आध्यात्मिक संग्रहालयासाठी आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे जतनकार्य

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक संग्रहालयाची निर्मिती केली जात आहे. या संग्रहालयासाठी भारतातील तीर्थक्षेत्रे, देवळे, संतांचे मठ, संतांची समाधीस्थाने, ऐतिहासिक स्थळे इत्यादी ठिकाणच्या अध्यात्मशास्त्रदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, माती, पाणी आदी, तसेच चांगल्या आणि वाईट शक्तींचा परिणाम दर्शवणार्‍या १५ सहस्र वस्तू, सहस्रावधी छायाचित्रे आणि २७ सहस्रांहून अधिक ध्वनीचित्रफिती होतील, एवढे ध्वनीचित्रीकरण(एकूण ३४३ टेराबाईट) यांचे आजपर्यंत जतन करण्यात आले आहे. काही वस्तूंविषयीची माहिती पुढे दिली आहे.

विषयसूची संग्रह करण्याचा उद्देश  संख्या
१. वाईट शक्तींची आक्रमणे झालेल्या वस्तू वाईट शक्तींच्या आक्रमणाची तीव्रता आणि स्वरूप अभ्यासणे १९२८
२. चांगल्या शक्तींमुळे पालट झालेल्या वस्तू दैवी शक्तींमुळे साधक आणि संत यांच्याकडील वस्तूंत झालेले पालट अभ्यासणे २७४
३. विविध संतांच्या आणि त्यांच्याशी संबंधित वस्तू स्तरानुसार आणि काळानुसार होणारे वस्तूंतील पालट अन् चैतन्य अभ्यासणे २२५२
४. देश-विदेशांतील विविध सात्त्विक वस्तू वस्तूतील सात्त्विकता, तसेच संबंधित देवतेचे तत्त्व अभ्यासणे ३३७४
५. देश-विदेशांतील विविध असात्त्विक वस्तू व्यक्तीचे मन, बुद्धी, तसेच वायूमंडल यांवर असात्त्विक वस्तूंचे होणारे अनिष्ट परिणाम अभ्यासणे १२६
६. ऐतिहासिक वस्तू तात्कालिन सांस्कृतिक मूल्ये आणि गुणवत्ता अभ्यासणे ८३४

अशा अनेकविध आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे जतन करून परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्मविश्‍वाच्या इतिहासात एक नवा अध्यायच लिहीत आहेत.

Leave a Comment