श्रीमत् नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कीर्ती सर्वत्र करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नरत असलेले दोन्ही महर्षि आणि दोन्ही सद्गुरु !

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

गेले २ मास आमचा एकीकडे सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून दैवी प्रवास, पूजा, अभिषेक असे चालू आहे, तर एकीकडे भृगु महर्षींच्या माध्यमातून दैवी प्रवास, पूजा, अभिषेक असे चालू आहे. दोन्ही सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू सकाळी एके ठिकाणी, दुपारी दुसर्‍या ठिकाणी, तर रात्री तिसर्‍या ठिकाणी, असा भारतभर प्रवास करत आहेत. वामनावतारात महाविष्णूने पृथ्वी पादाक्रांत केली, तसे हे घडत आहे. हे सर्व एके ठिकाणी चालू असतांना श्रीमत् नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाची सिद्धता गोवा येथील रामनाथी आश्रमात चालू आहे. रामनाथी आश्रम सोडून भारतातील इतर सर्व ठिकाणी साधक, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आवडणारे राष्ट्र-धर्म विषयाशी संबंधित उपक्रम दिग्विजयी होऊन राबवत आहेत. दोन्ही महर्षींना जशी घाई लागली आहे, त्याचप्रमाणे दोन्ही सद्गुरूंनाही घाई लागलेली आहे. गुरूंसाठी काय करू अन् काय नको, अशी त्यांची स्थिती अनुभवायला मिळत आहे. त्यांना पाहून वाटते, त्यांचा रोम रोम नारायण, नारायण, असे म्हणत आहे आणि त्यांचा वेग नारायण वेग झाला आहे. त्यांना पाहून साधकही त्या वेगाने जायला लागले आहेत.

परात्पर गुरु डॉक्टर, असे वाटते, संपूर्ण पृथ्वी, पृथ्वीवरील चराचर सृष्टी, झाडे, दगड, पर्वत, समुद्र, नदी सर्वकाही नारायणमय झाले आहेत. दोन्ही सद्गुरु आणि दोन्ही महर्षि यांच्या तळमळीमुळे परात्पर गुरु डॉक्टर यांचा अमृत महोत्सव ते या वर्षीची गुरुपौर्णिमा या कालावधीत सर्व साधक साधनेत पुढे पुढे जाणार आणि नारायणमय झालेल्या साधकांना घेऊन नारायणमय हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे.

महर्षि म्हणाले होते, श्रीमत् नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर यांचा अमृत महोत्सव न भूतो न भविष्यती असा होणार आहे. त्याची थोडीफार झलक पहायला मिळत आहे. अशी नारायण-अनुभूती देणारे सर्व साधकांचे नारायणस्वरूप गुरु परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

– श्रीमत् नारायण सेवक,

श्री. विनायक शानभाग, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (३०.४.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
Facebooktwittergoogle_plusmail