रायबाग येथील तहसीलदार के.एन्. राजशेखर आणि पोलीस उपनिरीक्षक रवी आज्जण्णवर यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

रायबाग (जिल्हा बेळगाव) येथे धर्मरथावरील प्रदर्शनाचे उद्घाटन

धर्मरथावरील ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करतांना श्री. के.एन्. राजशेखर, शेजारी सनातनचे साधक श्री. सुरेंद्र चाळके

बेळगाव : धर्मप्रसार करण्यासाठी सध्या बेळगाव जिल्ह्यात सनातनचा धर्मरथ विविध तालुक्यांतील गावांत प्रसारासाठी जात आहे. सध्या रायबाग येथे धर्मरथावर सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. २९ मे या दिवशी रायबाग येथे धर्मरथावर प्रदर्शन लावले होते. रायबाग येथील तहसीलदार श्री. के.एन्. राजशेखर यांच्या हस्ते धर्मरथाचे पूजन करून ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ श्री. सिद्धू देसाई आणि धर्मरथावरील सनातनचे साधक श्री. सुरेंद्र चाळके उपस्थित होते. धर्मरथाचे पूजन झाल्यावर श्री. राजशेखर आणि रायबागचे पोलीस उपनिरीक्षक श्री. रवी आज्जण्णवर यांनीही धर्मरथावरील प्रदर्शनाचा लाभ घेतला.

धर्मरथावरील ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करतांना श्री. सुरेश नाईक
धर्मरथावरील ग्रंथप्रदर्शनाला भेट देतांना (मध्यभागी) पोलीस उपनिरीक्षक श्री. रवी आज्जण्णवर, (डावीकडे) श्री. सुरेंद्र चाळके आणि (उजवीकडे) श्री. जयदीप देसाई

३० मे या दिवशी रायबाग येथे दुसर्‍या ठिकाणी लावण्यात आलेल्या धर्मरथावरील प्रदर्शनाचे उद्घाटन अय्याप्पा स्वामी संप्रदायाचे गुरुस्वामी श्री. सुरेश नाईक यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले. या वेळी कर्नाटक रक्षण वेदिकेचे रायबाग तालुक्याचे अध्यक्ष श्री. अशोक अंगडी, भाजपचे कार्यकतार्र् श्री. नारायण म्हेत्रे उपस्थित होते. तसेच वरील दोन्ही प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्रीराम सेनेचे उत्तर कन्नड अध्यक्ष श्री. जयदीप देसाई उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment