवळे हलतांना जाणवणे, तोंडवळ्यांची दिशा पालटणे; डोळ्यांतील बुबुळे बाजूला, वर-खाली, तसेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने फिरतांना दिसणे अन् यांमुळे थकव्यामध्ये वाढ होणे

आ. सप्टेंबर २०१३ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर उमटलेले तोंडवळे हलतांना दिसणे आणि मार्च २०१४ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील लाद्यांवर पडलेले डाग, तसेच लाद्यांचे उडालेले टवके हेही हलतांना दिसू लागणेे

१ ई ३. भिंतीला फुगवटे येणे

२४.५.२०१४ या दिवशी खोलीतील देवघराच्या डावीकडे असलेल्या पश्‍चिमेकडील भिंतीवर फुगवटे आल्याप्रमाणे दिसणे, त्यांच्या प्रमाणात वाढ होणे आणि त्या फुगवट्यांमध्ये भयानक आकाराचे २ – ३ तोंडवळेे दिसणे

१ ई ४. प.पू. डॉक्टरांच्या खोलीत अकस्मात् दाब निर्माण होणे, तेव्हा सूक्ष्म-नादही ऐकू येऊ लागणे अन् कानांना दडे बसणे

३१.५.२०१४ या रात्री ९ वाजता परात्पर गुरु डॉ. आठवले रहात असलेल्या खोलीमध्ये अकस्मात् दाब निर्माण होणे, त्यामुळे खोलीमध्ये उभे राहिले की, चक्कर आल्याप्रमाणे वाटून पडायला होते कि काय ?, असे वाटणे, थोड्या वेळाने दाब जाणवू लागणे, त्याच वेळी

सूक्ष्म-नादही ऐकू येऊ लागणे अन् कानांना दडे बसणे

१ उ. आकाशतत्त्व

१. ३०.४.२०१४ या रात्री परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत रातकिड्यांच्या आवाजाप्रमाणे येणारा सूक्ष्मातील आवाज ऐकू येणे, त्यामुळे कानावर दाब जाणवणे आणि हा आवाज इतर ठिकाणी ऐकू येणार्‍या आवाजापेक्षा अधिक प्रमाणात अन् सलग ऐकू येणे

२. प.पू. डॉक्टरांच्या खोलीत आसंदीखाली अनेक काळे कण सापडणे : १६.३.२०१६ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील पलंगाच्या डाव्या बाजूला सकाळी उठल्यावर २ ते ४ मि.मी. आकाराचे १०० ते १५० काळे कण अधिक करून आसंदीच्या खाली आणि थोडे आसंदीच्या बाजूकडील पटलाच्या कडेखाली पडलेले दिसणे

३. वातावरण अगदी स्तब्ध होणे

१८.७.२०१४ आणि १.१२.२०१४ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमातील आणि आश्रमाच्या सभोवतालचे वातावरण अगदी स्तब्ध झाल्याप्रमाणे जाणवणे, झाडाचे एक पानही हलत नाही, असे वातावरण होणे

४. झाडे

प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या सज्जामध्ये ठेवलेली आणि ते प्रतिदिन पाणी घालत असलेली तुळस सुकणे (२९.७.२०१६)

४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या सज्जामध्ये ठेवलेली तुळस सुकणे : २९.७.२०१६ या दिवशी दुपारी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या सज्जामध्ये ठेवलेली आणि ते प्रतिदिन पाणी घालत असलेली तुळस सुकणे

४ आ. अश्‍वत्थाच्या लहान रोपाची पाने गळून पडणे : २९.७.२०१६ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या सज्जामध्ये ठेवलेले आणि महर्षींच्या सांगण्यावरून ते प्रतिदिन पाणी घालत असलेल्या कुंडीतील अश्‍वत्थाच्या (पिंपळाचा एक प्रकार) लहान रोपाची ४ पाने एकेक करून गळून पडणे

४ इ. २९.७.२०१६ ते २.८.२०१६ – पारिजातकाच्या वृक्षाची हिरवीगार पाने गळणे आणि कोमेजल्यासारखी होणे : २९.७.२०१६ या दिवसापासून आश्रमाच्या परिसरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीपासून ३ – ४ मीटर अंतरावर असलेल्या पारिजातकाच्या वृक्षाची हिरवीगार पाने पुष्कळ प्रमाणात गळून जाणे आणि २०.९.२०१६ या दिवशी पारिजातकाच्या वृक्षाची सर्व पाने गळून जाणे

५. पक्षी

अ. आश्रमाच्या परिसरामध्ये कबुतर, कावळा आणि चिमण्या यांसारखे पक्षी आपोआप मरून पडणेे अन् त्यांपैकी काही पक्ष्यांचे कुणीतरी गळा चिरल्याप्रमाणे डोके धडापासून अर्धे वेगळे झाल्याप्रमाणे आढळणे

 

६. आश्रमाच्या सभोवताली चारही बाजूंनी कुणीतरी बांधल्याप्रमाणे दोरे आढळणे आणि दोरे काढून टाकले की, ते आपोआप परत येणे – कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२६.१२.२०१६)

 

वैज्ञानिकांना साहाय्यासाठी विनंती !

सनातनच्या आश्रमांमध्ये वरीलप्रमाणे अनेक बुद्धीअगम्य घटना घडत असतात. या घटनांमागील वैज्ञानिक कारण काय आहे आणि यासंदर्भात अधिक संशोधन करण्यासाठी कोणत्या उपकरणांचा वापर करावा ?, हे समजण्यासाठी वैज्ञानिकांनी साहाय्य करावे, ही विनंती !

संपर्क : श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर,

इ-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment