परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले अमृत महोत्सव सप्ताह !

दि. १५.५.२०१७

सनातन आश्रमातील भोजनकक्षातील फलकावर परात्पर गुरु
श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या छायाचित्रांची करण्यात आलेली वैशिष्ट्यपूर्ण मांडणी

 

सनातन आश्रमातील भोजनकक्षातील फलकावरील भावसंदेश

 

साक्षात् भगवंत अवतरिला असा हा अमृत सोहळा !

अनेक जीव ज्या भगवंताचे स्वरूप पहाण्यासाठी जन्मोजन्मी
कठोर साधना करतात, त्याला याचि देही याचि डोळा ।
अनुभवण्याची संधी आम्हा सर्व साधकांना लाभली आहे. या
परमभाग्याचे वर्णन करावे तरी कसे ? साक्षात् भगवान श्रीकृष्णच
आपल्याला मोक्षाला घेऊन जाण्यासाठी परात्पर गुरुमाऊलींच्या
रूपात अवतरित झाला आहे. त्याच्या अमृतदिनी प्रत्येक श्‍वास
कृतज्ञतेच्या भावाने समर्पित करूया.
भगवंत धर्मसंस्थापनेसाठी अवतार घेतो, तेव्हा अनेक
जिवांचा उद्धार करतो. परात्पर गुरुमाऊलीच्या रूपात साक्षात्
श्रीमन्नारायण आपल्या उद्धारासाठी अवतरले आहेत. त्यांच्या
अमृतमहोत्सवी सोहळ्यारूपी भवसागरात न्हाऊया आणि आपले
जीवन सार्थक करूया !

 

वैकुंठातील विष्णुदासांना आवाहन ।

अखंड कृपावर्षाव करिती श्रीगुरुनाथ ।
तन-मन अर्पूनी चिंब भिजूया त्यात ॥
खरा आनंद आहे अंतर्शुद्धी प्रक्रियेत ।
गुरुकृपेनेच होऊ लागले हे आता ज्ञात ॥
श्रीगुरूंचे अमृतमय ज्ञान साठवूया चित्तात ।
भावविभोर होऊनी गाऊ गुरुगीत ॥
प्रयत्ने ठेवूया सदा भावजागृत ।
अमृतदिनाच्या भावविश्‍वात रंगूया आनंदात ॥
प्रत्यक्ष अवताराच्या चैतन्यमय उच्छ्वासाने भारित
वायूमंडलातील श्‍वास घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. हे
चैतन्य अधिकाधिक ग्रहण करण्याचा प्रयत्न करूया.

सौजन्य : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment